पिंगळसईचा ‘देशमुखांचा राजा’ ठरतो भक्तीचा केंद्रबिंदू एक गाव, एक गणपतीच्या भावनेतून गौरी-गणपती उत्सवाला पारंपरिक स्वरूप रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यातील पिंगळसई गावातील ‘देशमुखांचा राजा’ हा गणपती गणेशभक्तांच्या श्रद्धेचे आणि गावाच्या पारंपरिक एकतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवाच्या काळात या बाप्पाच्या दर्शनासाठी पिंगळसई तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. देशमुख कुटुंबाचा पारंपरिक वारसा लाभलेल्या या गणपती उत्सवात ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. ‘एक गाव, एक गणपती’ या भावनेतून ‘देशमुखांचा राजा’ तसेच ‘देशमुखांची आई’ अर्थात गौरी यांची विधिवत पूजा-अर्चा केली जाते. त्यामुळे या उत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक एकोप्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव काळात पारंपरिक आरती, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
भानंगकोंड(वृंदावन)विभागातील दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भावपुर्ण निरोप. प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे तळा तालुक्यातील भानंगकोंड(वृंदावन) विभागात सोमवारी १४ सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आगमना पासून गावागावात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तर दिड दिवसांच्या ता.१५ रोजी बाप्पांना ढोल,ताशांच्या व खालू बाजाआणी टाळ,मृदुंगाच्या भजनाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,उंदीर मामा की जय जयकार करीत लहान थोर मंडळी भक्तगणांनी आपल्या लाडक्या आवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी निरोप दिला. यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवर मोठी गर्दी करीत सर्वाना सुखी ठेव,धंदा उद्योगात बरकत दे शेती भाती चांगली बहरू दे.अशी विनंती करीत…
खांब देवकान्हे विभागातील दिड दिवसांच्या बाप्पांना वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भावपुर्ण निरोप कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागात सोमवारी १४ सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आगमना पासून गावागावात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दिड दिवसांच्या बाप्पांना ढोल, ताशांच्या व खालू बाजा आणी टाळ, मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, उंदीर मामा की जय म्हणत येथील लहान थोर मंडळी भक्तगणांनी आपल्या लाडक्या आवडत्या बाप्पाला मोठया भक्तिमय वातावरणात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी निरोप दिला.यावेळी गावातील लहान थोर तसेच महीला भगिनी यांनी विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी करत सर्वाना सुखी ठेव म्हणत भक्तीमय वातावरणात निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी आठ दहा…
सलग तिसऱ्या वर्षी गणेशभक्तांसाठी रोशन चाफेकर यांचा ‘गणपती आरती संग्रह’ उपक्रम; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते अनावरण रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना पारंपरिक आरत्या सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने भाजपचे नगरसेवक तथा दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर यांच्या पुढाकारातून सलग तिसऱ्या वर्षी ‘गणपती आरती संग्रह’ प्रकाशित करण्यात आला आहे. या आरती संग्रहाचे अनावरण महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते अलिबाग येथे करण्यात आले. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. घराघरांत तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची आरती मोठ्या भक्तिभावाने केली जाते. गणेशभक्तांना विविध पारंपरिक आरत्या एकाच ठिकाणी…
रोहा-पालदाड मार्गावर चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; एक तरुण गंभीर जखमी कोलाड (श्याम लोखंडे) रोहा-पालदाड मार्गावर रविवारी (१३ सप्टेंबर) रोजी दुपारच्या सुमारास चारचाकी गाडी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एक तरुण दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालदाड मार्गावरून एक तरुण आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस या दुचाकीवरून जात होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी बलेनो या कारशी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच कारच्या डाव्या बाजूच्या हेडलाईट आणि बंपरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना राजकीय मुद्द्यांचे स्वरूप देत सत्ताधारी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम करणाऱ्या पेपरफुटीच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष मितेश कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा येथे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत…
*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा; प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलाला वेग आला असून पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अनुभवी आणि सक्रिय नेतृत्वाकडे सोपविण्यात आल्याने तळा भाजपमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कैलास पायगुडे यांच्याकडे भाजपच्या तळा तालुक्याची धुरा, तर ॲड. चेतन चव्हाण यांची शहराध्यक्षपदी आणि ॲड.निलेश रातवडकर यांची जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अलिबाग येथे जिल्हा कार्यकारणी च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चव्हाण, रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील,श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख प्रशांत शिंदे,जिल्हा महिला…
श्रावणसरींच्या साक्षीने शब्दफुलांचा बहर! कोमसाप रोहा शाखेची वर्षा सहल, कविसंमेलन व विविध उपक्रम उत्साहात संपन्न रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) रोहा शाखेच्या वतीने साहित्यिकांसाठी आयोजित करण्यात आलेली वर्षा सहल, कविसंमेलन आणि विविध साहित्यिक उपक्रम तळाघर येथील निसर्गरम्य बयोज फार्म येथे उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. हिरवाईने नटलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात झालेली ही साहित्यिक वर्षा सहल सहभागींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरली. कोमसाप जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या ताम्हण वृक्षाला आलिंगन देऊन सहलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्हा समन्वयक तथा रायगड भूषण सुखद राणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची…
ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर दर्शना आठवले अध्यक्षपदी; पुढील पाच वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा येथील विशेष मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था, रोहा या संस्थेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. संस्थेच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने पुढील पाच वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेअंतर्गत ‘प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा’ सन २००६ पासून गेली २० वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर अविरतपणे कार्यरत आहे. विशेष मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या शाळेचा आजवरचा प्रवास देणगीदार, पालक आणि समाजातील दातृत्वशील व्यक्तींच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे. विशेष मुलांना शिक्षण, संस्कार आणि…
गणेशोत्सवाच्या तोंडावर रोहा–तांबडी रस्ता खड्ड्यात! खड्ड्यांचे विघ्न कायम; प्रशासन सुस्त, जनता त्रस्त अन् नेते आश्वासनांत मस्त! रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असताना चाकरमान्यांची गावाकडे ये-जा वाढली आहे. मात्र रोहा तालुक्यातील महत्त्वाचा रोहा–तांबडी मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात अडकला असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसाठी अक्षरशः तारेवरची कसरत ठरत आहे. रस्त्याची दुरवस्था प्रशासनाने मान्य करूनही खड्डे बुजविण्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, पुणे तसेच विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल होत आहेत. तांबडी, गौळवाडी, सवाणे, म्हसाडी, बारशेत यासह परिसरातील…

