Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»*साईनाथ धुळे यांची मनसेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नेमणूक* *राज ठाकरे यांच्या आदेशाने 167 गावांची जबाबदारी*
राजकारण

*साईनाथ धुळे यांची मनसेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नेमणूक* *राज ठाकरे यांच्या आदेशाने 167 गावांची जबाबदारी*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

साईनाथ धुळे यांची मनसेच्या रोहा तालुका अध्यक्षपदी नेमणूक राज ठाकरे यांच्या आदेशाने 167 गावांची जबाबदारी

प्रतिनिधी दिपक सोनावणे


दि. 18:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रोहा येथील निष्ठावंत मनसैनिक  श्री. साईनाथ धुळे यांची *मनसे तालुका अध्यक्ष – रोहा तालुका (पेण विधानसभा क्षेत्र) पदी नेमणूक करण्यात आली आहे.

मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयातून दिनांक 18 मे 2026 रोजी राजसाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीचे नेमणूक पत्र धुळे यांना प्राप्त झाले. ही नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून कामाचा अहवाल पाहून पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे पत्रात नमूद आहे.

नेमणूक पत्रात राजसाहेबांचे स्पष्ट आदेश पक्षाची ध्येय-धोरणे व कार्यक्रम वेळोवेळी संघटनेत निष्ठेने राबवावेत. कामात कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. पदाधिकारी व सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राजसाहेबांनी दिल्या आहेत.

यावेळी बोलताना नवनियुक्त तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे म्हणाले, “2007 पासून मी मनसेचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करत आहे. राजसाहेबांनी माझ्यावर पेण विधानसभा 191 मधील सर्वात मोठा तालुका असलेल्या रोहा तालुक्यातील 167 गावे व रोहा शहराची  जबाबदारी सोपवून पुन्हा एकदा विश्वास दाखवला. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी व रोहा तालुक्यातील सर्व मनसैनिक जीव ओतून काम करू. मराठी बांधव, भगिनी व मातांना अभिमान वाटेल असेच काम आमच्या हातून होईल.”

शिस्तीत काम, उपद्रव न करता रिझल्ट  हे ब्रीदवाक्य घेऊन रोहा तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व आगामी काळात पेण विधानसभा मतदारसंघात मनसेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धुळे यांनी सांगितले.

साईनाथ धुळे यांच्या नेमणुकीबद्दल रोहा तालुक्यातील मनसैनिक व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us