Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»परेशदादा चषक २०२६ नाईट क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या

परेशदादा चषक २०२६ नाईट क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

परेशदादा चषक २०२६ नाईट क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) भाजपा पनवेल शहर मंडलाच्यावतीने पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परेशदादा चषक २०२६ या भव्य नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानात रविवारी १७ मे २०२६ रोजी या स्पर्धेचा थरार रंगला. सेवा क्षेत्रातील विविध व्यक्ती, अधिकारी वर्ग आणि तज्ज्ञ यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट सामन्यांना क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपाचे पनवेल शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजाराव यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चषक स्पर्धेत विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या संघांनी मैदानात उतरून आपला उत्कृष्ट खेळ दाखवला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यांमध्ये वकिलांच्या संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आणि मानाचा चषक पटकावला. तर डॉक्टरांच्या संघाने उत्कृष्ट लढा देत द्वितीय क्रमांक मिळवला. या सामन्यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, दशरथ म्हात्रे, अजय बहिरा, गणेश कडू, नगरसेविका प्रीती जॉर्ज, रुचिता लोंढे, शिवानी घरत, अस्मिता घरत, माजी नगरसेवक सुनिल बहिरा, उमेश इनामदार, प्रशांत शेट्ये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us