हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप चणेरा – सत्यप्रसाद आडाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पहूर येथे लावण्यात आलेल्या काही बॅनरवर ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराचा “सदस्य” असा उल्लेख करून त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रुप ग्रामपंचायत पहूरमध्ये एक सरपंच आणि सात सदस्य, अशी एकूण आठच लोकप्रतिनिधींची अधिकृत रचना आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला “सदस्य” म्हणून दर्शविणे हे वस्तुस्थितीविरुद्ध असून संविधानिक व लोकशाही प्रक्रियेचा…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकरशेठ पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद
रोह्यात राजकीय भूकंप! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे उद्या राष्ट्रवादीत; तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड उद्या घडणार आहे. शिवसेना (शिंदे गट) चे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली असून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या निर्णयामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेली अनेक वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य केल्याचा उल्लेख करताना ॲड. शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. “माझ्यावर झालेले सर्व…
कोमसाप रायगडची वर्षासहल उत्साहात; कवी संमेलन, कराओके आणि साहित्यिक खेळांनी रंगली मैफल रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रायगड जिल्ह्यातील रोहा, तळा व मुरुड शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय साहित्यिक वर्षासहल शनिवार व रविवार, दि. ४ व ५ जुलै २०२६ रोजी तळा तालुक्यातील निसर्गरम्य महुरे येथील स्मिहील फार्म हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. साहित्य, संगीत आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवत चोवीस साहित्यिकांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. वर्षासहलीत बहारदार कवी संमेलन, कराओके गायन, साहित्यिक खेळ तसेच पोहण्याचा आनंद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या रम्य वातावरणात रंगलेल्या कवी संमेलनात…
रोहा किल्ला येथील दिलीप कडव यांच्या पोल्ट्री शेडमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तीन हजाराहून अधिक पक्षी मृत्युमुखी मोठे नुकसान. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील किल्ला येथील युवा शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिक दिलीप कडव यांनी बारटक्के वाडा नजीकच्या शेतात नोकरी व्यवसाय सोबत पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक शेड उभारून कोंबडी पालन करत असताना त्यांनी नुकतेच तीन हजाराहून अधिक बॉयलर कोंबडीचे पक्षी आणून त्यांचे पालन करत होते परंतु मागील चार दिवस पावसाचा जोर कायम राहिला आणि अचानक कुंडलिका नदीने आपली धोक्याची पातळी सतत गेली तीन ओलांडल्याने रविवारी 5 जुलै च्या मध्य रात्री अचानक खुप मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरल्याने शेड मधील…
रोह्यात पूरस्थितीत भाजपचे मदतकार्य; प्रशासनासह कार्यकर्ते मैदानात रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस आणि भिरा धरणातून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत भारतीय जनता पक्षाने मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते विविध भागांत उतरल्याने राजकीय पातळीवरही या मदतकार्यात चांगलीच हालचाल पाहायला मिळाली. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सतीश धारप आणि तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी कार्यकर्त्यांना तातडीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरून प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, अन्नपॅकेट वाटप, जनावरांचे स्थलांतर तसेच आवश्यक मदत पुरविण्याचे काम केले. रोहा शहरातील त्रिमूर्तीनगर,…
*अतिवृष्टीतही कर्तव्यावर ठाम – रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी 48 तासात सुरळीत केला NH-66* प्रतिनिधी : दिपक सोनावणे दिनांक 5 व 6 जुलै रोजी झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्ग NH-66 वरील सुकेळी खिंड वाकन, पाली फाटा येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी मार्ग असलेल्या भिसेखिंड येथे दरड कोसळल्याने हजारो प्रवासी आणि अवजड वाहने महामार्गावर अडकून पडली होती. अशा संकटकालीन परिस्थितीत रायगड हायवे ट्रॅफिक पोलिसांनी तात्काळ वाहतूक व्यवस्थापनाचे काम हाती घेतले. रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे, दरड हटवण्यासाठी समन्वय साधणे, तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी जेवण, पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांनी केले. माननीय अप्पर पोलीस महासंचालक, वाहतूक – महाराष्ट्र…
रोह्यात महापुराची काळरात्र; प्रशासनाच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाल्याने आणि भिरा धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने सोमवारी मध्यरात्री रोहा शहरासह परिसरात महापुराचे संकट निर्माण झाले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुण यांनी रात्रभर धावपळ करून बचावकार्य राबविल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अष्टमी येथील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, धनगर आळी, मराठा आळी, त्रिमूर्ती नगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, कासार आळी आदी भागांत पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. काही ठिकाणी तब्बल तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वीज पेट्या आणि मीटर बॉक्स पाण्याखाली गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण…
शिक्षणाबरोबर शिस्त,कौशल्य कष्ट, प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करावे. दिलावर महाडकर तळा-नझीर पठाण- अंजुमन इस्लाम जंजिरा सिद्धी जफर शेख आणि मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूट मुरुड येथे २ जुलै २६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यापुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे शिक्षण घेत असताना जिध्द उद्दीष्ट बाळगले तर शिक्षण घेणे शक्य होते त्यासाठी शिस्त प्रामाणिकपणा कौशल्य असेल तर यश मिळते. यापुढील विद्यार्थ्यांना जिध्द बाळगावीअसे आवाहन केले या कार्यक्रमाला अध्यक्ष युनिव्हर्सल एज्युकेशन आणि वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर महाडकर प्रमुख पाहुणे उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सन २०२५/२६ शैक्षणिक वर्षात विविध ट्रेड मधून प्रथम,द्वितीय व तृतीय…
*वरसेचा गळा घोटणाऱ्यांना अभय कोणाचे? २०१९ चा सरकारी अहवाल धूळ खात पडला, आज नागरिक पुराच्या विळख्यात!* रोहा:समीर बामुगडे रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील वाढत्या पूरस्थितीबाबत पंचायत समिती रोहाने ६ जुलै २०१९ रोजी केलेल्या अधिकृत स्थळ पाहणी अहवालाने अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या होत्या. मात्र तब्बल सात वर्षांनंतरही त्या अहवालातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. परिणामी आज नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागत आहे. अहवालानुसार सनसिटी रिव्हेस इमारतीसमोरील नाला अरुंद असून त्याचे रुंदीकरण अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. रामचंद्र रेसिडेन्सी ते वर्धमान बिल्डिंग शेजारील नाल्यात नियमित पाणी साचत असल्याने रामचंद्र रेसिडेन्सी ते ब्रेडा कॉम्प्लेक्स दरम्यान मोठा नाला काढण्याची…

