राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी ॲड. मनोजकुमार शिंदे यांची नियुक्ती रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मनोजकुमार नारायण शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सभापती सुधाकर परशुराम घारे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ॲड. मनोजकुमार शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मधुकर पाटील, रोह्याच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे,विजयराव मोरे, समीर…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
NEET पेपरफुटीविरोधात रोहा प्रेस क्लबचे अन्नत्याग आंदोलन कोलाड (श्याम लोखंडे ) NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आले. प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांच्यासह राजेंद्र जाधव, सुहास खरीवले, महेंद्र मोरे, संदीप सरफळे, उद्धव आव्हाड, केशव म्हस्के, ॲड. दीपक जाधव, राकेश मोरे, दीप वायडेकर तसेच प्रदीप देशमुख, नितीन परब, ॲड हर्षद साळवी, तुषार खरीवले, सुनील देखमुख, प्रदीप गुरव,अमित कासट,सोपान सुतार, पांडुरंग वाघमारे, उमेश दुखणे, दिपाली चौलकर आदी उपोषणात सहभागी झाले. तसेच…
रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे पत्रकारांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. रोहा | प्रतिनिधी शैलेश गावंड : रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) यांच्या वतीने शुक्रवारी १७ जुलै रोजी धाटाव येथील आर आय ए सभागृहात रोहा तालुक्यातील पत्रकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पत्रकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा तसेच परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. तर सदरच्या संवाद मेळावा प्रसंगी यावेळी मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी.बार्देस्कर यांनी सांगितले की, रोहा-धाटाव एमआयडीसी ही राज्यातील इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक वृक्षसंपदा असलेली हरित एमआयडीसी आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच येथील औद्योगिक…
जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून उभारलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिराच्या नूतन इमारतीचे लोकार्पण; शिक्षण विकासाला नवी दिशा प्रतिनिधी /सत्यप्रसाद आडाव श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्था, सानेगाव-यशवंतखार संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर, चोरढे ता. मुरुड जि. रायगड प्रशाळेसाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या सुसज्ज नूतन शाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दिनाबाई मोरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे हे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळू लखमा पाटील, जेएसडब्ल्यू स्टील साळावचे प्लांट हेड पंकज मलिक, सीएसआर विभागाचे सुधीर तैलग, सिव्हिल इंजिनिअर प्रशांत ठाकूर, सीएसआर प्रमुख गणेश घोडके, रायगड जिल्हा…
NEET पेपरफुटीविरोधात रोहा प्रेस क्लब रणांगणात; सोनम वांगचुक यांच्या लढ्याला रोह्यातून अन्नत्यागाचा एल्गार कोलाड :- श्याम लोखंडे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात आता रोह्यातूनही संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली शनिवारी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला. परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळले असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिक्षण व्यवस्थेतील गलथान कारभाराचा सर्वाधिक फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसत असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला…
कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला, पत्नी गरोदर प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत–मुरबाड महामार्गावरील कळंब–चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी ऋतिक हे स्वतः इको कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक ढोले हे आपल्या चार मित्रांसह इको कारमधून कळंब येथून चाहूचीवाडी येथील आपल्या घरी निघाले होते. रात्रीच्या सुमारास गावाजवळील धोकादायक वळणावर कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव…
धोंडखार ग्रामपंचायत मध्ये राजकीय उलठापालत. रोहा:प्रतिनिधी समीर बामुगडे धोंडखार ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादी सोडून शिवसेना मध्ये जाहीर पक्ष प्रवेश. शिवसेना वंदनीय बाळा साहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब, धोंडखार गावातील स्थानिक नेतृत्व, शिवसेना युवा सेना उप तालुका प्रमुख सुदर्शन गावडे. शिवसेना शाखा प्रमुख :-सनी म्हात्रे. शिवसेना उप शाखा प्रमुख मिथुन घाणेकर व स्थानिक शिवसेना कार्यकर्ते यांच्या नेतृत्व व कार्य प्रणाली वर विश्वास ठेऊन आज माजी सदस्य गणेश गावडे, महादेव मोरे, शांताराम मोरे व इत्यादी कार्यकर्ते व.राष्ट्रवादी व शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश ! येणाऱ्या काळात कार्यकर्ते अजून जोमाने सामाजिक व राजकीय काम करतील…
दहिवली तर्फे वरेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती विरले यांची बिनविरोध निवड ! कर्जत प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेर्डी ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदी स्वाती सुनील विरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच रोहिणी निलेश विरले यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यासाठी आयोजित विशेष सभेत निर्धारित वेळेत स्वाती सुनील विरले यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा सरपंच मेघा अमर मिसाळ यांनी केली. या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य सोनम गायकवाड, रोहिणी विरले, विष्णू वाघमारे, नरेश कालेकर, शिवाजी मिसाळ, यशवंत भवारे, स्वाती विरले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने…
माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे चार हजार सीड बॉल लागवड उपक्रम संपन्न रोहा (समीर बामुगडे) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा व पर्यावरण पूरक सीड बॉल लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सदर माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच चार हजार सीडबॉलची लागवड लागवड करण्यात आली या पर्यावरण पूरक उपक्रमासाठी इंदापूर वन विभागाचे वनपाल राजमाने, वनरक्षक वैशाली भोर, अशोक पोहकडे, आमीना मनेर निलेश नाईकवडे तसेच रातवड हायस्कूलचे पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रणिता साटम, जानवी शिंदे, अमोल जाधव, राम येलकर इत्यादी उपस्थित होते सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.…
कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर; आधुनिक तंत्रज्ञान व सभासद कल्याणावर भर रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहे शहरातील कुंडलिका नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी मातोश्री मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेने सभासदांसाठी १५ टक्के लाभांश जाहीर केला. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सभासदांसाठी कल्याणकारी योजना आणि दर्जेदार सेवा देत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विवेक वत्सराज यांनी केले. सभेला अध्यक्ष विवेक वत्सराज, उपाध्यक्ष माधव दाते, तज्ज्ञ संचालक अविनाश दाते तसेच संचालक चंद्रशेखर जोशी, संजीव कवितके, प्रमोद काळवीट, प्रदीप साखळकर, एकनाथ मरवडे, श्रीकांत पिंगळे, यज्ञेश भांड, किशोर पवार, सौ. नीलिमा…

