Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रायगड जिल्ह्यात आक्रोश मोर्चासाठी जोरदार तयारी; कार्यकर्ता बैठकीत महत्त्वाचे निर्णय रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रायगड जिल्हा व्यापक कार्यकर्ता बैठक सोमवार, 23 मार्च रोजी तळवली (कोलाड) येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात उत्साहात पार पडली. आगामी 16 एप्रिल रोजी मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालय, बांद्रा येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी व्हावेत यासाठी गावस्तरावर तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र बैठका घेऊन सहभागी कामगारांची संख्या निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. असंघटित व संघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. बैठकीस भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण,…

Read More

आई एकविरा देवीच्या दरबारी रोहयातुन पाच पदयात्रा रवाना शेकडो भक्तगणांनी केली कार्ला डोंगराकडे कुच ; बुधवारी आईचा पालखी सोहळा रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) लोणावळा नजिक कार्ला येथे चैत्र महीन्यात साजरा होणाऱ्या आई एकविरा देवीच्या पालखी सोहळयासाठी रोहा येथुन सालाबादप्रमाणे शेकडो भक्तगण पदयात्रा काडुन पायी चालत सोमवारी कार्ला डोंगराकडे निघाले. यंदा रोहा तालुक्यातुन सुमारे सहाशे भक्तगणांनी कार्ला डोंगराकडे कुच केली असुन भल्या पहाटे या पदयात्रा रोहा येथुन मार्गस्थ झाल्या आहेत. बुधवारी 25 मार्चला कार्ले येथील आई एकविरा देवीचा पालखी उत्सव साजरा होणारा आहे. रोहा शहरातील धनगर आळी मंडळ, रोठखुर्द गावातील जय भवानी मंडळ, झोलांबे येथिल हनुमान सेवा मंडळ, खारापटी येथिल आई…

Read More

पर्यावरण असंतुलनामुळे द्रोणागिरी डोंगराला धोका संरक्षणासाठी ठोस पावले उचला; आमदार महेश बालदी यांची लक्षवेधी पनवेल (प्रतिनिधी) उरणमधील ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या संरक्षणाचा मुद्दा आता राज्य विधिमंडळाच्या व्यासपीठावर पोहोचला आहे. स्थानिक आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडून डोंगराच्या जतनासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली आहे. विधानसभेत बोलताना आमदार बालदी यांनी, रामायणापासून उल्लेख असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा वारसा लाभलेला द्रोणागिरी डोंगर उरणकरांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा भाग असल्याचे नमूद केले. तसेच गेल्या काही वर्षांपासून या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, धूप आणि अवैध उत्खनन यामुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त केली. अरवली…

Read More

आदर्शगाव भातसईत श्री महादेवी मातेचा पालखी सोहळा व यात्रोत्सव भक्तिभावात रंगणार प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा पारंपरिक पालखी सोहळा आणि यात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी पालखी सोहळ्याने उत्सवाची सुरुवात होणार असून बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. भातसई गावातील या यात्रेला ऐतिहासिक व धार्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे. गावातील कथेनुसार, अनेक वर्षांपूर्वी एका गुराख्याला मिठकेश्वर जाळी परिसरात श्री महादेवी मातेचे दर्शन झाले होते. देवीने स्वतः गावाच्या पूर्व दिशेला मालावर प्रकट झाल्याचे सांगितले, त्यामुळे हे स्थान स्वयंभू मानले जाते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, पूर्वी…

Read More

*नागोठणे शहरात खासदार श्री धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* प्रतिनिधी सुदर्शन कोटकर नागोठणे भारतीय जनता पार्टी तर्फे खासदार श्री धैर्यशील दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन नवनियुक्त नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांच्या नेतृत्वात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रमुखाने शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी रायगड चे राज्यसभा खासदार तथा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष श्री धैर्यशील ( दादा ) पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शहराच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि दादांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी ग्रामदेवता आई श्री जोगेश्वरी माता चरणी प्रार्थना केली. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉ.श्री कोकणे हॉस्पिटल मध्ये रुग्णांना फळ वाटप केले…

Read More

पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.             पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य वितेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत देशमुख, ऍड. राहुल घरत, दर्शन ठाकूर, स्वप्नील ठाकूर, विश्वनाथ कोळी,…

Read More

*नागोठणे पंचक्रोशी सकल हिंदु समाज आयोजित भव्य हिंदु सम्मेलन* प्रतिनिधी-सुदर्शन कोटकर नागोठणे पंचक्रोशी येथील सकल हिंदु समाज आयोजित विराट हिंदु सम्मेलन धार्मिक आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे वंशज सन्माननीय श्री रघुजी राजे आंग्रे आणि थोर इतिहास आणि गडकोट अभ्यासक श्री सुखद जी राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शिव प्रतिमेस व हिंदु देवतांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानज्येष्ठ समाजसेवक श्री विवेक जी रावकर यांनी भूषविले. मान्यवरांचे स्वागत करून त्यांना श्री गणेश जी राणे यांनी लाइव्ह छायाचित्र काढून भेट देण्यात आल्या. सुरुवातीस श्री…

Read More

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय संकटाचे सावट; कामगार अडचणीत रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) धाटाव औद्योगिक क्षेत्रात सध्या एक गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक कारखान्यांच्या कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे थेट परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, “पैसा आहे, पण गॅस नाही” अशी विचित्र अवस्था उद्योग परिसरात पाहायला मिळत आहे. गॅस अभावी अनेक कॅन्टीनमध्ये स्वयंपाक व्यवस्थाच कोलमडली आहे. काही ठिकाणी चपाती पूर्णपणे बंद करण्यात आली असून, कामगारांना फक्त उपमा, पोहे किंवा शिरा यांसारख्या मर्यादित पदार्थांवर समाधान मानावे लागत आहे. तर काही कारखान्यांनी फक्त नाश्त्यावरच कॅन्टीन…

Read More

नगरसेविका डॉ. अस्मिता घरत यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल (प्रतिनिधी) राज्यातील विविध भागांत नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ किंवा ‘जनसंपर्क अभियानाचे’ आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमधून स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि प्रशासकीय अडचणींवर तत्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो. याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग १७ मध्ये नगरसेविका डॉ. अस्मिता जगदीश घरत यांनी नुकताच ‘जनता दरबार’ आयोजित करून नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या आहेत. नगरसेविका अस्मिता जगदीश घरत यांनी रविवारी (दि.२२ मार्च) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध खात्यांसंदर्भात असलेल्या १०० हून अधिक तक्रारदारांच्या तक्रारी स्वतः नगरसेविका अस्मिता घरत यांनी…

Read More

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; २५ मार्चपासून रायगड जिल्हा कबड्डी संघाचे सराव शिबीर पनवेल (प्रतिनिधी) दिनांक २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला कबड्डी संघांचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हे शिबीर दि. २५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पनवेल येथे उत्साहात पार पडणार आहे. दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे आयोजन भाजपचे…

Read More