नगरसेवकांच्या तक्रारींवरून मुख्याधिकाऱ्यांची आमदार महेंद्र थोरवेंकडून कानउघाडणी! कारभारातील त्रुटींवर आमदारांचा संताप; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करा! प्रतिनिधी /गणेश पवार माथेरानच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीची दखल घेत कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. नगरसेवकांना योग्य सन्मान न देणे, कार्यालयीन कामकाजातील दिरंगाई, ठरावांच्या व इतिवृत्ताच्या प्रती वेळेत उपलब्ध करून न देणे तसेच प्रशासनातील समन्वयाचा अभाव आदी मुद्द्यांवर आमदारांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. ३ ऑगस्ट रोजी माथेरान नगरपरिषदेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात शहराच्या विकासासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी आमदार थोरवे यांनी रिगल हॉटेल येथे पक्ष पदाधिकारी व…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
कुडकुडी गावाचा गोकुळ धाम गवळवाडी नामकरणाचा प्रस्ताव मंजुर.. कुडतुडी गाव यापुढे गोकुळधाम गवळवाडी या नावाने ओळखले जाणार… ग्रामस्थांची अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण.. प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड. म्हसळा: म्हसळा तालुक्यातील काही गावांची नावे जातीनिहाय देण्यात आली होती, पण ९ ऑक्टो २०२५ च्या पत्रान्वये अनेक ग्रामीण भागातील जातीवाचक नावे बदलण्याचा सर्वस्वी अधिकार जिल्हा अधिकारी यांना असून त्या अनुशंगाने परिपत्रक काढण्यात आले असुन २७ /३ / २०२६ अन्वये रायगड जिल्हयातील ९६ वाड्या वस्तींची जुनी जातीवाचक नावे बदलुन ग्रामसभेत ठरावात प्रस्तावित केलेल्या नविन नावांचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याच प्ररिपत्रकाच्या अनुशंगाने मौजे कुडकुडी गावचे उपसरपंच कृष्णा दिवेकर, अध्यक्ष विठोबा कासार, शंकर मिरगळ, मोहन दिवेकर…
*म्हसळा तालुक्यातील मौजै कुडतुडी गांवचे नामंतरण “गोकुळ धाम”गवळवाडी असे झाले*. *प्रतिनिधी -श्री.रविंद्र लाड*. *मौजे कुडतुडी गावचे उपसरपंच श्री. कृष्णा दिवेकर अध्यक्ष श्री. विठोबा कासार श्री. शंकर मिरगळआणि *श्री. मोहन दिवेकरहे आपल्या गावाच्या नाव बदलाच्या संदर्भात अलिबाग जिल्हा परिषद येथे सातत्यानं पाठपुराव्यामुळे अखेर शाशन मान्यता मीळाली *”कुडतुडी गौळवाडी” वरून”कुडतुडी गोकुळधाम” करण्यात आल्याबाबतचे पत्र एप्रिल महिन्यातच पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहे* *आता पुढील प्रक्रिया म्हणून *ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तो सर्व संबंधित शासकीय विभागांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व शासकीय पत्रव्यवहारात “कुडतुडी गौळवाडी” ऐवजी *”कुडतुडी गोकुळधाम”हेच नाव अधिकृतपणे वापरण्यात येईल*. *महसुली गाव करण्यासंदर्भातील आवश्यक शासन निर्णय (GR) देखील खाली जोडला आहे*. *खरोखरच आज…
श्रीक्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथे वृक्षारोपण . कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड खांब विभागातील सामाजिक युवा नेते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक प्रमोद शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथील भगवान शंकर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. समाजहिताची जाणीव ठेवून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविणारे प्रमोद अनंत म्हसकर हे समाजसेवेत नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. पर्यावरण संवर्धन,कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य सामाजिक बांधिलकी, गरजूंसाठी मदतीचा हात आणि लोकहिताचे उपक्रम यामधून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणतेही सामाजिक कार्य असो, त्यामध्ये ते नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या…
*तुला रस्त्यावर चालणे मुश्किल करेन… कसा धंदा करतोस ते मी बघतो…पिकअप गाडी चालकाला वाहतूक पोलिसाची धमकी*… या संदर्भात विचारणा केली असता माजी सभापती रविंद्र लाड यांच्याशी वाहतुक पोलिसाची उध्दटगिरीची भाषा*…. प्रतिनिधी /रविंद्र लाड. *म्हसळा :दि. 14 जुलै रोजी माणगाव ईथुन श्रीवर्धन या ठिकाणी भाडे असल्याने MH 06 CP 1998 या क्रमांकाची सफेद रंगाची पिकअप घेऊन चालक मुकेश पवार हे भाडे घेऊन गेले होते, उशीर झाला असल्याने श्रीवर्धन मधून पुन्हा परतीचा प्रवास करीत असताना रात्री 1 वाजता म्हसळा चेकनाक्यावर पिकअप थांबवुन फोटो काढून म्हसळा वाहतुक पोलीस यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता वाहन चालक मुकेश पवार, रा. माणगाव याला एक हजार…
आंतरराष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशिप२०२६मधे चैतन्य पितळे चमकला.तालुक्यात रोवला मानाचा तुरा तळा -किशोर पितळे-(प्रतिनिधी) काठमांडू,नेपाळ येथेझालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय मिक्स बाँक्सिंग चँम्पियनशिप २०२६ स्पर्धेत तळा रायगड येथील कु.चैतन्य स्मिता योगेश पितळे यांनी सिल्व्हर मेडल (रौप्य पदक) प्राप्त करून पुन्हा एकदा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता नववी तील विद्यार्थी असून लहानपणा पासून कराटे बाँक्सिंग ची आवड असल्याने त्याने अँकेडमीतून सराव केला.त्यासाठी लागणारी आर्थिक मदत व मार्गदर्शन आई ने पुरवली यापूर्वी काठमांडू येथे झालेल्या एशियन चँम्पियन शिप मधे त्याने रौप्य पदक प्राप्त केले होते. त्याने तळा तालुक्याचे नांव मोठे करून दैवज्ञ ब्राह्मण सोनार समाजाचे नांव उंचावले आहेकु.चैतन्यची जिध्द,चिकाटी, मेहनत हे त्याच्या यशाचे खरे गमक…
*शिवसेना धोंडखारच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम* रोहा:समीर बामुगडे रोहा : शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना धोंडखार यांच्या माध्यमातून धोंडखार, खैराळे आणि गडबल येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम ग्रामस्थांकडून आणि पालकांकडून कौतुकास पात्र ठरला. या सामाजिक उपक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चनेरा उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, युवा सेना उपतालुका प्रमुख सुदर्शन गावडे, शिवसेना शाखाप्रमुख सनी म्हात्रे, खैराळे उपशाखा प्रमुख रामचंद्र गंभे, युवा सेना चनेरा…
रोहा अष्टमी नगर परिषदेच्या शालेय इमारतीसाठी ५ कोटींचा निधी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून निधीपत्राचे वितरण रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीचे पत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रदान केले. या निधीतून शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम व विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून, शाळेचा आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज असा कायापालट होणार आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेचे शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रवींद्र चाळके यांनी शाळेच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने हा महत्त्वाचा…
कोलाड आंबेवाडी नाक्यावर खड्ड्यात गाड्या अडकण्याच्या प्रक्रिया सुरू, पाहणी करणारा कोणी मंत्री शिल्लक राहिले आहे का? नागरिकांचा सवाल, सर्व्हिस रस्ते निकामी, ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष. कोलाड (श्याम लोखंडे) मागील सोहळा सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या पावसात भयानक खड्डे पडण्यास सुरू झाले असून भले मोठे खड़े पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर एवढ्येच नव्हे तर त्यात आता वाहने अडकून बंद पडत आहेत.कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सर्व्हिस रस्त्याची रडकथा रोड झाला निकामी तर नव्याने बनविण्यात आलेल्या उड्डाण फुलाखाली जीवघेणे खड्डे दुचाकी अडकून होतात अपघात भला मोठा खड्डा पडल्याने त्यात वाहने अडकून…
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल! प्रतिनिधी /गणेश पवार रायगड जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरून त्यातील शिसे विकणाऱ्या सराईत टोळीचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रायगड आणि नवी मुंबई परिसरातील एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत येथील इंडस मोबाईल टॉवरवरील अमराज कंपनीचे २४ बॅटरी सेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

