Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
ताज्या बातम्या

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 14, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

तळा:किशोर पितळे

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, रायगड येथील IQAC व नॉलेज रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सकाळी १० .00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांच्या हस्ते डॉ .एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आले व मुबई विद्यापीठ पुस्तक पेढी अंतर्गत महाविद्यालय विद्यार्थानसाठी स्पर्धा परीक्षा विषयी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रसंगी प्राध्यापक,प्रध्यापकेतर कर्मचारी आणि विधार्थी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता .दुपारी ३.वाजता “Smart Learning with Google Drive and AI” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम मुळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती थोरात यांनी केले.कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विश्वास हासे यांनी Google Drive आणि Artificial Intelligence या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः Google Drive च्या विविध सुविधा, ऑनलाइन पद्धतीने माहितीचे संकलन व व्यवस्थापन, दस्तऐवज तयार करणे व शेअर करणे, डिजिटल सहकार्य तसेच Artificial Intelligence च्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी, गतिमान व सुलभ करण्याच्या विविध पद्धतींची त्यांनी माहिती दिली. . विश्वास हासे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक अध्ययन पद्धतींसोबत डिजिटल साधनांचा योग्य वापर करणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. AI चा जबाबदारीने व शैक्षणिक दृष्टिकोनातून वापर करून माहिती शोधणे, तिचे विश्लेषण करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे आणि अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करता येईल, याची त्यांनी विविध उदाहरणांसह माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना Google Drive आणि AI च्या प्रत्यक्ष उपयोगाबाबत उपयुक्त माहिती मिळाली.कार्यशाळेचे प्रास्ताविक तसेच प्रमुख मार्गदर्शकांची ओळख महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोज वाढवळ यांनी करून दिली. त्यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून आजच्या डिजिटल युगात ग्रंथालयांनी तंत्रज्ञानाशी जोडले जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, Google Drive आणि AI यांचा शैक्षणिक क्षेत्रातील वापर याविषयी मार्गदर्शन मिळाल्याने सहभागींसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.११७जणांची उपस्थिती होती .या कार्यशाळेला शिक्षक, विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राशी संबंधित सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विजय चव्हाण सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयोजक, मार्गदर्शक, उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.डिजिटल युगातील शिक्षण अधिक स्मार्ट, सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी ही राज्यस्तरीय कार्यशाळा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us