Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सारा वर्तकचा विश्वविक्रम; कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान जलतरणपटू म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद
ताज्या बातम्या

सारा वर्तकचा विश्वविक्रम; कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान जलतरणपटू म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सारा वर्तकचा विश्वविक्रम; कमी वयात ३६ किमी समुद्री अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान जलतरणपटू म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद

अलिबाग(रत्नाकर पाटील)
अलिबाग येथील अवघ्या ७ वर्षांच्या सारा अभिजीत वर्तक हिने आपल्या अद्वितीय जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी साराने अरबी समुद्रात धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक तब्बल ३६ किमी अंतर एकट्याने अवघ्या ९ तास ३२ मिनिटांत पोहत पूर्ण करत सर्वात लहान वयाची जलतरणपटू म्हणून इतिहास रचला.

आता तिच्या या पराक्रमाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली असून ३० एप्रिल २०२६ रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात साराला “धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३६ किमी अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान भारतीय जलतरणपटू” म्हणून अधिकृत नोंद करून गौरविण्यात आले. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.

सध्या सारा पनवेल येथे राहत असून प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती कठोर प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा तिचा निर्धार आहे.

यापूर्वीही सारा वर्तकच्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. इतक्या लहान वयात मिळवलेले हे यश तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us