तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
प्रतिनिधी / किशोर पितळे
देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यातआला.नगरपंचायत,पंचायत समिती,प्राथमिक शाळा,उर्दु शाळा, हायस्कूल, काँलेज,इंजिनिअरिंगकाँलेज,पोलीस ठाणे,येथे नियोजना प्रमाणे ध्वजारोहण संपन्न झाला.मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.०५ वा.मा. तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते तहसील कार्यालय प्रांगणात साजरा करण्यात आला.यावेळी देशभक्ती पर समुह गान, राष्ट्र गीत,राज्य गीत विद्यार्थ्यांनी सादर केले व मानवंदना दिली तसेच पोलीसांनी मानवंदना दिली. यावेळी तालुक्याच्या वतीने महसूल विभागाच्या महसुली वर्षभरामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मंडळ अधिकारी खाडे मँडम यांचा व नेपाळ काठमांडू येथे बाँक्सिंग स्पर्धेत सिल्व्हरमेडल प्राप्त केलेल्या कु.चैतन्य स्मिता योगेश पितळे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आठ वर्षाच्या कु. चार्वी निलम अभिजित कोलवणकर हिने चीन मधील शांघाय येथे आयोजित एशियन गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्सच्या आर्टिस्टिक या क्रीडा प्रकारात तिने Vault, Beam, Bar आणि Floor या चारही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावतआपल्या असामान्य गुणवत्तेचा ठसा उमटवला. इतकेच नव्हे तर सर्व प्रकारांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑल राऊंड चॅम्पियन म्हणूनही चार सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. तसेच किशोर पितळे पत्रकार यांना “जीवन गौरव पत्रकार” पुरस्कार माणगाव प्रेस क्लब तर्फे सन्मान पुर्वक१६आँगस्ट रोजी दिला जाणार आहे.हे तालुक्याला अभिमानाचे असल्याने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.गेली अनेक वर्षांपासूनतालुक्यातील विशेष गुणवंत विद्यार्थी,शेती सामाजिक क्षेत्र,क्रीडा क्षैत्रात विषेश प्राविण्यप्राप्तमान्यवरांचा व्यक्तीचा सन्मान करण्याची परंपरा राखली आहे. या कार्यक्रमाला पंचायत समिती बिडीओ,पोलीस निरीक्षक, नगरपंचायत सि.ई.ओ.नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष,आजी माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ कर्मचारी वर्गपोलीस पाटील, कोतवाल,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.