Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»रोह्यात राजकीय भूकंप! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे उद्या राष्ट्रवादीत; तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे
राजकारण

रोह्यात राजकीय भूकंप! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे उद्या राष्ट्रवादीत; तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 9, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात राजकीय भूकंप! शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे उद्या राष्ट्रवादीत; तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

 

रोहा तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड उद्या घडणार आहे. शिवसेना (शिंदे गट) चे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली असून, खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या निर्णयामुळे रोहा तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेली अनेक वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य केल्याचा उल्लेख करताना ॲड. शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. “माझ्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. एक जरी आरोप सिद्ध झाला, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन. कर नाही त्याला डर कशाला,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पक्षातील काही नेत्यांनी दिलेले शब्द न पाळणे, विकासकामांसाठी अपेक्षित सहकार्य न मिळणे आणि राजकीय पातळीवर सातत्याने झालेली उपेक्षा यामुळे आपण अस्वस्थ झालो होतो, असे सांगत त्यांनी अखेर सहा महिन्यांच्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत सुसंस्कृत राजकारण करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
गेल्या सहा महिन्यांत आपल्या राजीनाम्याबाबत आणि हकालपट्टीबाबत अनेक चर्चा रंगल्या. या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. “रोहा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे. आता राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत विकासासाठी काम करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
रोहा नगरपालिकेतील आपल्या आक्रमक भूमिकेची आठवण करून देत त्यांनी नाव न घेता काही विरोधकांवर टीका केली. “ज्यांच्यासाठी संघर्ष केला, त्यांच्याकडूनच अविश्वास दाखवण्यात आला. ज्यांनी माझा विश्वासघात केला, त्यांना येणाऱ्या काळात त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना त्यांनी त्यांना “राजकीय जादूगार” अशी उपमा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी रोहा नगरपालिकेतील मित्र, सहकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विकासकामांना नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
“मनोजकुमार शिंदे जे काम हातात घेतात, ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय थांबत नाहीत. येणाऱ्या काळात माझे कामच माझी ओळख ठरेल,” असे सांगत त्यांनी नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात विकासाच्या अजेंड्यावरून होणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, उद्या होणाऱ्या या पक्षप्रवेशाकडे रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील एक महत्त्वाचा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याने स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, या निर्णयाचे पडसाद आगामी राजकीय घडामोडींमध्ये उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us