Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोह्यात पूरस्थितीत भाजपचे मदतकार्य; प्रशासनासह कार्यकर्ते मैदानात
ताज्या बातम्या

रोह्यात पूरस्थितीत भाजपचे मदतकार्य; प्रशासनासह कार्यकर्ते मैदानात

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात पूरस्थितीत भाजपचे मदतकार्य; प्रशासनासह कार्यकर्ते मैदानात

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस आणि भिरा धरणातून झालेल्या मोठ्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत भारतीय जनता पक्षाने मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते विविध भागांत उतरल्याने राजकीय पातळीवरही या मदतकार्यात चांगलीच हालचाल पाहायला मिळाली.
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सतीश धारप आणि तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी कार्यकर्त्यांना तातडीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरून प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, अन्नपॅकेट वाटप, जनावरांचे स्थलांतर तसेच आवश्यक मदत पुरविण्याचे काम केले.
रोहा शहरातील त्रिमूर्तीनगर, धनलक्ष्मी सोसायटी आणि गणेशनगर परिसरात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक रोशन चाफेकर यांनी पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्तांसाठी जेवणाच्या पॅकेटची व्यवस्था करण्यात आली.
या मदतकार्यात भाजप तालुका सरचिटणीस परेश चितळकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस वैभव कुलकर्णी, शहराध्यक्ष अनिल घरजाळे, सिद्धांत मोरे तसेच शहराध्यक्ष सुमित रिसबूड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामीण भागात तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त गावांना भेटी देत मदतकार्याचा आढावा घेतला. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली, तर तळा परिसरात रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. वरसे येथे हाजी कोठारी यांनी रात्री उशिरापर्यंत नागरिकांना मदत केली.
दरम्यान, रोहा शहरात नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांनीही रात्रभर मदतकार्य सुरू ठेवले. नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सहकार्य केले.
पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली असली तरी बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील काळातही सेवाकार्य सुरू ठेवतील, अशी माहिती तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us