Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

  भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष; कार्यकर्त्यांचा सेवा व निष्ठेचा संकल्प कायम पनवेल (प्रतिनिधी) जगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज ( दि. ०६ एप्रिल) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९८० साली स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या अनेक दशकांत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पक्ष ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला यसेच पक्षाच्या संस्थापकांचे आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीप्रती निष्ठा राखण्याचा आणि समाजसेवेचा संकल्प…

Read More

जत्रा ठरते आंदोलनाचा आवाज, प्रशासनाला जागे करण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार ! तळा -किशोर पितळे-तळा तालुक्यातील बारपे गावात सुरू असलेल्या अनाधिकृत खडी क्रशर प्रकल्पा विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. महागाव येथील वरदायीनी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हातात बॅनर घेऊन शांततापूर्ण पण ठाम विरोध दर्शवला.गेल्या काही महिन्यांपासून बारपे गावातील परिसरात सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे धूळ प्रदूषण, आवाजाची समस्या आणि शेतीवर होणारा परिणाम याबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीतपरिणामहोतआहे. *प्रशासनाला जागे करण्यासाठीजत्रेतून दिला संदेश गावातील पारंपरिक जत्रेत मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, याच संधीचा फायदा…

Read More

अश्वत्थ मारुती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा; हजारो भाविकांची उपस्थिती रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त राजमुद्रा फाउंडेशन आणि श्री मारुती भक्त मंडळ यांच्या वतीने रोठ बुद्रुक येथील अश्वत्थ मारुती मंदिरात यंदाही भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून अश्वत्थ मारुती मंदिरात हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, प्रत्येक वर्षी भाविकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या उत्सवाची व्याप्ती अधिक भव्य होत असल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांसह परिसरातील भाविकांसाठी हा उत्सव एक श्रद्धेचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू बनला आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे रुद्राभिषेकाने झाली. वेदघोष आणि…

Read More

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान _’लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील व कामगारनेते राज पार्टे प्रमुख अतिथी_ राज्यातील विविध क्षेत्रातील तब्बल 42 नामवंतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व आई फाऊंडेशन आयोजित स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलनात करण्यात आला. याप्रसंगी ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगारनेते राज पार्टे यांच्यासह संमेलनाध्यक्ष विनोदराव मोरे व संमेलनाध्यक्ष कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे, स्वागताध्यक्ष डॉ.बी.एन.खरात, उद्योजक संचालक उदय वाघेरे आदी मान्यवरांच्या हस्ते रायगड…

Read More

*’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ स्वच्छ,सुंदर बस स्थानक अभियान!,तळा बसस्थानकाला कमिटीची भेट. *महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आयोजन. तळा -किशोर पितळे-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेयांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येत असून अभियानाची अमंलबजावणी प्रत्येक विभागात केली जात असून मध्यवर्ती कार्यालयाकडून दि.३एप्रिल२६रोजी पालघर विभागाकडून तळा बस स्थानकात विभाग नियंत्रक कैलास पाटील विभागीय कर्मचारी वर्गअधिकारी विजय पवार समवेत रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार यांनी येऊन पहाणी केली.यावेळी जेष्ठ पत्रकार किशोर पितळे प्रवासी मित्र प्रतिनिधी जनार्दन वडके वाहतूक नियंत्रक श्री वारगुडे उपस्थित होते यावेळी स्पर्धात्मक अहवाल भरून घेण्यात आला.…

Read More

शिवसेनेतून हकालपट्टी; आरोप निराधार – ऍड. मनोज कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यात शिवसेना संघटन वाढवणाऱ्या ऍड .मनोज कुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या निर्णयानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत, आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे असल्याचा ठाम दावा केला. ते म्हणाले की, “राजकारण हे सुसंस्कृत व अभ्यासू माणसांचे क्षेत्र राहिलेले नाही. चांगल्या-वाईट माणसाची पारख न करता निर्णय घेतले जातात. मला पक्षातून काढल्यामुळे मी व्यथित झालो असून यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे ‘राजकारण लय वंगाळ आहे’ हे शब्द आठवले.” रोहा येथे झालेल्या शिवसेनेच्या…

Read More

*नागोठणे नगरीची आराध्य देवता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता आणि श्री भैरवनाथ महाराज पालखी सोहळा – 2026* प्रतिनिधी:सुदर्शन कोटकर सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नागोठणे गावाची जागृत श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात आणि भक्तिमय, धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. नागोठणे हे तसे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असून ऐतिहासिक महत्व असलेले नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नगर आहे. शहराजवळ असलेले अष्टविनायक मंदिरांपैकी एक श्री बल्लाळेश्वर मंदिर, मुरूडचा महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग सागरी किल्ला, अलिबाग समुद्र किनारा व कुलाबा किल्ला अशा सर्वच ठिकाणी जाण्यासाठी नागोठणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. अशा या ऐतिहासिक नगरी मध्ये गावदेवीचा पालखी सोहळा म्हणजे भाविकांसाठी मोठा भक्तीचा सण असतो. आदल्या दिवशी नागोठणे…

Read More

भातसई येथे आई महादेवी उत्सवात पारंपरिक गळ टोचण्याच्या कार्यक्रमास भाविकांची गर्दी रोहा (शैलेश गावंड) रोहा नजीकच्या भातसाई या गावा मध्ये दरवर्षी प्रमाणे या वेळी सुद्धा दिनांक १ एप्रिल रोजी आई महादेवी आणि श्री धावीर महाराज यांच्या उत्सवा निमित्त यात्रा भरली होती यावेळी काही भक्त गण पाठी ला लोखंडी गळ टोचून घेतात त्यातील एका भक्त गणा ला सुमारे दोन मजले उंची वरील एका आडव्या लाकडी खंबा ला लटकून एक फेरी मारली जाते या पूर्वी पाच फेऱ्या मारल्या जात असत आश्चर्य म्हणजे दोन लोखंडी गळ पाठी मधे टोचून सुद्धा जराही रक्त येत नाही आणि कोणताही त्रास जाणवत नाही त्या मुळे हा चमत्कार…

Read More

विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार   पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना महापौर नितीन पाटील यांनी आज झालेल्या महासभेत प्रशासनाला दिल्या.शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, नगर विकास सचिव, सभागृह नेते ऍड. प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक,…

Read More

रोहा नगरपरिषद सभेत राजकीय रंगत; अजितदादा पवार यांच्या नावाने वास्तूची मागणी रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत चांगलीच राजकीय रंगत पाहायला मिळाली. शहर विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच, नगरसेवक रोशन चाफेकर यांनी एक लक्षवेधी आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मागणी पुढे आणत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस असलेल्या चाफेकर यांनी मांडले की, राज्याचे ज्येष्ठ नेते Ajit Pawar यांच्या नावाने रोहा शहरात एखादी भव्य वास्तू उभारावी किंवा विद्यमान महत्त्वाच्या इमारतीस त्यांचे नाव देण्यात यावे. त्यांच्या या प्रस्तावामुळे सभागृहात काही काळ चर्चा आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. चाफेकर यांनी आपल्या भूमिकेत सांगितले की, अजितदादा…

Read More