मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण ! कोर्लई, ता.३०(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील मजगांव आगरआळी येथे सप्तरंगी मित्र मंडळातर्फे साखरचौथ गणपती ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी श्रीमुर्ती पूजेचा बहुमान गजानन भोईर व त्यांच्या सौभाग्यवती सौ.पुजा यांना तर आरतीचा मान दिपक घाग आणि त्यांच्या पत्नी सौ.उज्वला यांना मिळाला. मजगांव आगरआळीतील सप्तरंगी मित्र मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून साखरचौथ गणपती स्थापनेचे यंदा अकरावे वर्ष होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी गणपती मिरवणूकीचे आगमन झाले.दुस-या दिवशी मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ८.३० वा.गजानन हरि भोईर व यांच्या सौभाग्यवती सौ.पुजा हस्ते श्री मुर्तीची विधिवत पूजा अर्चा करून प्राण प्रतिष्ठापना व…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे धाक्सुद क्रीडा मंडळ यांच्या वतीने श्री साखरचौथ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा १० वा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व गणेशभक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे स्थान असलेल्या श्री साखरचौथ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गावातील ग्रामस्थ महीला माता भगिनी भाविकांची मोठ्या श्रद्धेने पूजा आरती भक्ती भावाने दर्शन घेतले. सालाबादप्रमाणे यंदाही धाक्सुद क्रीडा मंडळ व चिल्हे ग्रामस्थ महीला मंडळाच्या वतीने जुनी परंपरा रूढी नाच गाणी भजन विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे होते. मंगळवार, दि.…
धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा शहरातील धनगर आळी येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा १७वा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व गणेशभक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे स्थान असलेल्या श्री साखरचौथ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही धनगर आळी मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रींची स्थापना करण्यात आली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवानिमित्त आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री…
शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे बाजारपेठेतील नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदाच्या पुजेचा मान श्री व सौ.परिन्दा दिपेश मोदी यांना मिळाला. नांदगाव मधील शिवशाही प्रतिष्ठान साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने सन.२०१३ पासून साखर चौथ गणपती बसविला जात असून यंदाचे चौदावे वर्ष आहे. या आयोजित सोहळ्यामध्ये प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून महेश मापगांवकर,सुदेश घुमकर,शैलेंद्र दिवेकर,विलास सुर्वे, उदय थळे, सुयोग इंदुलकर, सुमित कांबळे,मनोहर (नाना) दिवेकर,दिनेश शाहपूरकर,नरेश कुबल, योगेश जयस्वाल, सेजल घुमकर यांना साखरचौथ गणपती पुजेचा मान मिळाला.…
राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके कोर्लई,ता. २९(राजीव नेवासेकर) ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे संपन्न झालेल्या १३ वी राज्यस्तरीय तांग सू डो. कराटे स्पर्धेत रायगड च्या कराटेपट्टूंनी ४ सुवर्ण, ४ रजत, ५ कांस्यपदके मिळवून चमकदार कामगिरी केली ! तेलंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मार्गदर्शनात, तेंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील सेंट विल्फ्रेड हायस्कूलमध्ये १३ वी राज्यस्तरीय तेंग सू डो कराटे स्पर्धा दि. २६ व दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली. त्यात राज्यभरातील अनेक कराटे संघटनांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मजगाव -…
जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण. तळा-किशोर पितळे १आँक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिन गोरेगांव रायगड येथे साजरा होणार असून सदर दिन हा घरडा केमिकल्स लि.प्रायोजित आय एल सी आय,इंटरनँशनल लाँगव्हिटी सेंटर इंडिया (आंतरराष्ट्रीय दिर्घायुष्य केंद्र भारत (पुणा) संस्था यांच्या सौजन्याने, रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाची समन्वय समिती यांच्या सहकार्याने रुक्मिणी बेन नथुराम शेठ मंगल कार्यालय गोरेगांव रायगड येथे सकाळी १०ते दुपारी ४वाजे पर्यंत साजरा होत आहे. सदर स्नेह मेळावा (आनंदमेळावा) मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा केला जाणार आहे. चहा, नाश्ता, भोजन, चहा अशी सोय केली आहे या आनंददायी सोहळ्यात जिल्ह्यातील ६५ संघटना सहभागी होणार आहेत.अशी रायगड जिल्हा समन्वयक समीती…
श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश मनोर गोरे यांच्या नेतृत्वावर तसेच आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश रोहा : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विरजोली ग्रामपंचायतीमधील विरजोली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. युवा नेतृत्व मनोर गोरे यांच्या नेतृत्वावर तसेच दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी विरजोली गावातील तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्वीकारत पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी रोहा तालुका युवासेना तालुकाप्रमुख रोशन पवार तसेच अष्टमी गावचे युवा नेतृत्व अमलकांत मोरे यांची उपस्थिती होती. या…
‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) VRTI, ग्रामपंचायत रोठ बुद्रुक आणि SVRSS यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. SVRSS चे प्रशिक्षक प्रणित कोतवाल व VRTI यांच्या वतीने एक्सेल कंपनीचे सेफ्टी मॅनेजर यांनी विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये घ्यावयाची खबरदारी तसेच जीवनरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये आग प्रतिबंध व नियंत्रण, घरगुती अपघात व सुरक्षितता, प्राथमिक उपचार, CPR (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया) तसेच आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची खबरदारी आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थिनी व ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने कशी मदत करावी, याबाबत उपयुक्त…
सेवादल आळी सन्मित्र मंडळातर्फे मोफत शरीर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर प्रतिनिधी रोहा सेवादल आळी सन्मित्र मंडळाच्या वतीने गणेश मंदिर येथे मोफत शरीर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०० हून अधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये केशवी वेलनेस सेंटर यांच्या सहकार्याने मोफत बॉडी फॅट चेकअप करण्यात आले. तसेच नागरिकांची प्राथमिक शरीर तपासणी करून आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवादल आळी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, उपाध्यक्ष मयूर सावंत तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी…
*तळ्याच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात भरारी.कु.एकता ठक्कर ने स्वप्न केले साकार. *संभाजीनगर येथे पदवी प्रदान सोहळ्यात बी.एस्सी. नर्सिंगची पदवी; तळा : किशोर पितळे:(प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या ग्रामीण डोगंराळ भागात अनेक हिरे जन्माला आले आहेत राजकीय, सामाजिक,क्रीडा ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रात नांव लौकिक प्राप्त केला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देखील शैक्षणिक दृष्ट्या काकणभर सरस प्रगतीचा आलेख वाढतो आहे.आर्थिक पाठबळ असून काहीजण वेगळे क्षेत्र निवडतात तर काही जण जागेपणी बघीतलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करीत असतात.आणी आई वडील मुलांच्या स्वप्नाला बळकटी देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही आर्थिक पाठबळ देतात.तळा येथील एकता हर्षद ठक्कर हिने बी.एस्सी. नर्सिंग या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन करून उल्लेखनीय…

