समाज संघटीत रहाणे ही काळाची गरज असुन सामाजिक विकास होतो…डॉ. नंदकुमार राजपुरकर. प्रतिनिधी / किशोर पितळे दैवज्ञ (सोनार) समाज मुरुड दैवज्ञ भवन येथे विचार समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन २३आँगस्ट२६ रोजी करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणेडॉ.नंदकुमार द्वा.राजपुरकर होते समवेत सुर्यकांत विरकर महाड, किशोर पितळे पत्रकार तळाअध्यक्ष प्रदीप र.राजपुरकर, महीलाअध्यक्ष वासंतीताई उमरोठकर, माजी अध्यक्ष दीपक राजपुरकर विचार मंचकावर उपस्थित होते. यावेळी ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना डॉ. राजपुरकर म्हणाले कि दैवज्ञ समाज मुरुड यांनी मिटींग बोलावून विखुरलेल्या समाज बांधवांना जमा केले.या माध्यमातून प्रत्येक ज्ञाती बांधवांची तोंड ओळख झाली. दैवज्ञ भवन उभे करून एका छता आणून आपले पांरपारीक सण उत्सव कै.नाना शंकर शेठ पुण्यस्मरण…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
रोहा रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे; पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा येथील रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले लक्ष्मण मोरे यांची निवड करण्यात आली. क्लबचा ९ वा पदग्रहण सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुणे पीडीजी डॉ. शैलेश पालेकर यांच्या उपस्थितीत माजी अध्यक्ष विजय दिवेकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण मोरे यांना अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. यावेळी सचिवपदी मनोज बोराणा, तर खजिनदारपदी रुपेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून वर्षभर उल्लेखनीय सामाजिक व सेवाभावी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि…
*रोह्यात शिवसेनेची भव्य दहीहंडी; विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख २१ हजारांचे बक्षीस* रोहा:समीर बामुगडे रोहा | प्रतिनिधी : रोह्यात यंदाची दहीहंडी चांगलीच गाजणार असून, रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृहासमोरील पटांगणात ही स्पर्धा रंगणार आहे. यंदा रोह्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून या आयोजनाकडे पाहिले जात असून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे नुकतीच भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी अधिक दणक्यात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी…
श्री चंडीका देवीचा जागर सप्ताह मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न. प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे ग्रामदेवता श्री चंडीका देवी सप्ताह श्रावण शुध्द प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत गेली शतकाहून अधीक काळ दैवज्ञ ( सोनार)समाज जागर सप्ताह पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. कालपरत्वे बदल होत गेला असला तरी भावभक्तीने उत्साहाने ती आज पर्यंत जपली आहे.या काळात रोज रात्री हरी भजन व सप्तमी च्या रात्री अहोरात्र भजन सेवा करून पहाटे भजन,भूपाळी काकडारती,आरती करून देवीला(मुखवटा)भजन करीत समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आगमन करून षोडशोपचार पुजा, एकादशणी,अभिषेक,पुण्यहवाचन, श्री लक्ष्मी नारायण वस्त्रालंकार,महा आरती,महाप्रसाद,रात्री शेजारती करण्यात आला.यावेळी यजमान सौ.व श्री गिरीश विनायक वेदक यांच्या हस्ते करण्यात आले.सदर सप्ताहात ज्ञाती…
गावातील वादांना सामोपचाराची वाट; सलोखा जपण्याची चंद्रकांत भगत यांची ग्वाही वाशी ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत भगत यांची बिनविरोध निवड रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) वाशी ग्रामपंचायत हद्दीतील वाशी, महादेववाडी, लांढर व कारिवणे या चार गावांमध्ये सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोपा अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, ग्रामपंचायत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे चंद्रकांत भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना वरगुडे, उपसरपंच श्री.अरविंद मगर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड पार पडली. यावेळी ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग हंबीर, अंतोष शिर्के, दिपाली धामणसे, हरिश्चंद्र मोरे, संदेश बामणे, नरेश कोकरे…
श्री गणेश मित्र मंडळ पुगांवचा कौतुकास्पद उपक्रम स्वखर्चातून आणि श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करत सामाजिक बांधिलकीचा दिला संदेश पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर ) मुंबई–गोवा महामार्गाची रडकथा महामार्गलगतच्या पुगाव स्टॉपपासून रहिवासी नारायण हर्नेकर यांच्या घरापर्यंत ग्रामपंचायत पुगांवच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या सायकलस्वार, दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. खड्ड्यांमध्ये वाहने आदळून अपघात होण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.तर या समस्येबाबत ग्रामस्थ तसेच श्री गणेश मित्र मंडळ पुगांव यांच्या स्वखर्चातून व श्रमदानातून या रस्त्यावरील खड्डे आणि त्याची डागडुगी करण्यात आली असून एक आगळा वेगळा समाजापुढे सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. येथील ग्रामस्थ नागरिकांनी…
तळा येथील हिरकणी कक्ष,स्वच्छतागृह उद्घाटनाचा मुहूर्त कधी?.झाल्यात शोभेच्या वास्तू. प्रतिनिधी / किशोर पितळे तळा एस टी बस स्टँड वर बांधण्यात आलेले स्वच्छता गृह व महीलाबालकल्याण विभागाकडून उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत.स्वच्छतागृहाचे बांधकामा त दिरगांई झाली जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला पत्रकार बंधूनी वृतपत्राचे माध्यमातून लक्ष वेधले काम पुर्ण झाले मग उद्घाटनाला मुहूर्त कधी लागणार ? स्वच्छतागृह सुरु न झाल्याने विशेष महीला वर्गाची कुचंबणा होत आहे.त्यांना आजूबाजूला आडोशाला आधार घ्यावा लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने व प्रवासी वर्ग,जेष्ठ महीला,नागरिक वयोवृद्ध नागरिकांना,चालक,महीला वाहक, विद्यार्थी यांना लघुशंकेला जाता येत नाही सेवा उपलब्ध होऊन हि स्वच्छता गृह बंद आहे.चौकशी केली असता विभागीय…
ताप आला काय, पोरगा गेला काय…! २२ वर्षीय वरद पाटीलच्या मृत्यूने गाव हळहळले; कुटुंबावर दुःखाचा डोंगर रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा येथील आर्किटेक्टचे शिक्षण पूर्ण केलेला अवघ्या २२ वर्षांचा वरद संतोष पाटील (कोळी) याचा तापाच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांसोबत गावात आल्यानंतर वरदला उपचारासाठी रुग्णालयात गेला. तेथे उपचार सुरू असतानाच अचानक त्याची प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव हळहळले आहे. आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न, छोट्या बहिणीचा आधार आणि कुटुंबाच्या भविष्यातील आशा असलेला वरद अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ताप आला होता, उपचारानंतर तो बरा होईल, अशीच अपेक्षा कुटुंबीयांना होती.…
तळा येथे तालुका कृषी विभागा मार्फत रानभाजी महोत्सव साजरा. प्रतिनिधी / तळा किशोर पितळे तळा बस स्थानकात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या तर्फे २०आँगस्ट२६रोजी रानभाजी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.तहसीलदार स्वाती पाटील, नगराध्यक्षा माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव कैलास पायगुडे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी महंमदभाई परदेशी,नथुराम वरंडे कृष्णा चाळके उपस्थित होते महोत्सवात जवळपास २०/२५ प्रकारच्या रान भाज्या मध्ये भारंगा,शेवगा टाकळा, भाजीचा आळू, वडीचा आळु ,कुडाशेग,खवणी भाजी सुरण,माठ तांबडा माठ,इंन्शुलिन प्लांट…
मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात ‘कॅम्पस कनेक्ट’ उपक्रमांतर्गत नशामुक्तीचा संदेश कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर) मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जे.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅरिस्टर ए.आर.अंतुले संकुलात ड्रग्स-मुक्त रायगड जिल्हा अभियानांतर्गत वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात कॅम्पस कनेक्ट उपक्रमांतर्गत नशा मुक्त भारत संकल्पना’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.), आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (D.L.L.E.) आणि मुरुड जंजिरा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी व्यसनाधीनतेची कारणे, त्यातून होणारी शारीरिक व मानसिक हानी आणि याविरोधात पोलीस यंत्रणेकडून मिळणारे सहाय्य याबाबत त्यांनी सविस्तर…

