Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च लक्षात घेऊन १० वर्षानंतर पाणीपट्टीत वाढ नागरिकांना पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध – नगराध्यक्षा वनश्री शेडगे
ताज्या बातम्या

पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च लक्षात घेऊन १० वर्षानंतर पाणीपट्टीत वाढ नागरिकांना पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध – नगराध्यक्षा वनश्री शेडगे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 22, 2026Updated:June 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पाणीपुरवठा योजनेचा वाढता खर्च लक्षात घेऊन १० वर्षानंतर पाणीपट्टीत वाढ
नागरिकांना पाणी देण्यास आम्ही कटिबद्ध – नगराध्यक्षा वनश्री शेडगे

रोहा प्रतिनिधी (नंदकुमार बामुगडे )
मागील २०१२ आणि २०१६ या वर्षांमध्ये पाणीपट्टी मधे वाढ झाल्यानंतर रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवर वाढत्या खर्चाचा ताण पडत असून, नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू ठेवण्यासाठी तब्बल १० वर्षांनंतर पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात आली असून पुढे ५ वर्ष यामध्ये वाढ होणार नाही अशी माहिती नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी काल आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासनाने सुचविलेल्या दरापेक्षा कमी दर निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या कै.द.ग. तटकरे सभागृहात वाढीव पाणीपट्टी या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, पाणीपुरवठा सभापती महेंद्र दिवेकर, मुख्याधिकारी अजय एडके, पर्यटन व नियोजन सभापती महेश कोलाटकर, शिक्षण सभापती रविंद्र चाळके, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, पूर्वा मोहिते, नीता हजारे, फराह पानसरे यासह पत्रकार तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
वाढीव पाणीपट्टी वरील संबंधित आकडेवारीनुसार सन २०२५-२६ मध्ये पाणीपट्टीतून सुमारे १ कोटी
३६ लाख ४९ हजार ६७६ रुपये उत्पन्न मिळाले असून, पाणीपुरवठा विभागाचा अपेक्षित खर्च ३ कोटी २ लाख ७५ हजार रुपये इतका आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. एल निनोच्या परिणामामुळे पावसाचे प्रमाण घटल्याने भविष्यात पाण्याची उपलब्धता आणि व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे वीजबिलात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ, कच्च्या पाण्याच्या देयकांमध्ये झालेली वाढ, महागाई आणि पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीवरील वाढता खर्च यामुळे पाणीपट्टी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा शेडगे यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार पाणीपट्टीमध्ये वार्षिक ३६०० रुपयांपर्यंत वाढ अपेक्षित होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून नगरपरिषदेने ही वाढ कमी करीत २८०० रुपये इतकी ठेवली असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.

याप्रसंगी “नगरपरिषद ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर शहराला पाणीपुरवठा करत आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेला खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या पाणीपट्टीबाबत काही शंका अथवा गैरसमज असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. अफवांवर विश्वास ठेवू नका. रोहेकरांना मान खाली घालावी लागेल असे वागले जाणार नाही. आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी नागरिकांनी नगरपरिषदेसोबत संवाद साधावा. रोहेकरांना अखंड व सुरक्षित पाणीपुरवठा देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असे रोहा-अष्टमी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती महेंद्र दिवेकर यांनी आपली भूमिका मांडली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us