Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

*पत्रकार किशोर पितळे “जीवन गौरव पत्रकार” पुरस्काराने सन्मानित. *कै.नारायणराव मेकडे व मनोज घोसाळकर यांना समर्पित. रोहा -कुणाल घोसाळकर माणगांव प्रेस क्लब वर्धापन दिनी सामाजिक,राजकीय व विविध क्षेत्रातील उद्योजक पत्रकारिता विशेष मान्यवरांचा सत्कार समारंभ १६आँगस्ट २६ रोजी कुणबी भवन माणगांव येथे आयोजित करण्यात आला होता तळा येथील जेष्ठ पत्रकार किशोर पितळे यांना “जीवन गौरव पत्रकार” पुरस्कार रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे व कोकण विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद मनोज खांबे यांच्या हस्ते सपत्नीक शाल,सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण कँबिनेटमंत्री अदिती तटकरे,राष्ट्रीयकाँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर पंचायत सभापती विलास शिंदे उपसभापती मनिषा मालोरे मिलिंद अष्टीकर अध्यक्ष…

Read More

रोह्यात ३० ऑगस्टला प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने भव्य रोजगार मेळावा जवळपास ५० कंपन्यांची नोंदणी; गरजूंना ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) दक्षिण रायगड जिल्ह्यातील तरुण-तरुणींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व एकलव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोहा किल्ला येथील ॐ नमः शिवाय हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी आतापर्यंत जवळपास ५० नामांकित कंपन्यांनी नोंदणी केली असून, सहभागी पात्र उमेदवारांना ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.…

Read More

*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का! पुसाटीवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. प्रतिनिधी / किशोर पितळे – तळा नगरपंचायत हद्दीतील पुसाटीवाडी येथे राष्ट्रवादी हा गेली२५वर्षे बाले किल्ला समजला जातो त्या पुर्वी शेकाप चा बालेकिल्ला गणला जात होता मात्र तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वाढते वर्चस्व व विकास कामाचा झंझावात पाहता शिवसेनेने शहरासह ग्रामीण भागातील केलेला विकासाभिमुख कार्यपद्धतीवर प्रेरीत होऊन ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईकर मंडळातीलकार्यकर्त्यांनी एकमताने निर्णय घेऊन१६आँगस्ट रोजी भगवा हातात घेऊन “जय शिवाजी जय भवानी” जयघोष करीत जाहीर प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून,बालेकिल्ला पुर्ण ढासळला आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भरतशेट गोगावले यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास…

Read More

केळघर रस्त्याला झाडाझुडुपांचा विळखा : सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? * वाहनचालक व प्रवासी वर्गाचा सवाल  प्रतिनिधी / राजीव नेवासेकर मुरुड -केळघर-रोहा रस्त्यावर केळघर दरम्यान दुतर्फा झाडाझुडुपांचा विळखा असून याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून बांधकाम खाते अपघाताची वाट बघतेय काय ? असा सवाल विचारला जात आहे. या रस्त्यावर झाडी झुडपे वाढलेल्या फांद्या यामुळे मुरुड तालुक्यातील दुर्गम भागातील केळघर भागातील शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक व प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागत असून संबंधित बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरुड केळघर मार्गे रोहा रस्त्यावर मुरुड…

Read More

विकासाला विरोध नाही,मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे : नथूराम माळी * दिघी बंदर विस्तार जनसुनावणीत शेतकऱ्यांनी मांडल्या हरकती : प्रलंबित भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर प्रतिनिधी / राजीव नेवासेकर विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”,आमचा विकासाला विरोध नाही; मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकास प्रकल्पांसाठी घेतल्या जात आहेत, त्यांनाच त्यांच्या भूसंपादन व मोबदल्यासाठी वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असतील तर हा प्रश्न गंभीर असल्याची हरकत सामाजिक कार्यकर्ते नथूराम माळी यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे दिघी बंदर विस्तार जनसुनावणीत आक्रमक भूमिका घेत मांडली. दिघी बंदर विस्तार प्रकल्पाच्या अनुषंगाने श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी-रायगड संदेश शिर्के,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) व…

Read More

रोह्यात श्रावणी सोमवारी शिवभक्तांची एकदिवसीय परिक्रमा; पंचक्रोशीतील शिवमंदिरांना जलाभिषेक रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते प्रथम श्रावणी सोमवारनिमित्त रोहा तालुक्यातील शिवभक्तांच्या वतीने एकदिवसीय परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. आपल्या परिसरातील स्वयंभू तीर्थक्षेत्रांचे महत्त्व वाढविण्यासोबतच धर्माचा प्रचार-प्रसार आणि तरुणांमध्ये धार्मिक संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे महादेव मंदिर तळाघर येथून जलाभिषेक व संकल्प करून परिक्रमेची सुरुवात करण्यात आली. वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी, भुवनेश्वर, भुवनेश्वर येथील समस्त जंगम समाज मठ, गांगल मेडिकल परिसरातील ओंकारेश्वर मंदिर, दमखाडी , रोठ खुर्द, वाघेश्वर नगर येथील श्री. चौधरी यांच्या शिव मंदिर स्थळावरून रोठ बुद्रुक, महादेव मंदिर तळाघर पर्यंत अनवाणी प्रदक्षिणा परिक्रमा करण्यात आली.…

Read More

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन. तळा-किशोर पितळे देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन सकाळी ७.३०वा. मुख्याध्यापक लियाकत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्र गीत,राज्य गीत सामुदायिक पणे सादर केले.विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले व क्रांतिकारी महात्म्यांना विनम्रपणे अभिवादन केले.व प्रभातफेरी नगरपंचायत पर्यंत काढून नगरपंचायत येथे ध्वज वंदन केले.सकाळी ८.३० वा. जिल्हा परिषद सदस्य गीताताई जाधव व पंचायत समीती माजी सभापती तथा विद्यमान सदस्या अक्षरा कदम यांच्या हस्ते विज्ञान लँब चे उद्घाटन करण्यातआले. याप्रसंगी समाजसेवक सचीन कदम उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालनात लियाकत राऊत सरांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन विज्ञान लँब याचे महत्त्व विद्यार्थ्यांना…

Read More

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव! कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असुन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होताच कोलाड आंबेवाडी नाक्यावर शिवसैनिकांचा एकच जल्लोष कोलाड विभाग शिवसेनेच्या वतीने लाडू वाटून व फटाके फोडून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोलाड विभागातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठया संख्येने उपस्थित होते. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून पालक मंत्री पदावरून मागील दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरु होती.मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पालक मंत्री रहावे अशी…

Read More

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर) आपट्याच्या पानावर बॅंकेचा लोगो तयार करून विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुरुडचा सुपुत्र कौस्तुभ पांडुरंग आरेकर याचा तहसीलदार आदेश डफळ यांनी स्वातंत्र्य दिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत नागरिक सत्कार सोहळ्यात नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात येऊन करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी सालाबाद प्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा व नागरिकांचा सत्कार मुरुड तालुक्यातील अग्रगण्य नागरिक, प्रतिनिधी यांचे हस्ते करण्यांत आला . सत्कार कार्यक्रमांत मुरुड शहरातील सर.एस.ए. हायस्कूलचा माजी विद्यार्थी जे .जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्ट मुंबई येथे शिकत असताना राजाराम बापू सहकारी बँक लि.पेठ, कऱ्हाड यांनी…

Read More

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा कोर्लई,ता.१७(राजीव नेवासेकर) मुरुड तालुक्यातील नांदगावच्या आयुष हॉस्पिटल, नूतन कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रायगड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (RINE) यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुरुड येथील इंडियन कोस्ट गार्ड येथील डॉ.जेकब प्रमुख पाहुणे म्हणून तर आयुष हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. गौरेंद्र गौडुहान, आयुष हॉस्पिटलचे एम.डी. डॉ. अनिल गोस्वामी, RINE चे प्राचार्य श्री. प्रकाश, तसेच आयुष हॉस्पिटल व नर्सिंग महाविद्यालयांचे सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात…

Read More