Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

“धर्मो रक्षति रक्षितः”च्या घोषणेत रोहा दुमदुमणार; ३ मे रोजी विराट हिंदू संमेलन रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) हिंदुत्वाची चेतना, संस्कृतीचे भान आणि एकतेची ताकद यांचा संगम अनुभवण्यासाठी रोहा शहर सज्ज झाले आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नदी संवर्धन मैदान येथे ‘विराट हिंदू संमेलना चे भव्य आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाबाबत रोहेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “रोहेकरांनो, जागे व्हा! एकत्र या!” या जोशपूर्ण हाकेसह आयोजित या संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाची एकजूट मजबूत करणे, सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण करणे आणि धर्मजागृती घडवणे हा आहे. या ऐतिहासिक संमेलनात प्रख्यात अभिनेते व प्रभावी वक्ते शरद पोंक्षे उपस्थित राहून हिंदुत्व,…

Read More

रोहा येथे भरधाव मोटारसायकल अपघातात कब्बडीपट्टू अश्विन मिलगिरे १७ वर्षीय युवकाचा मृत्यू रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा-कोलाड मार्गावर भरधाव व बेदरकार मोटारसायकल चालविल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) पहाटे उघडकीस आली. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी नरेश नारायण मोरे (वय ५४, व्यवसाय नोकरी, रा. रोहा) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कोलाड-रोहा रोडवर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. विधीसंघर्षीत बालक विजय महेश कुमावत (वय १७, रा. सदासंयोग कॉलनी, वरसे, ता. रोहा) हा त्याच्या…

Read More

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात अ‍ॅड. अनिषा अनिल शिंदे यांनी एल.एल.एम. (LL.M.) पदवीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे रोहा तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अनिषा शिंदे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्य राखत आणि कठीण परिश्रम, सखोल ज्ञान तसेच चिकाटीच्या जोरावर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान मिळवले. २३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित झालेल्या भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांना हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. अनिषा शिंदे…

Read More

रोह्यात कुंडलिका नदी प्रदूषणाविरोधात नागरिकांचा आवाज; तहसीलदारांना निवेदन सादर रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा शहरातील कुंडलिका नदीत नागरी वस्तीतील गटारांचे सांडपाणी तसेच रासायनिक मिश्रित घाण पाणी थेट सोडले जात असल्याचा गंभीर आरोप करत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर “कुंडलिका नदी बचाव संघर्ष समिती”च्या वतीने रोह्याचे तहसीलदार श्री. किशोर देशमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुंडलिका नदी पात्रात कोणतीही प्रक्रिया न करता गटारातील सांडपाणी व इतर घाणेरडे द्रव्य सोडले जात असून यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९७४ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत हा गंभीर गुन्हा असून दोषींवर…

Read More

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई – पुणे मिसिंग लिंक १ मे पासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी मिसिंग लिंक प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. दूरदृष्टी विकासाची आणि नेतृत्व कार्यशील असले की विकास साध्य होतोच. हे शिंदे साहेबांनी मुंबई – पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी, आव्हाने सहजरित्या पेलत तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुराव्याने मुंबई – पुणे मिसिंग लिंक पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई – पुणे ३० मिनिटांची बचत…

Read More

शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण. कोलाड (श्याम लोखंडे) महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू सन २०२४ च्या शिक्षक भरती मध्ये लागलेल्या शिक्षक बांधवांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण १३ शिक्षण सेवकांचा अकाली मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेले दुःखाचे डोंगर याबाबतचा खूप खेद शिक्षण सेवकांमधून उफाळून निघाला यासाठी दिवंगत शिक्षण सेवक बांधवांस श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षण सेवक यांच्या वतीने रोहा तालुक्यातील रोहा मारुती चौक येथे २५ एप्रिल रोजी शांततापूर्ण असे कॅन्डलमार्च मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक शिक्षण सेवक आणि पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील विविध…

Read More

रिक्षावाल्याची मुलगी झाली बी.एस.सी.नर्सीग. वडीलाच्या कष्टाचे चीज. तळा -नझीर पठाण-तळा शहरातील वरचा मोहल्ला येथील शादुल्ला मो.गोठेकर या रिक्षामालकांनेमुलीच्या ईच्छा प्रमाणे.रात्रीचा दिवस करून मुंलीच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले.त्या कष्टाचे चीज पोरीन करून दाखवले त्याबरोबरच धेय्य, उद्दिष्ट , आत्मविश्वास जिध्द डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत कधीही फेल शब्द लिहीला नाही ती आयेशा शादुल्ला गोठेकर हिने बी एस सी नर्सिंग आठवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली तीने पाचशे पैकी चारशे सोळा मार्क मिळवून A+ग्रेड मिळवली महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आँफ हेल्थ सायन्स संस्थाचे एम ई एस काँलेज आँफ नर्सिंग खेड जि. रत्नागिरी येथे २०२१ला प्रवेश घेतला सलग सहा वर्षात सात परीक्षेत चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन एन्टरन्स परीक्षा पुणा…

Read More

*राष्ट्रवादीला मोठा धक्का, अशोक धोत्रेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद वाढली;* *रोहा खालचा मोहल्ला मध्ये मोठा पक्षप्रवेश* रोहा/समीर बामुगडे/ रोहा तालुक्यातील खालचा मोहल्ला परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीशी जोडलेले स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकत्रितपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. रम्मक शेटे, अनिफ पठाण, मजेदार किडमगैर, फैजल सिद्दीक, असिद पेढेकर, बाबाजान शेटे, असल्लम खान, लाला शेख, सफा शेटे, शगुफ्ता डागे, नोमरान, खतिजा रोगे, राकेश शेडगे यांसारख्या प्रभावी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटावर विश्वास ठेवत अधिकृत प्रवेश केला. या सामूहिक निर्णयामुळे खालचा…

Read More

पनवेलमध्ये ‘युवा शक्ती जागर’ यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कृष्णराज महाडिक यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या निमित्ताने पनवेलमध्ये तरुणाईचा महाकुंभ पाहायला मिळाला. या यात्रेचे नेतृत्व करत असलेले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पनवेलमधील मार्केटयार्ड येथील बैठकीत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर आणि परिवाराच्या कार्याचा गौरव केला. “ठाकूर परिवाराने प्रगत आणि पावन केलेली ही भूमी म्हणजे पनवेल आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आदर व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय नम्र भूमिका घेत सांगितले की, “मी आज प्रदेशाध्यक्ष असलो तरी तुमच्या बरोबरीने खांद्याला…

Read More

खोपोली हादरली! मीळगाव डम्पिंग ग्राउंडला भीषण आग; नगर परिषदेच्या दुर्लक्षाने संताप उसळला प्रतिनिधी नजीर पठाण खोपोली : शहरातील मीळगाव येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीने खोपोलीकर अक्षरशः हादरले आहेत. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत आकाशात काळ्या धुराचे ढग पसरले, तर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. डम्पिंग ग्राउंडमध्ये साचलेल्या कचऱ्याला लागलेली ही आग इतकी भयानक होती की, दूरवरूनही ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ होत असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक विशेषतः त्रस्त झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी…

Read More