दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर उत्साहात संपन्न म्हसळा प्रतिनिधी : म्हसळा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर आज २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, म्हसळा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथून विशेष वैद्यकीय तज्ज्ञांची टीम उपस्थित होती.शिबिराला म्हसळा शहर व तालुक्यातील जवळपास ४७ दिव्यांग बांधव-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून पात्र दिव्यांग व्यक्तींना आवश्यक तपासणी व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा. प्रतिनिधी / किशोर पितळे सार्वजनिक बांधकाम विभाग माणगांव येथे अनेक वेळा ग्रुप ग्रामपंचायतमहागांवच्यामाध्य मातून रस्ता दुरुस्ती बाबत पत्र व्यवहार केलाअसुन मा.उपविभागीय बांधकाम अधिकारी साहेब यांनी चक्क तोंड, डोळे,बंद करून कानावर हात ठेवल्या ची भुमिका स्विकारली असल्या चे निदर्शनास येत आहे महागांवपंचक्रोशी तील विनवली फाटा ते कोरखंडा फाटा या रस्त्या ची अतिशय दुरावस्था झाली असूनअक्षरशः चाळण झालीआहे. विनवली,बहुलेवाडी,महागांवआदिवासीवाडी,बारपे,महुरे,कोरखंडा,म्हसाडी, कारवीने अशी पुढील गावे असून सदर रस्त्याची चाळण झाली आहे याबाबत अनेक वेळा पंचायत समिती तळा व उप विभागीयबांधकाम अधिकारीमाणगांव यांच्याशी मागील ३वर्षे पत्र व्यवहार केला परंतु त्याला केराची टोपली दाखवली असा आरोप…
बेकायदेशीर, बोगस पद्धतीने जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – किसन जावळे केल्टे गावातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट; मोजणी प्रक्रियेतील गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी म्हसळा प्रतिनिधी : केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमीन व्यवहार नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने झाल्याचे आढळल्यास, खोटी कागदपत्रे अथवा खोटी कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिले. केल्टे गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या भेटी दरम्यान निर्देश दिले. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांना मोजणीपूर्वी कायदेशीर नोटीस देण्यात आली नसल्याचे, तर…
रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या पाठपुराव्याला यश; पनवेल स्थानकावर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची सुविधा सुरू रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) दिवा–रोहा–दिवा MEMU गाड्यांमध्ये पाण्याची उपलब्धता व्हावी तसेच पनवेल रेल्वे स्थानकावर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रोहा रेल्वे प्रवासी समितीने रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने केली होती. या मागणीची दखल घेत अखेर पनवेल स्थानकावर MEMU गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. दिवा आणि रोहा स्थानकांवर MEMU गाड्यांना पाणी भरण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पनवेल येथे पाणी भरण्याची सुविधा सुरू झाल्यामुळे गाड्यांमध्ये पाण्याची उपलब्धता राहण्यास मदत होणार असून प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी…
*रोहा तालुक्यात शिवसेनेची दमदार वाटचाल; युवासेनेच्या तालुका व शहर प्रमुखपदी रोशन पवार, राहुल गुरव* रोहा:समीर बामुगडे रोहा | प्रतिनिधी : रोहा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत असून, पक्षाने आता युवाशक्तीला संघटित करण्यावर विशेष भर दिला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात पक्षबळकटीकरणाला वेग आला असून, युवासेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरतशेठ गोगावले, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी तसेच युवासेना कोअर कमिटी सदस्य, कोकण विभाग सचिव आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री. विकास भरतशेठ गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रोहा…
मुरुड -आंबोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा आरोप प्रत्यारोपांनी गाजली? ग्रामस्थांनी दिले गटविकास अधिकारी यांना सखोल चौकशी-कारवाई करण्याचे निवेदन प्रतिनिधी /(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत आरोप प्रत्यारोपांनी गाजली.मागील कालावधीतील प्रशासकीय कामकाज, निधीचा वापर,विकासकामे व शासकीय योजनांची विशेष तपासणी करून चौकशी करण्याबाबत तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार खताळ यांना एक निवेदन देण्यात आले व सदर निवेदन प्रशासक वसंत दळवी यांनी स्विकारले असल्याची माहिती ग्रामस्थ पत्रकार धर्मेश मोरे यांनी दिली आहे. आंबोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ नागरिक यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत काही बाबींची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येत असल्याने ग्रामपंचायतीच्या मागील २०२१- २०२२ ते २०२४-२०२५ वर्षाच्या कालावधीतील कामकाजाची संबंधित अभिलेखांच्या…
देवकान्हे-पालदाड मार्गावर जीवघेणे खड्डे; स्थानिक आमदार-खासदार गेले कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल . कोलाड (श्याम लोखंडे) मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला रोहा तालुक्यातील पालदाड खांब मुख्य रहदारीतील समजल्या जाणाऱ्या देवकान्हे ते पालदाड रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून संपूर्ण मार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये चिखल आणि पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून खड्ड्यातून एखादे वाहन गेल्याने त्यातील चिखल आणि घाणीचे पाणी हे पादचारी वर्गावर उडून त्याचे जलाभिषक होते. तसेच हे भले मोठे खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी, “आमचे लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार…
*नालासोपारा – तळा एस् टी बस सेवा सुरू करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई,ची मागणी. *तालुका तळा संलग्न कुणबी युवा चे निवेदन! प्रतिनिधी / किशोर पितळे नालासोपारा- तळा -नालासोपारा थेट एस्. टी बस सेवा पूर्ववत व नियमित सुरू करण्याकरिता दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी नालासोपारा एस् टी बसस्थानक येथे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका तळा*, कुणबी युवा तळा* यांच्या नेतृत्वाखाली विविध गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC)* अध्यक्ष यशवंत शिंदे,माजी उपाध्यक्ष महादेव कुंभेकर युवा अध्यक्ष विजय घाडगे आणि युवा सरचिटणीस देविदास बांद्रे यांच्या प्रमुख उपस्थित हस्ते वाहतूक नियंत्रक घोडे साहेब व श्रीम. राऊत यांचेकडे…
केळघरच्या जंगलात पोलिसांचा धडाका; २२०० लिटर रसायनाचा साठा उद्ध्वस्त! १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट; तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळघर परिसरातील जंगल भागात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी रसायनाचा मोठा साठा करून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळताच रोहा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २२०० लिटर रसायनाने भरलेले ११ निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम आढळून आले. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख १५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केळघर परिसरातील जंगल भागात छापा टाकला. यावेळी…
टिटवी जंगलात गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांचा छापा; १ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे टिटवी गावाच्या जंगल परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी सुरू असलेल्या भट्टीवर पोलिसांनी दि. २३ ऑगस्ट रोजी छापा टाकून सुमारे १ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान जंगल भागात १२ निळ्या रंगांच्या प्लास्टिक ड्रममध्ये तब्बल २ हजार ४०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आढळून आले. तसेच ॲल्युमिनियमचा गावठी दारू गाळण्याचा सतेला व झाकणी आणि सुमारे १० लिटर गावठी हातभट्टीची दारू असा मुद्देमाल मिळून आला. जंगल भागातून सदर मुद्देमाल वाहून नेणे अवजड…

