ग्रामसेवक दीपक चिपळूणकर यांचे दुःखद निधन रोहा (शैलेश गावंड) निवि येथील रहिवासी व माजी ग्रामसेवक दीपक दाजी चिपळूणकर यांचे वयाच्या 59 व्या वर्षी दिनांक 26 मार्च रोजी दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रोहा तालुक्यातील धाटाव व अन्य ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी ग्रामसेवक म्हणून यशस्वीरित्या सेवा बजावली मनमिळाऊ स्वभाव आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी सर्वत्र आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता व विस्तार अधिकारी हे बढती चे पद सुद्धा भूषवले होते त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना काही पुरस्काराने गौरवण्यात सुद्धा आले होते ते वृक्ष प्रेमी होते झाडाझुडपांची त्यांना आवड असल्याने त्यांनी अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली ते सतत वृक्ष लागवड करीत…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
*भव्य रामनवमी उत्सव २०२६ रोह्यात उत्साहात साजरा* रोहा : नंदकुमार बामुगडे प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून रोहा परिसरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरातील महिलांनी एकत्र येत मारुती चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी पारंपरिक मराठी साजातील साड्या परिधान करून लेझीमच्या तालावर आकर्षक सादरीकरण केले. त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्सवी बनले. कार्यक्रमाचा तपशील : • दिनांक : गुरुवार, २६ मार्च २०२६ • वेळ : सायंकाळी ६:०० वाजता मुख्य सोहळा • स्थळ : मारुती चौक, रोहा विशेष आकर्षण म्हणून योगा समूहातील महिलांनी योगासनांचे सादरीकरण केले. तसेच…
मनमिळावू स्वभावाच्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे निधन; परिसरात हळहळ प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा मनमिळावू व आपलासा करणारा स्वभाव म्हणून ओळख असलेल्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कै. सुर्वे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सून, जावई तसेच नातू-नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या प्रेमळ व जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांची अंत्ययात्रा दि. २७ मार्च रोजी सकाळी १०.०० वाजता साई छाया सोसायटी, बँक ऑफ इंडिया जवळ, रेवदंडा येथून निघणार आहे. ईश्वर…
रोहा श्रीक्षेत्र तळाघरच्या ऐतिहासिक स्वयंभू महादेवाची यात्रा, हजारोंच्या संख्येने भक्तगण यात्रेत दाखल,जत्तर काठ्यांचे वाजत गाजत स्वागत,मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती. कोलाड ( श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या श्री क्षेत्र तळाघर येथील स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा २६ ते २७ मार्च रोजी साजरा होत आहे. या यात्रेत महादेवाचे लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्याने पारंपरिक विधिवत पध्दतीने कार्यक्रम होतात. तर सदरच्या यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपपला व्यवसाय थाटून व्यवसायासाठी सज्ज आहेत. यात्रेतील वैशिष्टय म्हणजे चिंबोरीचे कालवणासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री मागील दोन दिवस झाली असल्याचे समजते. तर गुरुवारी रात्रौ बारा वाजता शंभू महादेवाचे धार्मिक तथा…
पनवेलमध्ये ४ एप्रिल रोजी ‘खुशरंग’ संगीत महोत्सव; दिग्गज कलाकारांची उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०४ एप्रिल रोजी पनवेलमध्ये भव्य ‘खुशरंग’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत रसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असून, शास्त्रीय संगीत, भजन आणि कथक नृत्याचा संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सायंकाळी रंगणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवात किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तुर यांचे शिष्य…
आमदार महेश बालदी यांच्या मुद्द्यांवर सरकार गंभीर; सिडको अधिकाऱ्यांवर कारवाई होणार सिडको कारभारातील अनियमिततेवर उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेत मांडला गंभीर मुद्दा पनवेल (प्रतिनिधी) सिडको महामंडळाच्या कारभारातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश बालदी यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक बाब उपस्थित केली. विशेषतः सिडकोतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या कथित पाठबळामुळे गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या चर्चेद्वारे त्यांनी सिडकोमधील विविध स्तरांवर सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे शासनाचे लक्ष वेधले. १२.५ टक्के भूखंड परतावा योजना, सिडकोच्या पाणीपुरवठा व्यवस्था, गृहनिर्माण योजना, नैना प्रकल्प, भूखंड वाटप, बांधकाम परवानग्या…
चंद्रपुर वनविभागातील सावली परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र पाथरी येथील वाघाचा मृत्यु चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत परिक्षेत्र सावली, उपक्षेत्र व नियतक्षेत्र पाथरी मधील वन कक्ष क्रमाक 298 राखीव वन मधिल दिनांक 23.03.2026 रोजी वाघाच्या शरिराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याची व त्यातील काही अवयव काढुन ठेवल्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर वनविभागाने तात्काळ दखल घेत क्षेत्राची पाहणी केली असता दुपारी सुमारे 12.00 वाजता मृत वाघाचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसुन आले. त्यातील काही अवयव घटनास्थळावरुन गहाळ असल्याचे दिसुन आले. त्यानुसार प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असुन चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर चे मा. मुख्य वनसंरक्षक श्री. आर.एम.रामानुजम (भावसे) यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर वनविभाग,…
रोहा रेल्वे स्थानकाची मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून पाहणी; प्रवाशांसाठी ‘मोठी आनंदाची बातमी’ लवकरच रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा रेल्वे स्थानकाची आज, दि. २५ मार्च रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी भेट देऊन सर्वंकष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान रोहा रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष फैसल अधिकारी व गणेश मासक यांनी महाव्यवस्थापकांची भेट घेऊन प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. पाहणीवेळी महाव्यवस्थापकांनी स्थानकावरील प्रवासी सुविधांबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या कोच इंडिकेटर (Coach Indicators), ‘ट्रेन ऑन डिस्प्ले’ (Train on Display) तसेच नवीन पादचारी पूल (FOB) यांसारख्या अत्यावश्यक कामांना गती देण्यात आली असून ती प्रगतीपथावर आहेत. यावेळी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वे…
🚨 युद्धाचा परिणाम थेट रोह्यावर; पेट्रोल-डिझेल टंचाईचा गंभीर इशारा, नागरिकांत भीतीचे वातावरण रोहा जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धस्थितीचे परिणाम आता थेट रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यावर दिसू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला असून, येत्या काही दिवसांत गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहा शहर व परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा अनियमित झाला आहे. काही पंपांवर “No Stock” चे फलक लावण्याची वेळ आली असून, नागरिकांना इंधनासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अचानक वाढलेल्या मागणीमुळे उपलब्ध साठा काही तासांतच संपत असल्याची माहिती पंप चालकांनी दिली.…
१० वर्षांची गुलामगिरी अन् दोन मुलींची तीन वर्षांची ताटातूट संपली.सर्वहारा जन आंदोलनाच्या रेट्यामुळे दोन मुलींची सुटका आई वडिलांशी भेट. कोलाड (श्याम लोखंडे) गेल्या दहा वर्षांपासून कोळसा भट्टीवर विटबिगारी करणाऱ्या वाघमारे कुटुंबाची अखेर छळातून सर्वहारा जनआंदोलनाच्या अथक पाठपुराव्यामुळे मुक्तता झाली असून, मालकाच्या ताब्यात असलेल्या मजुरांच्या दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी गळाभेट झाल्याचे समोर आले आहे. ‘सर्वहारा जन आंदोलन’ संघटनेने केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे हे यश आले असल्याची माहिती संघटनेच्या प्रमुख व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या मार्गदर्शाखाली संघटनेचे मुख्य पदाधिकारी सोपान सुतार यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती मूळचे वरवटणे (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले संतोष जानू वाघमारे आणि…

