Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहातअध्यक्षपदी ॲड मिलन शहा यांनी स्वीकारला पदभार
ताज्या बातम्या

रोहा लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहातअध्यक्षपदी ॲड मिलन शहा यांनी स्वीकारला पदभार

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहातअध्यक्षपदी ॲड मिलन शहा यांनी स्वीकारला पदभार.

कोलाड (श्याम लोखंडे)

रोहा तालुक्यात गेली पन्नासवर्षाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला,क्रीडा,अशा विविध क्षेत्रात अलौकिक काम करत असणाऱ्या रोहा लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी ॲड. मिलन शहा, तर सेक्रेटरीपदी संजय एकल, खजिनदार माया शहा, उपाध्यक्ष जयदेव पवार यांची निवड करण्यात आली. रोहा लायन्स क्लबचा ५३ वा पदग्रहण सोहळा रोहा येथील अक्षय लॉन निवी येथे लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल ३२३१ ए ४ चे जिल्हा प्रांतपाल एम जे एफ लायन प्रविण सरनाईक यांच्या उपस्थितीत मावळते अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला तर प्रसंगी यांच्याकडून ॲड मिलन शहा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

रोहा लायन्स क्लबचा सन २०२६/२७ या वर्षाचा पदग्रहण सोहळा अक्षय लॉन येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ प्रवीण सरनाईक,जिल्हा सेक्रेटरी नयन कवळे,रिजन चेअर पर्सन विद्या अधिकारी, झोन चेअर पर्सन मंजुषा कुद्रीमोती,माजी अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर, नवे अध्यक्ष मिलन शहा सह मान्यवर तसेच आदी रोहा लायन्स क्लबचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व लायन सदस्य व लायन महिला सदस्या बहुसंख्येने उपस्थित होते.

मावळते अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांनी वर्षभरात केलेल्या सामाजिक कामांचा आढावा तसेच क्लबने विविध स्तरावर राबविलेले उपक्रम उपस्थितांसमोर मांडला.तसेच वर्षभर कार्यक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या लायन्स सदस्यांचा सन्मान सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करत वर्षभर उपक्रम राबवताना मदत करणाऱ्या सदस्यांचे आभार मानले. तसेच नव्या पाच सदस्यांना इन्डक्शन ऑफिसर जिल्हा सेक्रेटरी नयन कवळे यांनी सदस्यत्व शपथ दिली .

त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि विविध पदांसाठी शपथ घेतली यावेळी सेक्रेटरी संजय एकल,सह सेक्रेटरी संदीप सावंत, खजिनदार माया शहा, सह खजिनदार अलका नांदगावकर, तर उपाध्यक्षपदी जयदेव पवार, कृष्णा जराग यांनी शपथ ग्रहण करत पदभार स्वीकारले तद्नंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड मिलन शहा यांचे उपस्थितीत सऱ्या सदस्यांनी विविध नाच गाण्यांच्या तालावर वाद्यात स्वागत करत त्यानंतर जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन प्रविण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ ग्रहण करत अध्यक्षपदाची सूत्रे हाती देण्यात आली. रोहा तालुका आणि परिसरात गेली पन्नास वर्षापासून हे क्लब सामाजिक बांधिलकीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात सदैव यशस्वी ठरत असल्याचे कौतुक जिल्हा प्रांतपाल सरनाईक यांनी केले.तर रोहा शहर आणि ग्रामीण भागातील गावागावात विविध उपक्रम राबविण्यात रोहा लायन्स क्लब प्रगतीपथावर असून भविष्यात अधिक रोहा क्लब च्या माध्यमातून चांगले उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा प्रसंगी कार्यक्रमात व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या तर लायन जयदेव पवार यांनी राज्यस्तरीय रन मध्ये विशेष कामगिरी केल्या बद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते व लायन्स क्लब च्या वतीने सन्मान करण्यात आला.

अध्यक्षपदाच्या काळात आरोग्य आणि शैक्षणिक,पर्यावरण, क्षेत्रात मोठे काम करण्याचा संकल्प हा क्लबचा सदैव आहेच. परंतु अधिक नवी उमीद नवे संकल्प घेऊन लायन्स क्लब अधिक पुढे जिद्दीने काम करेल तसेच लायन्स क्लब आणि इतर सामाजिक संस्था आणि अधिक जोडला गेलेला मित्र परिवार यांच्या माध्यमातून लायन्स क्लबच्या माध्यमातून अधिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत .असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड मिलन शहा आणि मावळते अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी अध्यक्ष रविंद्र घरत, अनूप तलवार, निरुद्दीन रोहावला,कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, रविंद्र लोखंडे सह लायन्स क्लबचे पदाधिकारी प्रदीप दामाणी , अनुप तलवार, गणेश पाशिलकर, किशोर पठानिया, अब्बास रोहावाला, प्रमोद जैन, निरुद्दीन रोहावाला, भावेश दामाणी, रविंद्र घरत, इलाइज डब्बीर, किशोर तावडे, व्ही के माने, दिलीप तलवार, शिरीष सातपुते, सेफी रोहावाला, प्रद्युत कुलकर्णी, हेमांगी देशपांडे, रसीदा रोहावाला, बी जी माने, हेमंत गांगल, बारदेस्कर सर, सुष्मिता शिट्यालकर, तेजल शहा.व उपस्थित मित्र परिवारांनी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us