Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
ताज्या बातम्या

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

कोर्लई,ता.२९(राजीव नेवासेकर)

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या नांदगावच्या शिवशाही प्रतिष्ठान आयोजित साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळातर्फे बाजारपेठेतील नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदाच्या पुजेचा मान श्री व सौ.परिन्दा दिपेश मोदी यांना मिळाला.
नांदगाव मधील शिवशाही प्रतिष्ठान साखरचौथ गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने सन.२०१३ पासून साखर चौथ गणपती बसविला जात असून यंदाचे चौदावे वर्ष आहे. या आयोजित सोहळ्यामध्ये प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून महेश मापगांवकर,सुदेश घुमकर,शैलेंद्र दिवेकर,विलास सुर्वे, उदय थळे, सुयोग इंदुलकर, सुमित कांबळे,मनोहर (नाना) दिवेकर,दिनेश शाहपूरकर,नरेश कुबल, योगेश जयस्वाल, सेजल घुमकर यांना साखरचौथ गणपती पुजेचा मान मिळाला.
नांदगाव च्या विघ्नहर्ता साखरचौथ गणपतीचे दि. २८सप्टेंबर २०२६रोजी आगमन झाले. मंगळवार दि.२९सप्टेंबर २०२६रोजी सकाळी ९.०० वा.श्री मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना, आरती करण्यात आली. यानिमित्ताने सायंकाळी ७.०० वा. ते रात्री ९.०० वा. नांदगाव येथील अक्षय भाटकर व कल्पेश मळेकर यांच्या भजनाचा सुश्राव्य बहारदार कार्यक्रमाने रसिक जनांची मने रिझवली!,कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्री१०.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व रात्रौ १२.०० वा.महाआरती घेण्यात आली. यावेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.बुधवार दि.३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वा. विधिवत पूजा अर्चा, दुपारी १.०० वा.आरती, महाप्रसाद व सायंकाळी ६.०० वा.श्री मुर्ती ची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे.
शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदेश घुमकर, उपाध्यक्ष नितेश रावजी,खजिनदार महेश कोतवाल,सभासद तसेच गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष दिनेश शाहपूरकर, उपाध्यक्ष कुणाल गाणार, सदस्य,मान्यवर ग्रामस्थ यांनी साखरचौथ गणपती सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us