Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
ताज्या बातम्या

*रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*

रायगड:समीर बामुगडे

रायगड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध, खवा, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच बार आणि रेस्टॉरंटमधील अन्न व पेयांच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचा खवा, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित प्रमाणात धाडी आणि तपासणी मोहिमा राबवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.

याशिवाय जिल्ह्यात अनेक खाद्य व्यवसाय फूड लायसन्सशिवाय सुरू असल्याचेही बोलले जात आहे. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू असतानाही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दूध संकलन केंद्रे, खवा उत्पादन करणारे कारखाने, मिठाई उत्पादक, हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्स यांची विशेष तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त नितीन मोहिते यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us