शिवसेना (शिंदेगट) गटाच्या तालुका प्रमुख पदी नितीन साळवी यांची नियुक्ती. राष्ट्रवादी पुढे आव्हान. तळा -किशोर पितळे- हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे तथा (उपमुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार तळा शिवसेना प्रभारी तालुका प्रमुखपदी नितिन साळवी याची नियुक्ती करण्यात आली असून तालुकाप्रमुखपदाचीधुरासांभाळण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. नितीन साळवी हे कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक आहे पक्ष संघटना वाढी साठी व सक्रियपणे प्रचार,प्रसार करून येत्या ग्रामपंचायती च्या निवडणूकीची जबाबदारी ठेवून सर्व शिवसेनापक्षाच्या ग्रामपंचायती होण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.सदरची नियुक्ती हिपक्षा अंतर्गत होणाऱ्या निवडणूका होईपर्यंत असेल असा आदेश पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. परंतु आज पर्यंतच्या इतिहासात प्रभारी तालुका…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
*मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा उत्साहात प्रतिनिधी / राजीव नेवासेकर *आगामी येणाऱ्या गोकुळाष्टमी, गोपाळ काला, गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुरुडमध्ये शांतता कमिटीची सभा तहसीलदार आदेश डफळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी,ज्योती नागावकर, पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ,उपसभापती अश्विनी जंगम, सदस्य गणेश नाक्ती, विस्तार अधिकारी प्रसादमाळी, नगरपरिषद नगरसेवक,मुख्याधिकारी सचिन बच्छाव, पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंताअजित सांगळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महावितरण अधिकारी, आगार प्रमुख चिन्मय आंबवकर, पोलिस पाटील, सर्व समाज अध्यक्ष, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी सण शांतते मध्ये पार पडावे याबाबत सूचना देण्यात आल्या. आपल्या गावामध्ये कोणी काही अनुचित प्रकार करत असेल तर त्याबाबतची माहिती पोलीस ठाणे…
|| श्री स्वामी समर्थ || ||जय जय स्वामी समर्थ|| *मुरुड-डोंगरी येथील त्रिशा ताई पाटील यांच्या खाजगी श्री स्वामी समर्थ मठाचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात मुरुड प्रतिनिधी * पहाटे पासून पूजा अर्चा महाअभिषेक आरती भूपाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन ताई यांनी स्वतः केले होते. * हजारों भाविकांनी घेतला दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला *श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेप्रमाणे मुरुड तालुक्यातील डोंगरी येथे गुरू माऊली त्रिशा ताई यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ मठाचा २१ वा वर्धापनदिन मोठय़ा भक्ति भावात साजरा करण्यात करण्यात आला. —————————————- डोंगरी येथे स्वतः हा मठ श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्थापन करण्याचां आम्हाला आदेश केला होता. या स्वामी समर्थ…
विजय तांबडकर यांचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे सन्मान प्रतिनिधी / राजीव नेवासेकर लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने लाखो वारकरी यात्रेकरूंना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना महा आरोग्यवारी -२०२६ ची दखल घेत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या निवडक ७५ उपचारकांना सन्मानित करण्यात आले आहे.यामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आरोग्य उपचारक विजय चंद्रकांत तांबडकर यांना सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने लाखो वारकरी यात्रेकरूंना मोफत आरोग्यसेवा पुरवणाऱ्या “महा आरोग्यवारी २०२६” उपक्रमाची दखल घेत त्याला वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून घोषित केले असून या उपक्रमात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या निवडक ७५ उपचारकांना लंडन बुक ऑफ…
रोह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली होणार; चिंतामणराव देशमुख विद्यालयात अकरावी-बारावी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते रोहा शहरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हावी, यासाठी रोहा नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. डॉक्टर चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा येथे इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठीचा अधिकृत प्रस्ताव १ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आवक क्र. 9695367 अन्वये सादर करण्यात आला. माजी खासदार सुनीलजी तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांच्या सहकार्याने तसेच सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून…
उद्देश वाडकर यांची रोहा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती कायम; स्थगितीचे पत्र रद्द स्थगितीचे पत्र काढल्यानंतर काही तासांतच रात्री नियुक्तीचे नवे पत्र; जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे स्पष्टीकरण रोहा प्रतिनिधी रोहा तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक वर्तुळात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रोहा शिवसेना तालुका प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून उद्देश वाडकर यांची करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून, याबाबत शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पुन्हा पत्र देऊन स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, स्थगितीचे पत्र जारी झाल्यानंतर काही तासांतच रात्रीच्या वेळी नियुक्ती कायम ठेवण्याचे नवे पत्र देण्यात आल्याने या घडामोडीची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्देश वाडकर यांची रोहा तालुका…
रायगड येथून राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे जनहित दौरा सुरू 5 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई येथे उपोषणा द्वारे संघर्ष विशेष प्रतिनिधी (शैलेश गावंड) दिंनाक 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मराठा पार्टी चे अध्यक्ष श्री अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांचे मार्गदर्शन व कुशल नेतृत्याखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी श्रीमंत छञपती शिवाजी महाराज यांचे समाधीचे रायगडावर सकाळी १० वाजता दर्शन घेऊन या संघर्ष कार्याचा शुभारंभ करण्यात आला त्या नंतर दुपारी अलिबाग येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती देण्यात आली त्या नुसार ५ ऑक्टोबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे विविध मागण्या साठी होणाऱ्या उपोषणा बाबत माहिती देताना पुढील मागण्या सांगितल्या 1)मराठा समाजाला…
रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक रोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे शिवसेने दाखल.मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता. कोलाड (श्याम लोखंडे ) रायगड रोहा तालुक्यात राजकीय भूकंप रोहे नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमित उकडे, मयुर पायगुडे, सागर भोभड यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मंगळवारी १ सप्टेंबर रोजी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादी अजित पवार गटाला तसेच रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांना मोठा धक्का देत रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले…
रोटरी क्लब रोहा तर्फे रिक्षा व मिनिडोअर चालकांसाठी महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब रोहा, रोहा-अष्टमी नगरपरिषद आणि सूरज हॉस्पिटल, सानपाडा (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा व मिनिडोअर चालकांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत महाआरोग्य शिबिर, उपचार व औषध वाटप रविवारी (३० ऑगस्ट) भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा येथे उत्साहात संपन्न झाले. रोह्यातील नागरिकांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या रिक्षा व मिनिडोअर चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विविध आजारांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तहसीलदारांच्या आदेशानंतरही गायरान अतिक्रमणाचा अहवाल रखडला? वरसे परिसरातील कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष रोहा : समीर बामुगडे रोहा तालुक्यातील वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गुरचरण जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी संबंधित शासकीय जमिनींची मोजणी करून अतिक्रमणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या आदेशानंतर पुढील कार्यवाहीचा अहवाल अद्याप सादर झाला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तहसीलदार कार्यालयाकडून १६ मार्च २०२६ रोजी गटविकास अधिकारी, रोहा यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात वरसे, भुवनेश्वर, निवी, जय धाकोबा तसेच निवी ठाकुरवाडी येथील गायरान व…

