Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सिद्धेश्वर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर खैर चोरांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात! अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीसह 4आरोपी पकडून दिले
ताज्या बातम्या

सिद्धेश्वर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर खैर चोरांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात! अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीसह 4आरोपी पकडून दिले

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सिद्धेश्वर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर खैर चोरांची टोळी वनविभागाच्या जाळ्यात!
अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो आणि स्कॉर्पिओ गाडीसह 4आरोपी पकडून दिले

रोहा:समीर बामुगडे

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर, नाडसूर विभागात अवैध खैराची तस्करी सराईत टोळी करत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच सिद्धेश्वर येथील शेकडो तरुणांनी रात्री आणि दिवसा पहारा ठेवून मेहनत घेऊन या विभागात खैर चोरटोळीला पकडण्यासाठी फिल्डिंग लावली होती. दिनांक 21/6/2026 रोजी रात्री या विभागात ग्रामस्थांना माहिती मिळाल्या प्रमाणे काही वाहने रात्री घीरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले असता खैर भरलेल्या गाड्या अडवण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावले होते. ग्रामस्थ आलेल्या गाडीला आडविण्यासाठी गेले असता भरलेली स्कार्पिओ गाडी ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न या टोळीने केला परंतु ग्रामस्थांनी न डगमगता धाडस दाखवून स्कॉर्पिओ गाडी सिद्धेश्वर येथे पकडली ड्रायव्हर मात्र फरार झाला. तसेच खांडसई – नाडसुर रस्त्याला दबा धरून बसलेल्या ग्रामस्थांनी धाडस दाखवून, जीवावर उदार होऊन रात्री 2:30 च्या दरम्यान अवैध खैराने भरलेला पिकअप टेम्पो, तसेच 4 आरोपी- राजू अरुण हिलम -रा. नाडसुर, प्रशांत नंदकुमार जाधव-रा. माप्रल – मंडणगड, रोहित पांडुरंग चोरगे -रा. माप्रल, कतिश उमेश राठोड -रा. 21 गणपती सिद्धेश्वर यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले . यावेळी रात्री सिद्धेश्वर येथे घटनास्थळी उपस्थित सुधागड वनपरिशेत्र अधिकारी विशाल सोनवले, मेजर साळुंखे, कणसे वनपाल – उत्तम शिंदे, आनंदराव कराडे. वनरक्षक- सुनील जाधव, रुपेश इंगोले, व्यंकट पवार, गुलचन काकडे, संदीप ठाकरे, अविनाश पाटील उपस्थित होते. वनविभागाने भरलेला पिकप टेम्पो नं -MH-06cp-2260, स्कॉर्पिओ MH06An1276 आणि 4 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या चार आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)ब (2) महाराष्ट्र वन नियमावली 2014 कलम31(1) 3) भारतीय न्याय सहिता 2023कलम 303(2) गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुद्देमाल सह दोन्ही वाहने वनविभागाच्या ताब्यात आहेत. चारही आरोपी वनविभाग कस्टडी मध्ये असून अधिक माहितीसाठी लॉकअप मध्ये कसून चौकशी चालू आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी ता.सुधागड विशाल सोनवले यांच्या अधिपत्याखाली वनपाल वनरक्षक करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीं ना अधिक तपासासाठी चार दिवस वनविभाग लॉकअप ( क स्टडी ) मध्ये ठेवण्यात येणार आहेत. सिद्धेश्वर ग्रामस्थांनी आमच्या वनविभागाला सहकार्य केल्यामुळे वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून विशाल सोनवणे यांच्याकडून सिद्धेश्वर ग्रामस्थांचे खूप खूप धन्यवाद 🌹

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us