Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर
ताज्या बातम्या

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक
प्रमोद म्हसकर

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

अष्टमी येथील डायमंड एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल असून या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सामाजिक प्रतिष्ठान तर्फे नक्कीच सहकार्य करणार असल्याचे अभिवचन ओमेज ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांनी दिले.
या शाळेच्या दोन वर्गखोल्यांमध्ये करण्यात आलेल्या टाइल्स कामाचे लोकार्पण तसेच नवीन विज्ञान प्रयोगशाळेच्या भूमिपूजन अध्यक्ष प्रमोद म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दोन वर्गखोल्यांमधील टाइल्सचे काम माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले. यावेळी बोलताना शेडगे म्हणाले की, खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने शाळा इमारत बांधण्यात आली.तर काही दिवसापूर्वी संवरक्षण भिंतीच्या कामासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शाळेच्या विकासासाठी जनार्दन शेडगे मित्रमंडळ व दानशूर व्यक्तींकडून सहकार्य लाभले आहे.भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करत राहू अशी ग्वाही शेडगे यांनी दिली.

विज्ञान प्रयोगशाळेच्या उभारणीसह शाळेच्या वॉल पेंटिंगसाठी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन प्रमोद म्हसकर यांनी दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला आणखी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डायमंडचे अध्यक्ष समीर दर्जी, जमात अध्यक्ष शफी पानसारी, डायमंड खजिनदार मुनव्वर पठाण व सचिव अफसर करजीकर , राहील नागोठकर, इम्तियाज दर्जी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कॅप्टन प्रसाद तेलंगे,ॲड. हर्षद साळवी, यतीन धुमाळ यांच्या समवेत प्रतिष्ठानचे सदस्य व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us