Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रोह्यात पावसाची हजेरी खांब कोलाड परिसरातील चिंताग्रस्त बळिराजा सुखावला. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब कोलाड परिसरातील शेतकरी गेली अनेक दिवसांपासून शेतात खरिपाची पेरणी केलेल्या धानाला वेळेवर पाणी मिळावे यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते.तर काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. नेहमीपेक्षा या वर्षीचा पाऊस लांबल्याने तसेच गेली दहा पंधरा दिवस पावसाच्या अभावामुळे शेतात काहींची धान पेरणीची कामे रखडली खूप मोठ्या प्रमाणातील उष्णता आणि गर्मीने खरिपात भातशेती कोरडी पडली त्यामुळे बळिराजा चांगलाच संकटात सापडला असल्याचे दिसून येत होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी पावसाने रिम झीम केली.तर रविवारी दुपारी बारा वाजता नंतर कोलाड खांब परिसरात हजेरी लावली नंतर जोर धरत उशिराने अधिक…

Read More

रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्याम लोखंडे यांची बिनविरोध निवड मिलिंद अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थितीत रोहा प्रेस क्लबची नवी कार्यकारिणी जाहीर; रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोहा प्रेस क्लबच्या नव्या अध्यक्षांची व कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्याम लोखंडे यांची रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहा प्रेस क्लब ही संस्था रायगड प्रेस क्लब तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असून जिल्ह्यातील जागृत, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांची संघटना म्हणून ओळखली जाते. नव्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेचा कार्यक्रम माजी अध्यक्ष सुहास खरिवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…

Read More

लांढर शाळेत वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप कष्टाच्या कमाईतून शिक्षणाला हातभार; माजी विद्यार्थ्यांनी सौरभ खेरटकर यांचा आदर्श घ्यावा : पत्रकार जितेंद्र जाधव रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आदर्श लांढर येथील राजिप शाळेत शनिवारी (दि. २०) पाहायला मिळाला. दोस्ती ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सौरभ खेरटकर यांनी स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून विद्यार्थ्यांसाठी वह्या व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत मातृशाळेप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमास रोहा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, सुयोग जाधव, साहिल खेरटकर, रोहित जंगम, दैनिक पडवल, सौरभ खेरटकर, शाळेचे शिक्षक दिपक पाटील,…

Read More

वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल मध्येशैक्षणिक साहित्य वाटप. तळा -किशोर पितळे वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष२६/२७पहिल्याच दिवशी दानशूर व्यक्ती श्री सद् गूरु प्लबिंग कॉन्ट्रॅक्टर विवेक साबळे बारपे यांनी शालेय साहित्य वाटप करून खारीचा वाटा उचलून सामाजिक बांधिलकीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रयत्न केला आहे. वरदायिनी विद्यालय महागाव हायस्कूल हे डोंगराळ दुर्गम भागात असून आदिवासी वाडीतील गरीब विद्यार्थी तसेच वरच्या भागातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले त्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता हे बघून समाधान पाहायला मिळाले. त्यांचे वडील विठोबा हरी साबळे हे महागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आई विजया विठोबा साबळे माजी सभापती त्याला यांचा वारसा चालवत विवेक साबळे सामाजिक बांधिलकी…

Read More

*रोहा: बनावट मोजणी नकाशाप्रकरणी तहसीलदारांची नगरपरिषदेला महत्त्वाची ताकीद* रोहा:प्रतिनिधी समीर बामुगडे रोहा (रायगड) मौजे रोहा येथील सर्वे नंबर ६१, प्लॉट नंबर ८ संदर्भात बनावट मोजणी नकाशा तयार करण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, या नकाशाच्या आधारे कोणतीही बांधकाम परवानगी देऊ नये, असे कडक निर्देश तहसीलदार रोहा यांनी नगरपरिषदेला दिले आहेत. रोहा येथील रहिवासी श्री. उमेश गोपाळदास वैष्णव यांनी दिनांक १०/०४/२०२६ रोजी तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. मो.र.नं. ७२/१९७८ अंतर्गत सर्वे नंबर ६१ मधील प्लॉट नंबर १ ते ८ चा मोजणी नकाशा खोटा बनविण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. उपअधीक्षक भूमि अभिलेख…

Read More

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोलाड, खांब, सुतारवाडी, विभागीय कुणबी समाज एकटवला,प्रमोदशेठ म्हसकर यांच्या माध्यमातून विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा. कोलाड (श्याम लोखंडे) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागात ग्रुप कोलाड,खांब, आणि सुतारवाडी यांच्या वतीने व कुणबी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोदशेठ अनंत म्हसकर यांच्या विशेष सहकार्यातून रविवारी 21 जून रोजी कोलाड येथे भव्य दिव्य इयत्ता दहावी बारावी सह उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सन्मान सोहळा तसेच कुणबी जोडो अभियान आयोजित करण्यात आला असून यासाठी विभागीय कुणबी समाज ग्रुप कोलाड,खांब,आणि सुतारवाडी यांच्या वतीने कोलाड विभागीय अध्यक्ष राजेश कदम सह खांब, सुतारवाडी विभागीय पदाधिकारी कुणबी समाजाचे कार्यसम्राट युवानेते…

Read More

*रायगड जिल्हा परिषद शाळा, गायमुख येथे प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा.. शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने स्वागत. *तळा:किशोर पितळे : उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टीसंपवून, मनात नवीन आशा-आकांक्षा आणि हातात नवीन वह्या-पुस्तके घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी १५जून रोजी उत्साहात शाळेत आपले पहिले पाऊल टाकले. यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक औंक्षण करत नवोदित विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला.रायगड जिल्हा परिषद शाळा गायमुख येथे शैक्षणीक वर्ष *२०२६-२७* च्या प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा… शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने प्रारंभानिमित्त *शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा*अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न…

Read More

पुणे येथे राष्ट्रीय मराठा पार्टीच्या विविध पदाधिका-यांची नियुक्ती जाहीर. विशेष वृत्त (शैलेश गावंड) राष्ट्रीय मराठा पार्टी च्या विविध पदाधिकाऱ्यांची दिनांक १४ जून रोजी निवड पुणे येथे जाहीर करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी सौ सुनिता लोकेश जाणवेकर. राष्ट्रीय मराठा पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख पदी श्री.मनोज भिमराव बाऊस्कर तसेच राष्ट्रीय मराठा पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाअध्यक्ष पदी श्री.रामदास मनाजी जरे पाटील यांची नियुक्ती राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी केली आहे. येणा-या महाराष्ट्र राज्यातील लोकसभा,विधान सभा, नगरपरिषद, महानगर पालिका,जिल्हापरिषद, पंचायत समिती ,ग्रामिण व शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये भगवा झेंडा…

Read More

रोहा नगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; नवीन ज्युनिअर कॉलेजसाठी CSR मधून ५ कोटींचा निधी मंजूर.- श्री. रविंद्र चाळके रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सव २०२६ अंतर्गत रोहा नगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. रोहा नगरपालिकेच्या डॉ. सी. डी. देशमुख शिक्षण संकुलातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, रोहा उर्दू शाळा, दमखाडी शाळा, अष्टमी मराठी शाळा व अष्टमी उर्दू शाळा येथे हा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या वेळी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सभापती रविंद्र सुधीर चाळके यांनी स्वतः बैलगाडी तूं मुलांना घेऊन शाळेत आले. या कार्यक्रमास शिक्षण, क्रीडा…

Read More

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन वहाळ येथील पीएमश्री शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; डिजिटल शिक्षण व मूल्यशिक्षणावर भर पनवेल (प्रतिनिधी) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करून आणि औक्षणाने स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ येथे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.…

Read More