एसआयआर अभियानाच्या पनवेल विधानसभा प्रमुखपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती पनवेल (प्रतिनिधी) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १८८ – पनवेल विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही परेश ठाकूर यांचे अभिनंदन होत…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन पनवेल तालुका पत्रकार विकास मंचासोबत वार्तालाप कार्यक्रमाचे केले होते आयोजन जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही… — राजिप अध्यक्ष, मंगेश वाकडीकर पनवेल / प्रतिनिधी पनवेल मधील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने रविवार दिनांक २९ मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या समवेत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचातील तमाम सदस्यांनी मंगेश वाकडीकर यांचा यावेळी सत्कार करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत विस्तृतपणे त्यांची कार्यपद्धती आणि व्हिजन हे मंचातील सदस्यांसमवेत शेअर केले. दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देखील मंगेश…
मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा प्रतिनिधी – शुभ्रा आडाव न्हावे रेवदंडा परिसरातील सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणाऱ्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रामनवमीच्या पावन दिवशी, गुरुवार दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे कै. सुर्वे या सर्वांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. कोणालाही मदतीची गरज भासली की तत्परतेने पुढे सरसावणे, प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि नातेसंबंध जपण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या साधेपणातही माणुसकीची…
आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण . तळा -किशोर पितळे -आ.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तळा तालुक्यातील गो.म.वेदक माध्यमिक विद्यामंदिर,कन्या शाळा यांना डिजिटल आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल वस्तूंचा समावेश होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.निलेश रातवडकर यांनी सांगितले कि आ.निरंजन डावखरे हे महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आ.निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून डिजिटल साहित्य शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यास प्रोत्साहनमिळेल.शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल साधने पोहोचल्याने शिक्षणात समावेशकता आणि समान संधीची भावना वाढण्यास मदत होणार असल्याने तळा तालुक्याचे वतीने…
कंत्राटी ते कायम: जनरल मजदूर सभेच्या लढ्याला मोठं यश, बेक केमिकल्समध्ये १८ कामगारांना कायम दर्जा प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या जनरल मजदूर सभेच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बेक केमिकल्स कंपनीतील १८ कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनरल मजदूर सभा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या करारानुसार या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत यापूर्वी ६ कामगारांना कंपनीच्या थेट रोलवर कायम करण्यात आले होते. आता नुकतेच आणखी ६ कामगारांना कायम दर्जा देण्यात आला असून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे…
श्रीवर्धन विधानसभा BLA-1 प्रमुखपदी अमित घाग रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) भारतीय जनता पक्षाच्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर १९३-श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रासाठी BLA-1 (विधानसभा प्रमुख) पदावर रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित घाग यांच्या नियुक्तीमुळे मतदार पुनर्निरीक्षण अभियानाला गती मिळणार असून, बूथस्तरावर मतदार नोंदणी व संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात भाजप संघटन अधिक मजबूत होणार असल्याची…
रायगड नाभिक तरुण संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; पदनियुक्ती सोहळा उत्साहात रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीचा पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष सुदाम बाबू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विश्वस्तांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात दिनेश मोरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी आदेश बुरुणकर (दक्षिण विभाग), भगवान निमुतकर (मध्य विभाग) आणि विनोद पवार (उत्तर विभाग) यांची निवड झाली. मुख्य सचिवपदी सुरेंद्र पालांडे यांची निवड करण्यात आली असून सहसचिवपदी सचिन दिवेकर (दक्षिण), विजय भोसले (मध्य) आणि जयेश मोरे (उत्तर) यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी योगेश शिर्के, हिशोब तपासनीसपदी नितीन बडे तर सह…
इच्छितदाता श्री स्वामी समर्थ मठ राणेचीवाडी तृतीयवर्धापन दिन साजरा. तळा -किशोर पितळे-तळा राणेचीवाडी येथील इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मठाचा तृतीय वर्धापन २५/३/२०२६ चैत्र शुद्ध ७ बुधवार रोजी ब्र.भू.गुरूवर्य प.पू.अण्णा म्हस्के यांच्या आशिर्वादाने प.पू . सद्गुरू दादा महाराज दामले श्री स्वामी आरती व सेवामंडळ नारायण पेठ पुणे,मठाचे मठाधिपती यांच्या प्रेरणेने व कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी ५.३०वा. महेंद्र कजबजे मित्रमंडळ काकड आरती,७वा.श्री स्वामी मुर्ती वर अभिषेक सकाळी८वा स्वामी याग,(पौराहित्य संजय केळकर रेवदंडा सहकारी)१०.३०नैवैद्यआरती,दुपारी .१२.३० महाप्रसाद सायंकाळी ६वा. नैवद्य आरती सायं ६.३०वा.गुरूवर्य प.पू. दादा महाराज दामले यांचे अमृतमय प्रवचन, श्रीस्वामी गीत गान व सत्कार समारंभ,रात्रौ.८वा. महाप्रसाद अशा धार्मिक…
श्री तीर्थ क्षेत्र तळाघर नगरी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली,शुभ मंगलम सावधान, ऐतिहासिक महादेवाच्या यात्रेला अलोट गर्दी,हर हर महादेवाच्या जयघोषात देवाचा लग्न सोहोळा थाटामाटात,लाखोंची उलाढाल. रोहा (श्याम लोखंडे/नंदकुमार बामुगडे) रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळाघर नगरी हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमली चैत्र महिन्यात भरविण्यात आलेल्या रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि महाराष्ट्रातील आगळीवेगळी बहुजन समाजाच्या प्रथा ,परंपरा जपणाऱ्या तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणी पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी २६ व २७ मार्च रोजी दोन दिवस अलोट गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.दरवर्षी रामनवमीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी रात्रौ बारावाजता श्री महादेवाचे लग्न…
आंबेवाडी–निवी कालवा घनकचऱ्याच्या विळख्यात; साफसफाईवर प्रश्नचिन्ह, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तीव्र रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) आंबेवाडी ते निवी कडे जाणाऱ्या रायगड पाटबंधारे विभागाच्या कालव्याला परिसरातील घनकचऱ्याने वेढा घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला असून, प्रत्यक्षात साफसफाई झाली का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढते तापमान आणि प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा भीषण उन्हाळ्यात किमान पाणी सोडावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्याची अवस्था पाहता यंदाही पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे. आंबेवाडी परिसरातून जाणाऱ्या या कालव्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी सोडले गेले नसल्याने नागरिकांनी…

