Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
ताज्या बातम्या

लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा;

देशभक्तीने भारावले वातावरण

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

 

कोलाड शिक्षण प्रसारक मंडळाच्या एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संदिपजी तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला माजी पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. विश्वनाथ पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. स्कूलच्या कमांडो पथकाने मान्यवरांना शानदार गार्ड ऑफ ऑनर देत कार्यक्रमाची शिस्तबद्ध सुरुवात केली.

कार्यक्रमाची प्रास्ताविका प्राचार्या योगिनी देशमुख मॅडम यांनी केली. स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान, स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी शिस्त, संस्कार, राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

प्रमुख पाहुणे श्री. विश्वनाथ पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून दिले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यभावना आणि राष्ट्रनिष्ठा अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष संदिपजी तटकरे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. मोठी स्वप्ने पाहून मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ती पूर्ण करा आणि आपल्या ज्ञान-कौशल्याचा उपयोग समाज व देशाच्या प्रगतीसाठी करा, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये मुलींच्या लेझीम पथकाने सादर केलेले दमदार प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेत तालबद्ध हालचाली करत विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची, शिस्तीची आणि एकतेची सुंदर झलक सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे श्री. विश्वनाथ पाटील सर यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन तसेच विविध उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास संस्थेचे रजिस्ट्रार श्री. अजित तेलंगे सर, प्राचार्या योगिनी देशमुख मॅडम, प्राचार्य संतोषकुमार भालेराव सर यांच्यासह एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत जी. डी. टी. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच गीता द तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या शैक्षणिक संस्था कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला संस्थेने प्राधान्य दिले आहे.

देशभक्तीचा जोश, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि लेझीमच्या तालाने रंगलेल्या या सोहळ्याची सांगता “जय हिंद! जय भारत!” या घोषणांनी झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us