Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा. तळा -किशोर पितळे  रायगड पालक मंत्री पद गेली तीन वर्ष रिक्त असल्याने रायगडाचा विकास नियोजना ला गती मिळत नव्हती.पालकमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेना पक्षात मोठी रस्सीखेच सुरू होती शिवसेनेचे अधिक आमदार असल्याने साहजीकच शिवसेनेचा दावा होता त्यामुळे राजकीयवातावरण चांगलेच तापले होते पालकमंत्रिपदा वरून रंगलेल्या राजकारणाचा अखेर शेवट झाला रायगडच्या पालक मंत्रिपदासाठी अखेर भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब.झाल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला. मंत्री भरतशेट गोगावले पालकमंत्री झाल्याचे जाहिर होताच रायगड शिवसेनेत ठिक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला तळा बळीचा येथे फटाक्यांची आतषबाजी करीत घोषणा देत लाडू वाटून गुलालाची उधळण करीत…

Read More

*नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता* रोहा:समीर बामुगडे तळा : तळा तालुक्यातील सोलमवाडी परिसरातील नदीलगत केमिकलयुक्त द्रव्य सोडून पर्यावरण प्रदूषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोलमवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने तळा तहसील प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी व चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास MH-10-CR-9253 आणि MH-23-W-3106 क्रमांकाचे केमिकलयुक्त द्रव्याने भरलेले ट्रक निगुडशेत रोडवरील वाशी व निगुडशेत हद्दीतील नदीलगतच्या परिसरात आणून उभे करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणी केमिकलयुक्त द्रव्य सोडण्यात आल्याने ते नदीच्या पाण्यात मिसळले असून…

Read More

खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब विभागात इंग्रजी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंजुळा वेल्फेअर अँड सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मागील तीन दिवस शाळेत तिरंगा दिवस साजरा करण्यात आला तर संपूर्ण शाळा येथील विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान विज्ञान प्रतिकलाकृती साकारण्यात आली होती तर या शाळेचा ध्वजारोहण शाळेचे संस्थापक ॲड. रविंद्र लोखंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी हभप नारायण महाराज लोखंडे,संचालक सुधीर लोखंडे,डॉ श्याम भाऊ लोखंडे, शंकर धनावडे,दिलीप मोहिते, संतोष महाडिक, प्रदीप मरवडे, राम भालेकर, महाबळे सचिन गोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका रिया लोखंडे,शिक्षिका…

Read More

लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) कोलाड शिक्षण प्रसारक मंडळाच्या एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संदिपजी तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला माजी पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. विश्वनाथ पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. स्कूलच्या कमांडो पथकाने मान्यवरांना शानदार गार्ड ऑफ ऑनर देत कार्यक्रमाची शिस्तबद्ध सुरुवात केली. कार्यक्रमाची प्रास्ताविका…

Read More

यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन, रोहा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन शनिवारी, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आशियाना बिल्डिंग, खारी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अभय शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमास रोह्याचे उपविभागीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुटवड, रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेंडगे, उपनगराध्यक्ष श्री. अहमद दर्जी, नगरसेवक तसेच युवा आधार संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. यंग युनिटी…

Read More

लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान. पुगाव – रोहा (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यात तसेच कोलाड परीसरात लायन्स क्लब ऑफ कोलाडच्या नवीन टीमचा पदग्रहण सोहळा क्लबचे अध्यक्ष ॲड रविंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी १५ ऑगस्ट रोजी खांब परिसरातील रायगड ट्रॉफिकल नडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ चे जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन प्रविण सरनाईक आणि एम जे एफ लायन श्रुति सरनाईक,जिल्हा कॅबिनेट सेक्रेटरी पी एम जे एफ लायन नयन कवळे, प्रमुख पाहुणे रिजन चेअर पर्सन एम जे एफ लायन विद्या अधिकारी,…

Read More

तळाघर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रुपेश शिंदे यांची बिनविरोध निवड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या रुपेश शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी; अभिनंदनाचा वर्षाव प्रतिनिधी : सायप्रसाद आडाव चणेरा ग्रामपंचायत तळाघर अंतर्गत तंटामुक्त समितीची नूतन कार्यकारिणी नुकतीच बिनविरोध निवडण्यात आली. या निवडीत रुपेश शिंदे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षपदी ज्ञानदेव सुटे, सचिवपदी प्रकाश शिर्के, तर सदस्य म्हणून गजानन मोडे, गणेश दे. मोरे आणि विठोबा भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणीची निवड एकमताने झाल्याने गावातील सामाजिक एकोपा आणि सलोख्याचे दर्शन या…

Read More

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) अष्टमी येथील डायमंड एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असून या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सामाजिक प्रतिष्ठान तर्फे नक्कीच सहकार्य करणार असल्याचे अभिवचन ओमेज ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांनी दिले. या शाळेच्या दोन वर्गखोल्यांमध्ये करण्यात आलेल्या टाइल्स कामाचे लोकार्पण तसेच नवीन विज्ञान प्रयोगशाळेच्या भूमिपूजन अध्यक्ष प्रमोद म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दोन वर्गखोल्यांमधील टाइल्सचे काम माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या…

Read More

रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार! उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते येत्या ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव साजरा होणार असून, उत्सवाला अवघे १९ दिवस शिल्लक असताना रोहा तालुक्यातील गोविंदा पथकांनी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. गावोगावी मंदिरांसमोर, शाळांच्या पटांगणात तसेच मोकळ्या मैदानांवर ७ ते ८ थरांचे मानवी मनोरे रचण्याचा थरारक सराव सुरू असून, गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहा तालुक्यातील कालभैरव बोरघर, जय बजरंग लाढंर, तळाघर, निवी, धाटाव, किल्ला, रोठ खुर्द, देवकान्हे, नागोठणे, आमडोशी, कडसुरे यांसह अनेक गावांतील गोविंदा पथकांनी यंदाच्या दहीहंडीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पथकात साधारण १०० ते…

Read More

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी ! ​ कोर्लई,ता.१६(राजीव नेवासेकर) रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु.मुग्धा पाटील हिने द्वितीय क्रमांक तर कु.करिष्मा हिरवे हिने तृतीय क्रमांक पटकावला ! ​ वसंतराव नाईक महाविद्यालयातून एकूण चार विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. सहभागी व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.श्रीशेल भैरगुंडे यांचे विशेष मार्गदर्शन…

Read More