राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
कोर्लई,ता. २९(राजीव नेवासेकर)
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे संपन्न झालेल्या १३ वी राज्यस्तरीय तांग सू डो. कराटे स्पर्धेत रायगड च्या कराटेपट्टूंनी ४ सुवर्ण, ४ रजत, ५ कांस्यपदके मिळवून चमकदार कामगिरी केली !
तेलंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मार्गदर्शनात, तेंग सू डो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मीरा रोड येथील सेंट विल्फ्रेड हायस्कूलमध्ये १३ वी राज्यस्तरीय तेंग सू डो कराटे स्पर्धा दि. २६ व दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न झाली. त्यात राज्यभरातील अनेक कराटे संघटनांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मजगाव – नांदगाव येथील कराटेपट्टूंनी या स्पर्धेत एकूण १३ पदकाची कमाई केली. सुवर्ण पदक पटकावणारे कराटेपट्टू काव्य केतन नाक्ती, आर्यन स्वप्नील गद्रे, मंथन वैभव कदम, वेद वैभव कदम यांनी उत्तम लढत देऊन सुवर्ण पदक पटकावले. जय गणेश ठाकूर, अब्दुल रहमान कामिल कापसे, स्वराज सुरेश खोत, शांभवी कुलकर्णी, यांनी रजत पदक मिळवले तसेच कांस्यपदक पटकावणाऱ्या मध्ये सई ठाकूर, श्रीयांश संचित म्हात्रे, नील गिरीश मगर या खेळाडूंचा समावेश आहे.
सर्व कराटेपट्टूंना मास्टर – विजय चंद्रकांत तांबडकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षक प्रियांका सं. गुंजाळ, अभिषेक गजानन तांबडकर, आकांक्षा विजय तांबडकर यांचे मार्गदर्शन लाभले. रायगडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र कौतुक होत आहे.