आदिशक्ति अभियानात वाडगांव ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय झेप तालुका व जिल्ह्यात प्रथम क्रमांकानंतर राज्यस्तरीय समितीकडून परीक्षण अलिबाग(रत्नाकर पाटील)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “आदिशक्ति अभियान” अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव, ता. अलिबाग यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर दि. ०७ मे २०२६ रोजी राज्यस्तरीय समितीने वाडगांव ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांचे परीक्षण केले. यावेळी कोकण विभागाच्या विभागीय उपआयुक्त श्रीम. सुवर्णा पवार तसेच परिविक्षा अधिकारी श्रीम. ओव्हाळ यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेतला. महिला व बाल विकास विभाग, ग्रामविकास, शिक्षण व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांची माहिती घेऊन समितीने समाधान व्यक्त…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचा गंभीर प्रश्न; बोगस बिलांचा संशय ? नागरिक संतप्त रोहा:(समीर बामुगडे ) रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ४ मधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. नाकोडा किराणा माला परिसरातून जाणाऱ्या या रस्त्यावर खाली गटार असून वर केवळ डांबराचा थर टाकण्यात आल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. वाहतूक करताना वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वेळा निधी मंजूर झाला, तसेच काम पूर्ण झाल्याची बिलेही काढण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली…
जिध्द,चिकाटी,आत्मविश्वासा च्या बळावर कु.पुष्पा रामाणे मुंबई पोलीस दलात दाखल. तळा-किशोर पितळे- जिध्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर महत्वाकांक्षा पुर्ण होते हे तळा शहरातील भोईरवाडी येथील बाळकृष्ण रामाणे किरकोळ भाजीपाला व्यवसायीक लेकीने आकाशाला गवसणी घालून पोलीस होण्याचे स्वप्न साकार केले .अतिशय दुर्गम व डोगंराळ भागात वसलेल्या तळा शहरात वाढलेल्या पुष्पाने सिद्ध करून दाखवले आहे.पुष्पा हि अतिशय चुणचुणीत मुलगी उच्च शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याची ईच्छा असल्याने “स्वराज्य करिअर अँकँडमी”मध्ये एडमिशन घेतले.मुलीसाठी आई वडीलांनी अपार कष्ट करून मुलीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारे आर्थिक बळ दिले.आई वडीलां च्या कष्टाची किंमत ठेवून अहोरात्र मेहनतीच्याजोरावर पुष्पाने ११एप्रिल२६ रोजी पोलीस भरती परीक्षा दिली त्या मेहतीचे फलीत २मे२६रोजी…
*मनसेचा इशारा: नागोठणेतील धार्मिक कमान तोडफोडीवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण* प्रतिनिधी दिपक सोनावणे नागोठणे येथील प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली हजरत मीरा मोहम्मद शहा बाबा यांच्या नावाची कमान १ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कमान ही नागोठणेतील नागरिकांच्या श्रद्धेचा विषय मानली जात होती. अशा प्रकारची तोडफोड ही निषेधार्ह असून समाजात तणाव निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, घटना घडून अनेक दिवस उलटूनही अद्याप संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये…
रायगड जिल्हा बँकेच्या आर्थिक प्रगतीचा महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्तांकडून गौरव हा रायगड जिल्हयाच्या सहकारासाठी अभिमानास्पद क्षण जिल्हा उपनिबंधक- तनवीर पाटील अलिबाग (रत्नाकर पाटील) पुणे येथे वैकुंठभाई मेहता इन्स्टिट्यूट येथे झालेल्या राज्य शासन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त सभेमध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नोंदविलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी बँकेचे विशेष कौतुक केले. बँकेने चालू आर्थिक वर्षात आपल्या ठेवींमध्ये तब्बल २६ टक्क्यांनी वाढ नोंदविल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करताना, “रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही प्रगती राज्यातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून बँकेच्या व्यवस्थापनाने केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे,” असे गौरवोद्गार काढले. ही बाब संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार…
सारा वर्तकचा विश्वविक्रम; कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान जलतरणपटू म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद अलिबाग(रत्नाकर पाटील) अलिबाग येथील अवघ्या ७ वर्षांच्या सारा अभिजीत वर्तक हिने आपल्या अद्वितीय जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी साराने अरबी समुद्रात धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक तब्बल ३६ किमी अंतर एकट्याने अवघ्या ९ तास ३२ मिनिटांत पोहत पूर्ण करत सर्वात लहान वयाची जलतरणपटू म्हणून इतिहास रचला. आता तिच्या या पराक्रमाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली असून ३० एप्रिल २०२६ रोजी नेपाळमधील…
अलिबागच्या रंगभूमीवर अभिनयाचा अविष्कार; राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत कलाकारांचा डंका! एकता इंटरप्रायझेस’ आणि ‘कलारंग’चा स्तुत्य उपक्रम; सामाजिक बांधिलकीचाही जागर अलिबाग(रत्नाकर पाटील) मुंबईतील एकता इंटरप्रायझेस या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आणि सौ. एकता निखिलेश म्हात्रे यांच्या सौजन्याने तसेच कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा २०२६’ नुकतीच अलिबाग येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या विविध शहरांतून आलेल्या कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते, ज्यामध्ये लहान गटात १८ आणि मोठ्या गटात १७ अशा एकूण ३५ स्पर्धकांनी विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि ज्वलंत विषयांवर…
नागरिकांनी स्व जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे–तहसीलदार स्वाती पाटील. तळा-किशोर पितळे- राज्यात १मे२६पासून जनगणना उपक्रम राबविण्यात येत असून जनगणना २०२७ हि जनगणना जवळपास अनेक वर्षानी होत असून १मे ते१५मे या कालावधीत स्व -जनगणना मोबाईल वर https://se.census.gov.in करून प्रशासनाला सहकार्य करावे १६मे ते १४ जून घरोघरी जनगणना केली जाणार असूनप्रगणक,पर्यवेक्षक घरांना भेटी देऊन माहिती संकलित करतील त्यांनी विचारलेल्या प्रश्रांची व्यवस्थित माहिती भरून द्यावी.या जनगणनेने देशाच्या विकासाला गती गती मिळेल “चलातरआपली जनगणना जबाबदारी पार पाडू या.,जनगणनेत सहभागी होवू या” या प्रमाणे प्रशासनाला सहकार्य करावे.शासनाची योजना आखणी शिक्षण, आरोग्य, संसाधन वाटप रोजगार, पायाभूत सुविधा यासाठी आवश्यक ठरणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे तळा…
राजेश म्हात्रे यांना पोलीस महासंचालक पदक अलिबाग(रत्नाकर पाटील ) महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कर्तव्याचा दक्ष आणि सेवाभावाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक शिलेदारांचा दरवर्षी सन्मान केला जातो. सन 2025 च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदकावर रायगड पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले व सध्या महामार्ग पोलिस मदत केंद्र वाकण येथे वाहतूक विभागात कार्यरत असलेले राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे उर्फ राजा म्हात्रे यांनी आपले नाव कोरले आहे. नवी मुंबई येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (आयपीएस) यांच्या हस्ते राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील आवास या गावातून पोलीस दलात…
*नागोठणे येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद* प्रतिनिधी : सुदर्शन कोटकर नागोठणे : नवनिर्वाचित शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषद सदस्य सुमित दादा काते यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे विभागाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट, एस.पी.सी.डी. हॉस्पिटल नवी मुंबई आणि यू.आय.सी. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांसाठी विविध मोफत वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये ईसीजी तपासणी, रक्तदाब तपासणी, तोंडाच्या कॅन्सरची तपासणी, मधुमेह तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला यांचा समावेश होता. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद…

