Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
शैक्षणिक

फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभागातील इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या M.P.S.S इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये (LEAD) अभ्यासक्रमाच्या माध्यमातून AI/JEE/NEET Foundation Course चा नवीन अभ्यासक्रम इयत्ता ६ ते १० वी पर्यन्त विद्यार्थ्यांवर लादण्यात आला आहे. तसेच नव्याने वाढीव फी आकारण्यात आल्याने येथील पालक वर्ग कमालीचा संतप्त झाला. आणि लादण्यात आलेला हा अभ्यासक्रम तसेच त्याचा भार हा अधिक विद्यार्थी वर्गाच्या डोक्यावर येत आहे तसेच वाढीव फी आकारण्यात आली असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालक मंडळ यांच्याकडे आक्रमक भूमिका घेत संतप्त पालकांनी लेखी निवेदनातून केली आहे .

कोलाड आंबेवाडी येथील M.P.S.S. च्या इंग्लीश मेडीयम स्कूलच्या माध्यमातून लिड (LEAD) अभ्यासक्रमाच्या AI/JEE/NEET FOUNDATION कोर्स विद्यार्थ्यांवर लादण्यात आला आहे. तरी या लहान मुलांची मानसिकता व बौध्दीक क्षमता लक्षात घेता त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांना हा अभ्यास समजणे खूप कठीण आहे. तरी हा अभ्यासक्रम मुलांना तसेच तसेच वाढीव आकारण्यात आलेली विद्यार्थी प्रवेश फी ही मान्य नाही यावर मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाने योग्य भूमिका घेत नव्याने लादण्यात आलेला अभ्यासक्रम आणि फी दरवाढ रद्द करावी अशी मागणी एकत्रिपणे पालक वर्गाकडून करण्यात आली आहे.

यावेळी मनोहर अंबाजी महाबळे,मिलिंद गोपाळ पवार, संजय कुर्ले,संदीप माने,शरद सानप,दिपक चंद्रकांत बेटकर,संदिप गोळे, अजय परदेशी, उमेश केदार,सतीश मणके, मंगेश भगत, नागेश सानप, किशोर पानसरे,प्राची निलेश गायकवाड, देवयानी महाबळे, वेदिका मालुसरे, आदी पालक वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया
तर सदरच्या निवेदनातून स्कूलमध्ये (LEAD) अभ्यासक्रमाच्या माध्यमातून AI/JEE/NEET Foundation Course चा नवीन अभ्यासक्रम इयत्ता ६ ते १० वी पर्यन्त विद्यार्थ्यांवर लादण्यात आला आहे ते रद्द करण्यात यावे. तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांची होणार दरवाढ फी,स्कूलचे युनिफॉर्म आहेत ते रोहयामध्ये अमरदिप कडेच मिळतात त्याची किंमत तो भरमसाठ लावण्यात येत असून ती पालकांना परवडत नाही, तसेच त्या युनीफॉर्म (गणवेशाची) किंमत कोण ठरवतो. शाळा, अमरदिप की शिक्षण विभाग ,तर ते कोलाड मध्ये उपलब्ध व्हावे,विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी फिल्टर लावलेले आहे का?,मुला-मुलींसाठी बाथरुम ची व्यवस्था स्वच्छ व सुरक्षित आहे का?,पालकवर्ग आपल्या पाल्याला जेव्हा स्कूल मध्ये घ्यायला येतो तेव्हा (ऊन/वारा/पाऊस) तेव्हा त्या पालकवर्गास उभे राहण्यासाठी छोटीसी शेड आहे का?पुस्तकांच्या मूळ किंमतीची पावती देण्यात यावी.एखाद्या विद्यार्थ्यास खेळताना दुखापत/इजा झाल्यास त्याची व्यवस्था कशी केली जाते त्यावर देखील शाळेत उपाय योजना करण्यात याव्या असे दिलेल्या निवेदनात सर्व उपस्थित पालकांच्या वतीने म्हटले असल्याचे पालक संदीप माने यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया
सुरवातीच्या काळात फाऊंडेशन कोर्स बाबत आयोजित करण्यात आलेल्या उपस्थित पालक सभेत डेमो दाखविण्यात आले होते त्यानुसार लिड (LEAD) अभ्यासक्रमाच्या AI/JEE/NEET FOUNDATION कोर्स विद्यार्थ्यांसाठी यावर्षी सुरू करण्यात आले त्यामुळे त्यांची शिक्षणात होणारी प्रगती आणि बौद्धिक क्षमता हे या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे मात्र जर पालक रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम असतील तर पुढील वर्षी हा कोर्स बंद करण्यात येणार आहे तसेच फी दरवाढी बाबत देखील पालकांच्या सभेतूनच ठरल्या प्रमाणे ही फी वाढवली जात आहे तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनात काही गोष्टींचा उल्लेख केला आहे मात्र त्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं जात आहे तर काही गोष्टींचा अभाव असेल त्यात येत्या काळात सुधारणा केली जाईल तसेच वाढीव फी बाबत देखील संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करून पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुनील महाडिक यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us