Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरOctober 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

मेहंदळे हायस्कूलसमोरील उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात भर; शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेची नव्या पिढीला प्रेरणा
खा. सुनील तटकरे, माजी खा. धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या हद्दीतील मेहंदळे हायस्कूलसमोरील जागेत माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या खासदार निधीतून स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत साकारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग, नगरसेवक राजू जैन, माजी नगराध्यक्ष समीर शेंडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, रोशन चाफेकर, मयूर दिवेकर, महमद दर्जी, महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, रविंद्र चाळखे, स्वप्नाली धनावडे यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. उद्यानातील राजमुद्रेमुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, तटकरे कुटुंबीयांचे रोह्यावर विशेष प्रेम असून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी तसेच त्यांचा दैदिप्यमान इतिहास आणि बलिदान पुढील पिढीला समजावे, या उद्देशाने हे उद्यान साकारण्यात आले आहे. संभाजी महाराज हे संस्कृतचे अभ्यासक, साहित्यिक आणि पराक्रमी राजा होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारे हे उद्यान उभारले जात असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करताना सांगितले की, मोगल सत्तेविरोधात मराठ्यांनी दिलेला लढा आणि त्यातून निर्माण झालेले स्वराज्य महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानाचे पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारून स्वराज्य मजबूत केले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मरक्षण आणि स्वराज्यरक्षणासाठी अतुलनीय शौर्य दाखवले. छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असून कोलाड येथेही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रायगडच्या पायथ्याशी जन्मलो, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. रोह्याचे शिवकालीन वैभव जपत शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्याचे काम सुरू असल्याचेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
नगराध्यक्षा वनश्री शेंडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. सी. डी. देशमुख, परमपूज्य श्री. पांडुरंगशास्त्री आठवले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकांसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. टाटा समूहाच्या माध्यमातून सुमारे १२० कोटी रुपयांच्या निधीतून शहरात विविध विकासकामे होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेची प्रेरणा देणारे हे उद्यान रोह्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात निश्चितच भर घालणारे ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us