Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !
  • निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन
  • रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण
  • तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण
ताज्या बातम्या

रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा व मंगलवाडी शैक्षणिक संकुलाच्या वतीने शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.२५ वाजता मंगलवाडी शाळा संकुलात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.
रोहा नगरपरिषदेचे शिक्षण सभापती श्री. रविंद्र सुधीर चाळके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमात माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी नगरसेवक अजित मोरे, नगरसेविका डॉ. प्रियांका धनावडे, सौ. गौरी बारटक्के, सौ. सुप्रिया जाधव, माजी नगरसेवक श्री. सुभाष राजे, माजी नगरसेविका श्रीमती सुजाता चाळके सामाजिक कार्यकर्ते श्री. स्वप्नील धनावडे, श्री. प्रेषित बारटक्के, सुरेश मोरे सर यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, घोषणा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंगलवाडी शैक्षणिक संकुलात उत्साह आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. स्मिता गुरव, सौ. वैदेही वि. सायगावकर, श्री. अजय लहू गायकवाड, श्री. ईश्वर दामु लाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘स्वातंत्र्याचा अभिमान मनात, राष्ट्रसेवेचा संकल्प कृतीत’ या भावनेने मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !

August 16, 2026

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

August 16, 2026

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !

August 16, 2026

निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन

August 16, 2026

रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 16, 2026

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us