Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रोहा-अष्टमी नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा-अष्टमी नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. यावेळी नगराध्यक्षा कु. वनश्री अवनी समीर शेडगे, उपनगराध्यक्ष श्री. अहमद दर्जी, शिक्षण व क्रीडा सभापती रवींद्र चाळके, नगरसेविका डॉ. प्रियांका धनावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वप्नील धनावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी लाभार्थ्यांचे अभिनंदन करताना…

Read More

माणगाव रेज हद्दीत मोठया प्रमाणात खैर माफियाचा हैदौस माणगाव रेज हि खैर व्यापारीचे माहेर घर झालेले आहे! प्रतिनिधी समीर बामुगड माणगाव तालुक्यात मोठया प्रमाणात सरकारी वनामध्ये सुध्दा राजरोस तोड सुरुआहे सरकरी वन अधिकारीच व्यापारी याचे संबंध रोटी बेटी सारखे झाले आहेत सरकारी वन अधिकारीच जंगलातील खैर झाडे दाखवतात व पैसे घेतात असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे, मा,सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री ,आशुतोष शेडगे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वनपाल इंदापूर सुजित राजमाने,,वनसंरक्षक रातवड सौ,वैशाली भोर, वनसंरक्षक कुशेडे अमिना मनेयार, वनसंरक्षक इंदापूर अशोक कोहाकडे, व रोहा स्टाफ सह याच्या समवेत दि, 18/7/2026/रोजी रात्री 17:00वाजता मौजै भुवन आदिवासी वाडी येथे आरोपी काशिराम मारोती…

Read More

तळा तालुक्यातील लोकशाहीरी परंपरेचा रामचंद्र घाणेकर बुवा महान तारा निखळला. तळा-किशोर पितळे तळा  तालुक्यातील शक्ती-तुरा शाहिरी परंपरेचे खंदे शिलेदार आणि आपल्या सर्वांचे लाडके *’बादशहा*’ श्री.शाहीर रामचंद्र हरी घाणेकर बुवा यांचे आज दिनांक २१/०७/२०२६ रोजी राहत्या घरी पढवण येथे दुःखद निधन झाले म्रुत्यु समयी ६५ वर्षाचे होते.पश्चात ३मुलगे सूना नातवंडेअसा परिवार आहे १० वर्षापूर्वी पत्नी निधनाने खचले होते तरी देखील दु:खावर मात करीत लोकशाहिरी जपली होती.गेले दोन वर्षे उच्च रक्तदाब,डायबेटिस (अर्धांगवायू )पँरालिसिसआजारानेत्रस्त होते.पढवणच्या मातीतजन्मलेला हिरा आपल्या लोकशाहिरीतून रसिकांना मंत्रमुग्ध करून आपली कला सादर करीत असत घरातील प्रतिकूल परिस्थितीत जास्त शिक्षण घेता आले नाही मैदानी खेळाची आवड होती त्याबरोबर बालवयात गणपती सणात…

Read More

अमृत भारत स्टेशन योजनेत रोहा रेल्वे स्थानकाचा समावेश करा; खासदार सुनील तटकरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून रोहा रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करून त्याचा सर्वांगीण पुनर्विकास करण्याची मागणी केली आहे. २१ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात खासदार तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि पुनर्विकासाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. “विरासत भी, विकास भी” या संकल्पनेवर आधारित ही योजना प्रवाशांना…

Read More

तळा रहाटाड रस्त्यावर चिखल खडेमातीचे साम्राज्य. रस्त्यावर माती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण. जमीन मालकावर नागरिकांची कारवाईची मागणी. तळा -किशोर पितळे रहाटाड मुख्य मार्गालगत जमीनी मालकांनी खरेदी करून साईटपट्टीची दैयनीय अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे.सदर रस्ता वेडीवाकडीवळणे,तीव्रउताराचाआहेजमीनमालकाच्या हलगर्जीपणामुळेच जमीन साफसफाई झाडे झुडपे तोडल्याने व जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण माती काढल्याने सदर माती पावसाच्या पाण्याने रस्त्यावर आली असून चारचाकी वाहने दुचाकी,मिनिडोअर रिक्षा, अँटोरिक्षा,मोटार सायकल घसण्याच्या घटना घडल्या आहेत साईटपट्टी फुटभर खोली झाली आहे संपूर्ण रस्त्यावर खडे,मोठी दगडे, खड्डे पडले असून चिखल मातीचे साम्राज्य आहे वाहने चालवताना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहे.एस टी बसचालका च्या तत्परतेने मुळे होणारा अनर्थ टळला मात्र सुदैवाने मोठी…

Read More

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अमोल पेणकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रोहा शहराध्यक्ष, रोहा तालुकाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी शहर, तालुका आणि जिल्हास्तरावर सातत्याने कार्य करत अनेक संघटनात्मक उपक्रम,…

Read More

मांदाड ते खाजणीच्या ब्रिज रस्त्याची दुरावस्था.ठेकेदाराचे दुर्लक्ष.अपघाताची शक्यता. तळा-नझीर पठाण इंदापूर दिघी आगरदांडा रस्त्यावरील मांदाड खाजणी फाटा रस्त्याची एवढी दुर्दशा झाली आहे की खड्ड्यात रस्ता कि रस्त्यावर खड्डे अशी परिस्थिती आसून डपक्याचे स्वरूप आले आहे. या मार्गावरून अनेक प्रवासी, पर्यटक पर्यटनासाठी मुरूड,अलिबागकडे जात असतात या रस्त्यावरून आगरदांडा बंदराकडे मोठे ट्रक खाजगी गाड्या ची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. मोठे मोठ्या खड्डामुळे साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही.गाडीचालतअसताना हेलकावे मिळत आहेत त्याबरोबर मोटार सायकल स्वारांना जीव मुठीत धरून चालवावे लागते. मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागै होणार का?या ठेकेदारांनी मलमपट्टी करूनच काम केले असल्याचे दिसून येत आहे. टेंडर च्या अटी शर्ती प्रमाणे काम…

Read More

जागतिक बुद्धिबळ दिनी रोहा तालुका चेस असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी प्रमोदशेठ म्हसकर रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा तालुक्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि दर्जेदार प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून रोहा तालुका चेस असोसिएशन (आरटीसीए) ची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते मा. श्री. प्रमोदशेठ म्हसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी संकेत खोत, उपाध्यक्षपदी अमर सलागरे, सचिवपदी विक्रांत जाना, सहसचिवपदी विवेक कांबळे, खजिनदारपदी महेश बामुगडे आणि सहखजिनदारपदी योगेश भगत यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आभूषण मिठागरी, विवेक कानडे, ओमकार पवार, अनिकेत पाशिलकर, प्रशांत देशमुख,…

Read More

बांधकाम कामगार महासंघातर्फे *भारतीय मजदूर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त* कामगार आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न रोहा:समीर बामुगडे १९ जुलै २०२६ : बांधकाम कामगार महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, जिल्हा रायगड यांच्या वतीने भारतीय मजदुर संघा च्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आनंद मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री विरेश्वर मंदिर हॉल, महाड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास बांधकाम कामगार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. हरी चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय सचिव मा. श्री. Adv अनिलजी ढुमणे, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. श्री. किरणजी मिलगिर, केंद्रीय…

Read More

निरज महादेव सरसंबे याचे नीट (NEET ) परीक्षेमध्ये घवघवीत उज्ज्वल यश. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील पडम येथील सध्या भुवनेश्वर रोहा येथील कु.निरज महादेव सरसंबे याने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट २०२६ ( National Eligibility Cum Enterence Test-2026 (NEET)) या परीक्षेमध्ये उल्लेखनीय घवघवीत उज्ज्वल यश संपादित केले आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या नीट (NEET-2026 )या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून नुकतीच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये कु.निरज महादेव सरसंबे याने ६०१ गुण संपादन करून उल्लेखनीय यश संपादित करून रोहा तालुक्याचे नाव उज्वल केले. निरजचे पालक दोघेही उच्चशिक्षित आहेत. यशामागे आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन, त्याग व  संपूर्ण…

Read More