Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रोहा तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; तक्रारदाराला न्यायाची संधी न दिल्याचा आरोप;तक्रारदार संदिप पारकर यांचा आरोप. रोहा:प्रतिनिधी समीर बामुगडे रोहा तालुक्यातील मौजे कांडणे खुर्द येथील जमीन फेरफार क्रमांक ३६३ प्रकरणात तहसील कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार संदिप श्रीकांत पारकर यांनी सुनावणीदरम्यान आपले म्हणणे पूर्णपणे ऐकून न घेता निर्णय देण्यात आल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५० अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची सुनावणी २९ जून २०२६ रोजी तहसीलदार रोहा यांच्या न्यायालयात ठेवण्यात आली होती. संबंधितांना नोटीस बजावून लेखी म्हणणे व पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले होते. मात्र तक्रारदार…

Read More

मंडणगड : दारूच्या वादातून खून की खैर तस्करीचा रॅकेट? प्रतिनिधी (समीर बामुगडे मंडणगड तालुक्यातील शेनाळे बर्गेवाडी या दुर्गम भागात ३० जून २०२६ रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास एका खुनाची घटना घडली. सदु सखाराम मोकाशी (वय ४२, मूळ रा. मोकाशी पाडा, ता. जव्हार, जि. पालघर, सध्या रा. बर्गेवाडी, शेनाळे) या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण मंडणगड तालुक्यात खळबळ उडवली असून, हा खून केवळ दारूच्या छोट्या वादातून झाला की त्यामागे खैर लाकडाच्या तस्करीचे मोठे रॅकेट दडले आहे, याबाबत परिसरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. पोलीस रजिस्टर नंबर गु.र.नं. ७५/२०२६ (मंडणगड पोलीस ठाणे)मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात…

Read More

बोरघर येथे काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण “समाजासाठी झटणारी मूठभर माणसेच परिवर्तन घडवतात.” — राजेंद्र जाधव प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा रोहा तालुक्यातील बोरघर गावातील श्री काळभैरव मंदिर परिसरात भाविक, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या सोयीसाठी सीएसआर (CSR) निधीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बाकड्यांचे लोकार्पण रविवारी ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गावातील प्रणित भगत व काळभैरव युवक मंडळ यांनी मंदिर परिसरात भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची आवश्यकता असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जितेंद्र जाधव यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत जितेंद्र जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत सीएसआरच्या माध्यमातून बाकड्यांची उपलब्धता करून दिली. त्यामुळे मंदिर…

Read More

अलिबागचे सुप्रसिद्ध हॉटेल फुलोरा – गेली ४० हून अधिक वर्षे चवीची परंपरा जपत! गेली ४० हून अधिक वर्षे आपल्या दर्जेदार सेवा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि ग्राहकांप्रती असलेल्या विश्वासामुळे हॉटेल फुलोरा हे अलिबागकरांसह पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे. प्रत्येक पदार्थात अस्सल चव, उत्कृष्ट दर्जा आणि स्वच्छतेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य यामुळे येथे येणारा प्रत्येक ग्राहक समाधानाने परत जातो. कोकणी खाद्यपदार्थ, ताजे सी-फूड आणि विविध स्वादिष्ट पदार्थांची खास मेजवानी हीच हॉटेल फुलोराची खरी ओळख आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांनी दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. एकदा आमच्या चवीचा आस्वाद घेतला की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते, असे अनेक ग्राहक आवर्जून सांगतात.…

Read More

स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व भैरवीनाथ क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालसई येथे वृक्षारोपण रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्फूर्ती प्रतिष्ठान, रोहा आणि भैरवीनाथ क्रीडा मंडळ, मालसई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २८ जून २०२६ रोजी मालसई येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत एकूण ४० वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये ३२ करंज, ३ वड आणि ५ सुपारी या वृक्षांचा समावेश होता. पर्यावरणाचा समतोल राखणे, भरपूर प्राणवायू उपलब्ध करून देणे, औषधी गुणधर्म तसेच सावलीच्या दृष्टीने उपयुक्त अशा वृक्षांची निवड करून त्यांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी कृषी अधिकारी श्री. महेश गोविलकर यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.…

Read More

*पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ. तळा किशोर पितळे: पोलिओ मुक्त रायगडसाठी लसीकरण मोहिमेचा शुभारंभप्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे २८ जून २६ रोजी चंद्रकांत रोडे उपनगराध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ गजेंद्र मोधे.LHV सविता पाटील नरेश नांदगावकर HA पल्लवी शिंदे BCM किशोरी करंजे ANM, नुतन ठिगळे BF, विलास तडवी MPW , नेहा तावडे आशा सेविका सर्व अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. २०२६सालातील पहिलीच पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. ०ते५वर्षे वयोगटातील११०६ बालके होती.त्यापैकी१०४० बालकांना डोस देण्यात आले.एकही बालकलसीकरणा पासून वंचित रहाणार नाहीयाचीजिल्हा प्रशासनानेसुचना दिल्या होत्या.त्यामुळे पोलिओ मुक्त रायगड लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने कंबर कसली होती…

Read More

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग. अग्निदमन मंगेश जाधव व टीमचा यथोचित सन्मान. रोहा प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दरवर्षी वटपौर्णिमेचे औचित्य साधून विविध ठिकाणी वृक्षारोपण करणाऱ्या रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपोयोगी, त्यातही पर्यावरण पूरक असतात, झाडे ऑक्सिजन देतात, प्रत्येकाने झाडे लावून आपल्या ऑक्सिजनची सोय करावी, जंगल टिकले, वाढली पाहिजेत, पर्यावरण जागृती व संवर्धनात पत्रकारांचे काम हे कौतुकास्पद आहे, आजचा वृक्षारोपण हे त्याचेच द्योतक आहे असे तसेच मानसी चौदा ते पंधरा झाडे लाऊन ती जगवा असे प्रतिपादन सुदर्शन कंपनीचे साईट हेड विवेक गर्ग यांनी केले. ते रोहा प्रेस क्लब आयोजित अष्टमी येथील रोहिदास…

Read More

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत ‘युवा आधार, रोहा’ या सामाजिक संस्थेच्या वतीने घट कांबळे वसतिगृह येथे शैक्षणिक साहित्य वितरणाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत रोहा, माणगाव व पाली परिसरातील ११० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रोहा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते महेंद्र गुजर, नगरसेविका पूर्वा पप्पू मोहिते, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष खेरटकर, बौद्ध युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, शिक्षक व पत्रकार नंदकुमार मरवडे, अक्षरवेल फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ चव्हाण तसेच…

Read More

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण” प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांच्या सोयीसाठी बोरघर येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या माध्यमातून काळभैरव मंदिर परिसरात नव्याने बसविण्यात आलेल्या बाकड्यांचे रविवारी संपादक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झाला. गावातील प्रणित भागातील नागरिक व युवक मंडळाने मंदिर परिसरात बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सामाजिक भावनेतून मंदिर परिसरात बाकडे बसविण्यात आले. त्यामुळे मंदिरात येणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार महेंद्र मोरे, क्रीडा…

Read More

*रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी* रायगड:समीर बामुगडे रायगड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दूध, खवा, मिठाई, खाद्यपदार्थ तसेच बार आणि रेस्टॉरंटमधील अन्न व पेयांच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचा खवा, मिठाई तसेच इतर खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित प्रमाणात धाडी आणि तपासणी मोहिमा राबवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. याशिवाय जिल्ह्यात अनेक खाद्य व्यवसाय फूड लायसन्सशिवाय…

Read More