Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
ताज्या बातम्या

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 11, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

कोलाड (श्याम लोखंडे)

रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा कोकण विकासाचे शिलेदार खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील देवकान्हे ग्राम पंचायत हद्दीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप असा सुप्त उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठी उद्योजक अंकिता नारायण कान्हेकर व नारायण कान्हेकर या दाम्पत्याने हद्दीतील बाहे, देवकान्हे, देवकान्हे आदिवासीवाडी, धानकान्हे आणि धानकान्हे आदिवासीवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य संदेश दिला. तसेच यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी उपसभापती बाळकृष्ण बामणे, देवकान्हे गोविंदा पथकाचे अध्यक्ष संतोष भोईर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश जंगम, देवकान्हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन भोईर, शिक्षक वैशाली माळी,हणमंत हाके, महेश जगताप,सुगत राठोड, प्रणाली जंगम, रुची सामंत, रविंद्र कान्हेकर,जनसेवक संदेश गायकवाड, शरद कचरे, राम शेडगे,यांच्यासह ग्रामस्थ, पालक आदी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण हा समाजपरिवर्तनाचा पाया असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम ठरल्याने सामाजिक, शैक्षणिक , कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, अशा विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे नारायण कान्हेकर दाम्पत्यांनी सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळण्याबरोबरच समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us