Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन! शहर बचाव समितीचे नगरपरिषद प्रशासनाला स्मरणपत्र; पाणी, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, गटार, भूमिगत वीज आणि आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची मागणी! प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत  कर्जत शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून आता कर्जत शहर बचाव समितीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणीपुरवठ्यापासून वाहतूक कोंडीपर्यंत… स्वच्छतेपासून आरोग्य सुविधांपर्यंत… तब्बल ५० नागरी प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा समितीचा दावा आहे. शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करावा, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि नियमित पाणी तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी…

Read More

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा! विद्यार्थिनींच्या व्हिडिओतून रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; वाहनांचे नुकसान, दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला! प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत  कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांनी अधिकच उग्र रूप धारण केले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये…

Read More

*परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण* प्रतिनिधी /समीर बामुगडे पनवेल : चिपळे येथील विजय बँकेसमोरील मिळकत क्रमांक ६७६ मध्ये सुरू असलेल्या ‘दुर्वेश मटन/चिकन शॉप’च्या परवान्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या दुकानाबाबत सनिलकुमार नायर यांनी ८ जानेवारी २०२५ रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिपळेकडे माहिती मागितली होती. त्यावर ग्रामपंचायतीने १४ जानेवारी २०२५ रोजी लेखी उत्तर दिले असून, संबंधित दुकानाला ग्रामपंचायतीकडून परवाना देण्यात आल्याचे नमूद केले आहे. ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार, शानवाज याकुब ताडे यांच्या नावाने संबंधित मटन/चिकन शॉपसाठी सन २०२१ मध्ये परवाना देण्यात आला होता. मात्र, सदर परवान्याचे २०२५ पर्यंत…

Read More

शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान ! प्रतिनिधी / किशोर पितळे रायगड प्रेस क्लब व तळा मराठी पत्रकार संघ वतीनेशेताच्या बांधावर प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संकल्पना पत्रकार कै.संतोष पवार यांच्या प्रेरणेतून गेली १६वर्षे स्युत्य उपक्रम रायगड प्रेस क्लब राबवीत असून तळा तालुक्यातील मुंढ्याची वाडी येथील प्रकाश रामचंद्र मुंढे व कुंबेट येथील सुरेश सखाराम कजबळे याप्रयोगशील प्रगतशील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जावून सन्मानित करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कष्टाप्रती ऋण व्यक्त करीत प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतावर जाऊन सन्मान करण्याची अभिनव परंपरा रायगड जिल्हा प्रेस क्लब गेली १६ वर्षें राबवित आहे. रायगड प्रेस क्लबच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि शेती क्षेत्रातील योगदानाला…

Read More

प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ कोलाड ही सेवाभावी संस्था गेली पाच ते सहा वर्षापासून कोलाड परिसरात तसेच तळागाळात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण,सह विविध क्षेत्रात उत्तमरित्या कार्य करत असून तर तळागाळातील सर्व सामान्य घटकाला विविध सेवेचा लाभ मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील ही सेवाभावी संस्था काम करत असल्याने मागील २९ जुलै रोजी कोलाड लायन्स क्लब, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग तसेच प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात दोनशेहून…

Read More

कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही, कोलाड (श्याम लोखंडे ) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाला तर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र मोठा अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि रविवार दि.९ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडून माणगाव बाजूकडे कॉईल भरून जाणारा ट्रेलर क्र.एम.एच.४३ सि.के.९०१३हा ट्रेलर कोलाड येथील उड्डाण पुलावरून जात असतांना सुरवातीला उड्डाण पुलाला संरक्षण कठडे नसल्याने पुलाचा अंदाज न आल्यामुळे ट्रेलर पलटी झाला.तसेच ट्रेलरचा जॉईंट तुटल्यामुळे ट्रेलरची कॅबिन वर व…

Read More

विद्यार्थ्यांनी संतुलित,सकस आहार घेवून भविष्यात आजार होणार नाही काळजी घ्यावी…डॉ.. प्रफुल्ल इंगळे. द.ग.तटकरे महाविद्यालयात ‘आजचा युवक आणि आरोग्य’ विद्यार्थी संवाद कार्यशाळा… प्रतिनिधी/किशोर पितळे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या आमच्या द. ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तारविभागाच्या वतीने,शुक्रवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “आजचा युवक आणि आरोग्य” या विषयावर विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून डॉ. प्रफुल्ल इंगळे (वैद्यकीय अधिकारी) ग्रामीण रुग्णालय, तळा हे लाभले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. राजाराम महादेव थोरात यांनी केले. देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा…

Read More

एक कोटींचा निधी अपुरा ठरल्याने पाच कोटींची तरतूद; जागतिक दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे लोकार्पण ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते,रोहा तालुका क्रीडा संकुलात खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक क्रीडा सुविधा. रोहा प्रतिनिधी : – तालुक्यातील खेळाडूंना दर्जेदार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या आराखड्यापासून ते बांधकामापर्यंत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्थानिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांचा विचार करून क्रीडा संकुलाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येणार असून, या संकुलातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे खेळाडू घडावेत, या दृष्टिकोनातून आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रतिपादन ना. आदिती तटकरे यांनी केले. धाटाव येथील रोहा तालुका…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २०२६; आगरी समाज उत्कर्ष मंडळातर्फे रविवारी आयोजन प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव           आगरी समाज उत्कर्ष मंडळ (रजि.) यांच्या वतीने आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह समाजातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.             हा गुणगौरव सोहळा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण माणेकजी गढधर म्युनिसिपल मराठी शाळा, गढधर बांध, सांताक्रुझ (प.), मुंबई – ४००…

Read More

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणीत गंभीर अनियमिततेचा आरोप; चौकशीची मागणी प्रतिनिधी /रवींद्र लाड रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात केल्टे ग्रामस्थानी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फलोउत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, महिला व बाल विकास मंत्री, स्थानिक आमदार आदिती तटकरे, स्थानिक खासदार सुनील तटकरे, महसूल सचिव, जिल्हाधिकारी रायगड , पोलीस अधीक्षक रायगड आदिना निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले…

Read More