Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान.
ताज्या बातम्या

लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान.

पुगाव – रोहा (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यात तसेच कोलाड परीसरात लायन्स क्लब ऑफ कोलाडच्या नवीन टीमचा पदग्रहण सोहळा क्लबचे अध्यक्ष ॲड रविंद्र लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी १५ ऑगस्ट रोजी खांब परिसरातील रायगड ट्रॉफिकल नडवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ चे जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन प्रविण सरनाईक आणि एम जे एफ लायन श्रुति सरनाईक,जिल्हा कॅबिनेट सेक्रेटरी पी एम जे एफ लायन नयन कवळे, प्रमुख पाहुणे रिजन चेअर पर्सन एम जे एफ लायन विद्या अधिकारी, झेड चेअर पर्सन लायन मंजुषा कुद्रीमोती, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन लायन प्रदीप सिनकर,विवेक सुभेकर,डॉ.मिलिंद पाटील, अनिल अधिकारी,कोलाड लायन्स क्लबचे मुख्य मार्गदर्शक लायन रविंद्र घरत,रोहा लायन्स क्लबचे उपाध्यक्ष जयदेव पवार,संदीप सावंत,नांदगावकर मॅडम, नागोठणे क्लब चे अध्यक्ष विकास चौलकर, सखाराम ताडकर,माणगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप नागे,उलवे क्लब चे पदाधिकारी आदी कोलाड लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि महिला लायन बहुसंख्येने उपस्थितीत यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष म्हणून पत्रकार डॉ. श्याम लोखंडे याना शपथ देण्यात आली तर सचिव पदी अनिल महाडिक, सह सेक्रेटरी भरत महाडिक,खजिनदार दिनकर सानप, उपाध्यक्ष,डॉ.विनोद गांधी,आणि इतर सभासदांनी विविध पदांसाठी शपथ घेतली.

यावेळी डॉ. श्याम लोखंडे यांनी अध्यक्ष पदाचे पदग्रहण करत पदभार स्वीकारला तर उपाध्यक्षपदी डॉ. विनोद गांधी,सेक्रेटरी अनिल महाडिक,खजिनदार दिनकर सानप, तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप,लायन नरेश बिरगावले,अलंकार खांडेकर,गजानन बामणे, नंदकुमार कळमकर, राजेंद्रर कोपू,विजय बामुगडे,सौ पूजा लोखंडे,रिया लोखंडे, अमिता बामणे,स्वरा महाडिक,शोभा खांडेकर,विश्वास निकम, दिलीप मोहिते,सह लायन मेंबर्स यांना विविध पदाचे पदग्रहनाची शपथ जिल्हा प्रांतपाल प्रविण सरनाईक यांनी दिली.तर याच कार्यक्रमात नवे सभासद राजेंद्र धनवी, अनंत मोरे, भिवा पवार, किशोर जाधव,संदीप माने, बिरगावले वहिनी
यांना डिस्ट्रिक कॅबिनेट सेक्रेटरी एम जे एफ लायन नयन कवळे यांनी नव्या सदस्यत्वाची शपथ देत सेवाभावी लायन्स क्लब संस्थेची माहिती पटवून दिली.

सदरच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लाभलेले जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन प्रविण सरनाईक, लायन नयन कवळे, लायन विद्या अधिकारी, लायन मंजुषा कुद्रीमोती, क्लबचे मार्गदर्शक लायन रविंद्र घरत यांनी उपस्थित लायन मेंबर्स यांना विविध स्तरावरचे मोलाचे मार्गदर्शन करत गेली सहा वर्ष हे क्लब विविध उपक्रम राबवत असून चांगले काम करत असल्याचे साऱ्यांनी प्रशांसना करत भरभरून कौतुक केले . सेक्रेटरी अलंकार खांडेकर यांनी वर्षभरातील कामगिरीचा सेक्रेटरी रिपोर्ट सादर केला.तर मावळते अध्यक्ष रविंद्र लोखंडे यांनी क्लबच्या माध्यमातून वर्षबर केलेले उपक्रमासाठी दिलेली साथ आणि केलेली कामगिरीतून जिल्हा स्तरावर चांगले नाव लौकिक केले येथील तळागाळात जाऊन सामाजिक शैक्षणिक आरोग्य, आणि पर्यावरणावर भर देत उत्तम प्रकारे यांच्या सहकार्यातून केल्याचे सांगीतले तर नवे अध्यक्ष डॉ.श्याम लोखंडे यांनी सांगितले की येत्या काळात अधिक उपक्रम राबविले जातील मागील पाच वर्षांत नवे चार प्रोजेक्ट करण्यात आले तसेच जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन विजय गणात्रा लायन नमिता मिश्रा यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले.चालू वर्षात चेक डॅम्प, रुग्णवाहिका आणि रिक्षा प्रोजेक्ट त्याच बरोबर क्लबच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.तद्नंतर नवे डॉ.श्याम लोखंडे यांना उपस्थीत सभासद तसेच मिञ परिवारांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी सदरच्या कार्यक्रमात जिल्हा प्रांतपाल सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते राजिप शाळा नडवली येथील शाळेतील १५ विद्यार्थ्यांना लायन माधव आग्री यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वन स्वागतगीत, ध्वज्यावंद राष्ट्रगीताने करण्यात आली तर कार्यकाच्या सुरूवातीला कु.हर्ष याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश बिरगावले यांनी करत केले तर आभार प्रदर्शन लायन रविंद्र घरत यांनी मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us