*रायगड निवासी शिक्षक संघाकडून गुणवंतांचा भव्य सत्कार* *तळा (किशोर पितळे)*रायगड निवासी शिक्षक संघ, तळा यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ गायमुख येथे उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थानी संघाचे अध्यक्ष अमिष भौड होते. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष कमळाकर चोरगे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी विजययेलवे,भानूमंचेकर,महेंद्रदेवरूसकर, राजेंद्र कुडेकर,सुनील बयकर, प्रिया गायकवाड, मितल वावेकर,संदीप खैरे, संदीप जामकर,अनंत वारे, दीपक ठाकूर,अनंत पालवणकर, शांताराम नटे, किशोरशास्त्री आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक, आयडॉल शिक्षक, राज्यस्तरीय व विभागीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले शिक्षक तसेच…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
पत्रकार आणि राजकीय नेते यांनी एकत्रित काम केले तर अशक्य असे काहीच नाही . —–मंत्री नितेश राणे मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल रोहा( वार्ताहर) दि.९ एप्रिल. पत्रकार आणि राजकीय नेते हे जर एकत्र येऊन काम केले तर कुठलाही विषय अशक्य राहणार नाही.तुम्हा पत्रकारांना समाजाच्या समस्या बाबत आस्था आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही तुमची लेखणी चालवताय प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करताय,काम करताय याबद्दल पत्रकाराबद्दल खूप आदर आहे.आज आपल्या पत्रकारांकडून ज्या अपेक्षा आहेत,ज्या समस्या मांडल्या त्या सरकार दरबारात मांडून सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करणार.त्यातील विशेषतः राष्ट्रीय महामार्ग हा गेली पंधरा सोळा वर्ष रखडला आहे. पण आता डिसेंबर २०२६ पर्यंत तो पूर्ण…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘सुधा सितारा’ उपक्रम स्तुत्य – मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन; सुदर्शन केमिकलतर्फे ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते): आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा ‘सुधा सितारा’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. रोहा येथील चिंतामणराव देशमुख सभागृहात सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या ‘सुधा’ सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, तहसीलदार…
वनविभाग माणगाव खैर माफियाचा केला फार्दाफश! रोहा समीर बामुगडे माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करत असताना बुधवार सायंकाळी 8.19 वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.यात टाटा 1916 टेम्पो क्रमांक DD.01.AC.9590 आणि खैर सोलिव माल 11.400घ.मी.किंमत 69309/- रुपये व वाहन अंदाजे किंमत 1800000/- रुपये एकूण 1869309/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नदीम अहमद रा.वापी वलसाड राज्य गुजरात चालक यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की मा. उपवसंरक्षक रोहा व सहाय्यक वनंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल यांच्या आदेशान्वये वनपाल इंदापूर व वनरक्षक कुशेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून बुधवारी…
मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारस्तंभ हरपला; कै. सुरेशआप्पा शंकर पाटील यांचे निधन प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव, चणेरा मुरुड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा सामाजिक-राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व कै. सुरेशआप्पा शंकर पाटील (वय ७८) यांचे आज दुपारी सुमारे १:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुरुड स्मशान भुमीत रात्री ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मुरुड तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेशआप्पा पाटील यांनी आपल्या आयुष्यभर सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ते मुरुड भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरुड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे…
*तळा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संस्था व पालकांनी सभेत घेतले महत्वाचे निर्णय* तळा -किशोर पितळे-: विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,शिस्त आणि बदलत्या काळातील आव्हाने विचारात घेऊन, तळे विभाग शिक्षण प्रसारकमंडळाच्या कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संस्था पदाधिकारी, पालक व शिक्षक यांची नुकतीच एक महत्त्वपूर्ण सहविचार सभा पार पडली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ‘वर्गात मोबाईल बंदी’ घालण्याचा आणि ‘बारावीचे वर्ग लवकर सुरू करण्याचा’ महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.तळा येथील महाविद्यालयात आयोजित या सभेत संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के, अध्यक्ष मंगेश देशमुख,सचिव महेंद्रशेठ कजबजे,खजिनदार चंद्रकांत रोडे, शाळा समिती चेअरमन श्रीराम कजबजे, पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन बी. के. पटेल, पर्यवेक्षक महादेव लोकरे, वाशी हवेलीचे माजी सरपंच…
खांबवली गावात हनुमान जन्मोत्सवा ची दिडशे वर्षाची परंपरा अजूनही कायम.हनुमान जन्मोत्सवाची सांगता. तळा-किशोर पितळे- तळा तालुक्यातील खांबिवली गावातील हनुमान जन्मोत्सव पांरपारीक पध्दतीने साजरा करण्याची परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात कायम राखली आहे कालपरत्वे थोडा फार बदल युवा पिढीने केला असला तरी जत्रेची काठी गुढीपाडव्याच्या दिवशी सजवून बांधली जाते रामनवमी, हनुमान जयंती जत्रेत खांबवली आदिवासी वाडी, घनगर वाडी या तीन गावात प्रत्येक घरोघरी जाऊन भेट दिली जाते पुजा आरती ओवाळणी प्रसाद केला जातो नवस केले जातात नवसाला पावते अशी ख्याती त आहे प्रत्येक वर्षी वाडी ला मान दिला जातो. हि मानाची काठी देवाचा डोंगर (द्रोणागिरी)येथे हनुमान जयंती पौर्णिमेला भेटीसाठी जाते. हा जन्मोत्सव…
*रोह्यात श्री धावीर महाराज रिक्षा चालक-मालक संस्थेतर्फे श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न* *रोहा नंदकुमार बामुगडे शहरातील अग्रगण्य आणि प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या *’श्री धावीर महाराज रिक्षा चालक-मालक संस्था रोहा ‘* यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या आशीर्वादाने आयोजित या सोहळ्यात रिक्षा व्यावसायिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्थानिक ‘श्री आई एकविरा रिक्षा स्टँड’ (जिजामाता बचत भवन, आई एकविरा भवन शेजारी) येथे ही महापूजा आयोजित करण्यात आली होती. सकाळी विधीवत पूजेला प्रारंभ झाला. मंत्रोच्चारांच्या जयघोषात आणि अगरबत्तीच्या…
*नागोठणे शहरात भाजपाचा 46 वा वर्धापन वर्धापन दिन साजरा* प्रतिनिधी सुदर्शन कोटकर आज भारतीय जनता पक्षाच्या 46 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागोठणे शहर आणि नागोठणे विभाग यांच्या वतीने रोहा तालुका नागोठणे मंडळ अध्यक्ष श्री महेश दादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनात नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग आणि तालुका सरचिटणीस ( महामंत्री ) श्री एकनाथ जी ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेचे पूजन आणि भाजपचा ध्वज पुजन करून डौलाने फडकवला त्याच बरोबर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक भाषण…
कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन. कोलाड (श्याम लोखंडे) कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी शारीरिक उपचारांसोबतच आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधक. शॉर्न क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी केले. शिरोडा येथील ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय’ व संशोधन केंद्रात ‘उपचारांमध्ये अध्यात्माची भूमिका’ या विषयावर आयोजित अतिथी व्याख्यानातून दोघांनी उपस्थित पदव्युत्तर विद्यार्थी यांना दिले. सदरच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश कोरडे आणि गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिकच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे १०० पदव्युत्तर विद्यार्थी अन् आयुर्वेद विषयातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी…

