Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

उच्च शिक्षित हर्षचा अकाली मृत्यू सर्वांच्या जीवाला चटका लाऊन जाणारा, दुःखाने सर्वत्र हळहळ. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर कुणबी समाजोन्नती मुंबई संघाचे सदस्य तसेच कुणबी संघटनेचे माजी रोहे शहराध्यक्ष प्रा.माधव आग्री यांचा सुपुत्र शैक्षणिक क्षेत्रात प्रगत असलेल्या युवा उमेदीचा कु. हर्ष वय वर्षे २५ याचा दुर्दैवी अकाली मृत्यू हा साऱ्यांच्या जिवाला चटका लाऊन जाणारा,तर त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आग्री परिवारावर मोठे दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे. प्रा.माधव आग्री यांचा थोरला मुलगा कु.हर्ष यांनी बी फार्मसीचे उत्तम शिक्षण घेतले घरातील साऱ्या कुटुंबियांचा सर्वांचा लाडला मात्र त्यालाच नियतीने बोलावणे…

Read More

रायगड प्रेस क्लब व कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव. कर्जत प्रतिनिधी /गणेश पवार  रायगड प्रेस क्लबच्या वतीने आणि संलग्न कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून आयोजित ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा बुधवार (दि. १५ जुलै) रोजी कर्जत तालुक्यातील दुर्गम मार्गाचीवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी पाथरज मार्गाचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी नरदास दामा पारधी तसेच नांदगाव-चाफेवाडी येथील प्रगतशील शेतकरी जगन लक्ष्मण पादिर यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२६’ प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत पारंपरिक शेतीला पूरक व्यवसायाची यशस्वी जोड देत प्रगतशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या…

Read More

ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व वृक्षारोपण. तळा -किशोर पितळे ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन १४जुलै २६रोजी करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिताताई जाधव,पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,सरपंचा रेणूका चाळके, डॉ.संदीप शिंदे पशू वैद्यकीय अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम,दिपक चाळके,रसिका पवार, विठाबाई तळेगांवकर,दिपक चिंचाळकर,गाव अध्यक्ष भगवान शिंदे,पोलीस पाटील किशोरकदम,ग्रामपंचायत अधिकारी रुपाली करबत उपस्थित होते. यावेळी जनावरांचे लसीकरणाचे महत्व शेती पुरक व्यवसायास चालना देण्यात पशुधनाचे महत्त्व आहे त्यांचा सांभाळ करणे पशु मालकाचे कर्तव्य आहे. त्यांना वेळोवेळी तपासणी करून,औषधोपचार करणे, कोणते खाद्य देणे याबाबत मार्गदर्शन करुन पशु…

Read More

देशाभिमान, सामाजिक उत्तरदायित्व आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उत्तुंग यश प्राप्त करा – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे प्रथम ,द्वितिय, तृतीय वर्ष पदवी ,पदव्युत्तर वर्गातील व पी.एच.डी. पुरस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज (दि. १३) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून  संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता मा. डॉ. कविता लघाटे तसेच जे.बी.एस.पी. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार  प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या प्रसंगी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन  वाय. टी.…

Read More

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न. तळा-किशोर पितळे-(प्रतिनिधी) रायगड.जि. प.शाळा तळेगाव तळे येथे मा.डॉ.श्री.संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अलिबाग ) शालेय विद्यार्थ्यांना दंत आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन करताना बोलत होते, यावेळी डॉक्टर संतोष झापकर यांचे मुख्याध्यापक शिंदे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मानवी दाताची रचना व त्याचे कार्य व त्याच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य किती महत्वाचे आहे व कँल्शिअम कमतरता असेल तर दात किडण्याचे प्रमाण अधिक असते…

Read More

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष* रोहा:समीर बामुगडे रोहा शहरातील काही हॉटेल, मिठाई दुकाने तसेच भेळपुरी विक्री केंद्रांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता तपासण्यासाठी संबंधित आस्थापनांची तातडीने पाहणी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची तयार करण्याची व विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवणे, स्वच्छ पाण्याचा अभाव, परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत…

Read More

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी तळा -किशोर पितळे तळा तालुक्यातील महागांव ग्रामपंचायत तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व माझी वसुंधरा अभियान 7.0 मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचरे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संत वाणी प्रमाणे माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण वरदायनी मंदिर परिसरात ग्रुप ग्रामपंचायत महागाव वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशासकतथाविस्तारअधिकारी नेरकर ,कृषी विस्तार अधिकारी मुंढे, डॉ.रघुनाथ पोवार ,ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा तांबडे,मंदिराचे ट्रस्टी व सर्व पदाधिकारी,माजी सरपंच विठोबा साबळे ,पोलीस पाटील मांगले कांतिलाल कसबळे ग्रामस्थ मंडळ, महागाव केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक महागाव आदिवासी वाडी सुनील बैकर व ग्रामपंचायत कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थीत होते.सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण…

Read More

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप. कोलाड (श्याम लोखंडे) रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा कोकण विकासाचे शिलेदार खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील देवकान्हे ग्राम पंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप असा सुप्त उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठी उद्योजक अंकिता नारायण कान्हेकर व नारायण कान्हेकर या दाम्पत्याने हद्दीतील बाहे, देवकान्हे, देवकान्हे आदिवासीवाडी, धानकान्हे आणि धानकान्हे आदिवासीवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य संदेश दिला. तसेच यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपसभापती बाळकृष्ण…

Read More

तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता. तळा -नझीर पठाण रोहा मुख्य मार्गावर फुगारेवाडी फाटा नदीच्या जवळील जागा मालकाच्या हलगर्जी पणामुळे जमीन साफसफाई झाडे झुडपे तोडल्याने व जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण माती काढल्याने सदर माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली असून चारचाकी वाहने दुचाकी, मिनिडोअर रिक्षा,अँटोरिक्षा, मोटार सायकल घसण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र सुदैवाने मोठी जीवीत हानी झाली नसलीतरी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.जमीन मालकाने प्लॉट साफ करून रस्त्यावर आलेल्या मातीच्या भरावाला जागा मालकाच्या हलगर्जीपणामुळेचत्रास भोगावा लागत आहे त्याची व्यवस्था न केल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता असून याला सर्वस्वी जबाबदार जागा मालक असून सार्वजनिक बांधकाम (रोहा)…

Read More

अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा रेल्वे स्टेशन शेजारी उड्डाण पुलाचे काम मागील तीन चार वर्ष अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे, त्याच कामामुळे दोन्ही बाजूकडील रस्ता कायम धोकादायक ठरतो आहे, याबाबत वारंवार तक्रारी झाल्या, आढावा बैठकीत राग व्यक्त झाला, तो रस्ता संबंधित प्रशासनाने सुरक्षित न केल्याने अखेर गुरुवारी उशिरा सायंकाळी भातसई येथील तरुणासाठी यमदूत ठरला, याआधीही याच रस्त्याने दोघांचा बळी घेतला, त्याच पर्यायी मार्गावरील जीवघेणे खड्ड्यांमुळे संकेत जनार्दन कोतवाल (३२)…

Read More