Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा,अतिशय उत्साहात विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने म्हसळा गवळवाडी दुमदुमली
ताज्या बातम्या

प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा,अतिशय उत्साहात विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने म्हसळा गवळवाडी दुमदुमली

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा,अतिशय उत्साहात विठ्ठल-रखुमाईच्या

नामघोषाने म्हसळा गवळवाडी दुमदुमली

प्रतिनिधी /रवींद्र लाड 

म्हसळा:म्हसळा शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवळवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.पहाटेपासून मंदिर परिसरात विठ्ठल नामाचा गजर,भजन-कीर्तन आणि वारकऱ्यांच्या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या सोहळ्यात पीएमश्री राजीप प्राथमिक शाळा,म्हसळा क्रमांक १,न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तसेच केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आकर्षक दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी,पालकांनी आणि वारकरी भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भजन,कीर्तन, नृत्यगीत सादर केले.त्यानंतर झालेल्या महाआरतीत सहभागी होत सर्वांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.यावर्षी आषाढी एकादशी पूजेचा मान गवळवाडी ग्रामस्थ व महिला मंडळाचे सदस्या रेश्मा राजेंद्र खताते यांना मिळाला.सुधाकर जंगम यांनी केलेल्या मंत्रोपचारात त्यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली.या प्रसंगी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाच्या वतीने उपस्थित भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
भक्ती,परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा सुंदर संगम घडविणारा हा आषाढी एकादशी महोत्सव वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचा जिवंत वारसा जपणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि दानशूर भक्तांचे ग्रामस्थ,महिला मंडळ, वारकरी मंडळी तसेच सर्व सहभागींचे मंडळ अध्यक्ष अशोक काते, आणि पदाधिकारी यांनी स्वागत व कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us