Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप
ताज्या बातम्या

हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप

चणेरा – सत्यप्रसाद आडाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पहूर येथे लावण्यात आलेल्या काही बॅनरवर ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराचा “सदस्य” असा उल्लेख करून त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रुप ग्रामपंचायत पहूरमध्ये एक सरपंच आणि सात सदस्य, अशी एकूण आठच लोकप्रतिनिधींची अधिकृत रचना आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला “सदस्य” म्हणून दर्शविणे हे वस्तुस्थितीविरुद्ध असून संविधानिक व लोकशाही प्रक्रियेचा अवमान करणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीत नवव्या सदस्याचे कोणतेही पद अस्तित्वात नाही. त्यामुळे अधिकृत पद नसताना एखाद्या व्यक्तीचा सदस्य म्हणून उल्लेख केल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित बॅनरचे फोटो सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप स्टेटसवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू आहे.
याप्रकरणी भविष्यात शुभेच्छा बॅनर तयार करताना केवळ अधिकृत, सत्य व पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us