Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) भारत देशाच्या 80 व्या.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्रशाळा,नांदगाव नं. १ शाळेत तालुका पंचायत समितीचे सभापती निलेश घाटवळ यांच्याहस्ते इंग्रजी लॅब (संगणक कक्ष)चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती निलेशजी घाटवळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डिजिटल लॅब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे तसेच याचा सर्वतोपरी वापर करण्यात यावा.असे सांगितले . पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, दळवी सर,माळीसर,सरपंच सेजल घुमकर,उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्य वैशाली रणदिवे,जितू दिवेकर नितीन पवार, अस्लम हलडे,योगेश जायस्वाल,गणेश गाणार, गजानन मुंबईकर तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष…

Read More

रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा व मंगलवाडी शैक्षणिक संकुलाच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजता मंगलवाडी शाळा संकुलात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. रोहा नगरपरिषदेचे शिक्षण सभापती श्री. रविंद्र सुधीर चाळके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमात माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी नगरसेवक अजित मोरे,…

Read More

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न. प्रतिनिधी / किशोर पितळे देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यातआला.नगरपंचायत,पंचायत समिती,प्राथमिक शाळा,उर्दु शाळा, हायस्कूल, काँलेज,इंजिनिअरिंगकाँलेज,पोलीस ठाणे,येथे नियोजना प्रमाणे ध्वजारोहण संपन्न झाला.मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.०५ वा.मा. तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला.यावेळी देशभक्ती पर समुह गान, राष्ट्र गीत,राज्य गीत विद्यार्थ्यांनी सादर केले व मानवंदना दिली तसेच पोलीसांनी मानवंदना दिली. यावेळी तालुक्याच्या वतीने महसूल विभागाच्या महसुली वर्षभरामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मंडळ अधिकारी खाडे मँडम यांचा व नेपाळ काठमांडू येथे बाँक्सिंग स्पर्धेत सिल्व्हरमेडल प्राप्त केलेल्या कु.चैतन्य स्मिता योगेश पितळे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आठ वर्षाच्या…

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न. तळा:किशोर पितळे दिनांक 13/08/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा मा. श्रीमती गीताताई उत्तम जाधव ( रायगड जिल्हा परिषद सदस्य )यांच्या अध्यक्षतेखाली डॉ अभय ससाणे (तालुकाआरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली या सभेस प्राथमिक आरोग्य केंद्र तळा वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र मोधे जन आरोग्य समितीचे सदस्य सचिव श्रीमती दीपाली शेळके ICDS सदस्य श्रीमती जान्हवी शिंदे सदस्य श्रीमती माधुरी घोलप नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे उपनगराध्यक्ष मंगेश भगत डॉ स्मिता पाटील सदस्य श्रीमती सविता पाटील (LHV ) सदस्य इत्यादी मान्यवर व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते. या सभेस दुखवटा व…

Read More

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे तळा:किशोर पितळे तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, रायगड येथील IQAC व नॉलेज रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सकाळी १० .00 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांच्या हस्ते डॉ .एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आले व मुबई विद्यापीठ पुस्तक पेढी अंतर्गत महाविद्यालय विद्यार्थानसाठी स्पर्धा परीक्षा विषयी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रसंगी प्राध्यापक,प्रध्यापकेतर कर्मचारी आणि विधार्थी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता .दुपारी ३.वाजता “Smart Learning with Google Drive and…

Read More

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोह्याची सुकन्या आणि रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व. प्रफुल्लशेठ बारटके यांची नात, तसेच डॉ. प्रसाद बारटके व डॉ. सौ. पल्लवी बारटके यांची कन्या कु. पावनी प्रसाद बारटके हिने भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अबुधाबी येथील भारतीय दूतावासातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत (Extempore Speech Competition) प्रथम क्रमांक पटकावला आहे. १२ ते १६ वर्षे वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पावनीसमोर ‘भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध’ हा विषय होता. पावनीने उत्स्फूर्त वक्तृत्व, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि प्रभावी अभिव्यक्तीच्या जोरावर…

Read More

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद. प्रतिनिधी कर्जत / गणेश पवार कर्जत तालुक्यातील कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था समोर आणणाऱ्या तीन शाळकरी मुलींशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या तीन पैकी एक विद्यार्थी खांडपे येथील मानसी पवार यांच्या घरी तिन्ही मुली आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी फोनवरून मुलींशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. व पुढील कोणत्याही मदतीसाठी आदित्य ठाकरे व युवासेना सोबत असल्याचे आश्वासन दिले. युवासेनेच्या राज्य कार्यकारणी समिती कडून तिन्ही विद्यार्थिनींचा…

Read More

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी रोहा | प्रतिनिधी नंदकुमार बामुगडे काल आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री महोदया अदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सूचनेनुसार जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. याठिकाणी येणारे पाणी योग्य पद्धतीने डायव्हर्ट करून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काम लवकरात लवकर सुरू करता येईल का, याबाबत पाहणीदरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पाहणीदरम्यान निश्चित करण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार पुढील कार्यवाहीची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. रोड एक्स्टेंशन व संबंधित बांधकामाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही…

Read More

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन! शहर बचाव समितीचे नगरपरिषद प्रशासनाला स्मरणपत्र; पाणी, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, गटार, भूमिगत वीज आणि आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची मागणी! प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत  कर्जत शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून आता कर्जत शहर बचाव समितीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणीपुरवठ्यापासून वाहतूक कोंडीपर्यंत… स्वच्छतेपासून आरोग्य सुविधांपर्यंत… तब्बल ५० नागरी प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा समितीचा दावा आहे. शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करावा, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि नियमित पाणी तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी…

Read More

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा! विद्यार्थिनींच्या व्हिडिओतून रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; वाहनांचे नुकसान, दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला! प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत  कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यांनी अधिकच उग्र रूप धारण केले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये…

Read More