भैरवनाथ महाराज गोरेगाव अखंड सप्ताहाची ३००वर्षाची परंपरा.आजच्या काळात हि जपली आहे. प्रतिनिधी तळा / किशोर पितळे गोरेगांवचेग्रामदैवत श्री भैरवी भवानी (भैरवनाथ) चा श्रावण वद्य प्रतिपदा ते अष्टमी अखंड हरिभजन सप्ताह गेली ३०० वर्षापासून सुरू आहे.दैवज्ञ ब्राह्मण (सोनार)समाजातील मुळ पुरुष धंद्या निमित्ताने गोरेगांव येथे सोनार काम करण्यासाठी समुद्र,खाडी, नदी जल मार्गे पायी,बैलगाडी ने आले त्याचे कुलदैवत श्री भैरवी भवानी अर्थात भैरवनाथाचे निस्सीम भक्त असल्याने भक्तासाठी हे त्यांच्या बरोबर आले आणी काही वर्षातच स्वप्नात येऊन दर्शन दिले आणी जो नदी काठी पाषाणी मुर्ती तुला दिसेल ती घेऊन ये.आणी दक्षिणाभिमुख मंदिरात प्रतिष्ठापना कर.मी वेशीवर समस्त भाविकांचे संरक्षण करण्यासाठी रोगराई मुक्त, संकट,इच्छीत मनोकामना पूर्ण…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड रोहा प्रतिनिधी | संतोष सातपुते रोहा येथे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी वाट निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व एकलव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळावा २०२६ ला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी कालिदास हॉल, किल्ला येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात तब्बल ६५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला, तर विविध…
युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी नियुक्ती रोहा प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिवपदी युवा नेतृत्व सिद्धार्थ संतोष हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार मा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच महिला व बालविकास मंत्री मा. अदिती ताई तटकरे यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई अध्यक्ष मा. विभू घुगे यांच्या हस्ते सिद्धार्थ संतोष हिरवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सिद्धार्थ हिरवे यांच्या सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही…
पोलीस व एस्.टीकर्मचाऱ्यांना काँलेज विद्यार्थिनी खऱ्या रक्षकांना राखी बांधून कृतज्ञता केली व्यक्त. प्रतिनिधी / तळा :किशोर पितळे: रक्षाबंधन म्हणजे काय? फक्त एक धागा? नाही… तर हा आहे विश्वासाचा, सुरक्षेचा आणि जन्मभर साथ देण्याचा एक पवित्र संकल्प. आपल्या संस्कृतीत रक्षाबंधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो. हा सण रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपण्याची शिकवण देतो. आणि याच शिकवणीचा प्रत्यय नुकताच आपल्या तळा शहरात पाहायला मिळाला. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी यंदाचे रक्षाबंधन अविस्मरणीय केले आहे. घरचा सण,कुटुंबाची ओढ बाजूला…
सातत्यपूर्ण सेवा हाच ‘गरुडझेप’चा ठेवा; नवखार शाळेतील २५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरुडझेप फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना वह्या, पेन-पेन्सिल व खाऊचे वाटप रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते “सातत्यपूर्ण सेवा हाच गरुडझेपचा ठेवा” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरुडझेप फाउंडेशनच्या वतीने चणेरा येथील रा.जि.प. शाळा नवखार येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. फाउंडेशनच्या १७व्या वर्षातही सामाजिक कार्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम या उपक्रमातून करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील २५ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी गरुडझेप फाउंडेशनचे खजिनदार दत्ता साळुंखे, प्रणय…
पोलीस बांधवांना राखी बांधून घरेलू कामगार महिलांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत घरेलू कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, रायगड जिल्हा यांच्या वतीने रोहा पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घरेलू कामगार महिलांनी पोलीस बांधवांना राखी बांधत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. पोलीस आणि समाजातील नागरिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच बंधुभाव, प्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस बांधव हे सण-उत्सवाच्या काळातही आपले कर्तव्य बजावत समाजाच्या सुरक्षेसाठी…
देवा फाउंडेशनच्या पहिल्याच आमरण उपोषणाला घवघवीत यश! *मुरुड आगाराच्या सर्व मागण्या मान्य; मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा डॉ. अनिकेत मेस्त्री यांचा इशारा प्रतिनिधी / राजीव नेवासेकर मुरुड आगारातील बससेवा सुरळीत, सुरक्षित व सक्षम करण्यासह मुरुड तालुक्यातील नागरिकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी देवा ग्रुप फाउंडेशन च्या वतीने कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री* यांनी सहकाऱ्यांसमवेत मुरुड आगारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मुरुड–पनवेल बससेवेचा विनाथांबा प्रवास, बस मार्गात बंद पडल्यास पर्यायी बसची व्यवस्था, गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला डिझेल पंप पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही, मुरुड आगारात सीएनजी पंप सुरू करण्यासह एकूण २२ मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या होत्या. या…
धाटाव एमआयडीसीतील ‘रोहा डायकेम कंपनीत कंत्राटी कामगाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू दुर्घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, स्वच्छता व सुरक्षा उपायोजनांबाबत कामगारांमध्ये संतापाची लाट. कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीतील जागतिक स्तरावर उद्योग व्यवसायात प्रगत असलेल्या रोहा डायकेम कंपनीत कामाच्या ठिकाणी अचानक सर्पदंश झाल्याने एका ५५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २७ ऑगस्ट रोजी गुरुवारी घडली. दगडू भोस्तेकर (रा. विठ्ठलवाडी, भुवन, ता. माणगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दगडू भोस्तेकर हे नेहमीप्रमाणे रोहा डायकेम कंपनीच्या…
३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी! कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, रोजगार सह विविध क्षेत्रात प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रविवारी ३० ऑगस्ट रोजी रोहा किल्ला येथील ॐ नमः शिवाय कालिदास हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बेरोजगार तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ हजारांहून अधिक युवा बेरोजगारांनी आपली विविध पदांसाठी अथवा हुद्द्यांसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, सदरच्या रोजगार मेळाव्यासाठी नामांकित…
धाटाव केंद्रातील ४७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट्सची अनमोल साथ; सेवा सहयोग फाऊंडेशन व सिंडिकेट बँक कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने सेवा सहयोग फाऊंडेशन व सिंडिकेट बँक कुटुंबाच्या सहकार्याने धाटाव केंद्रातील सर्व १३ शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वीच्या ४७० विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक किट्सचे वाटप करण्यात आले. एकाच दिवशी सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या इयत्तेनुसार आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश असलेले किट देण्यात आले. प्रत्येक किटची अंदाजे किंमत ६५० रुपये असून, ४७० विद्यार्थ्यांसाठी वितरित…

