Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मातृछाया मुद्रणालयाचे मालक नंदू रोडे यांना मातृ शोक.
  • दिवाळीच्या आनंदात श्रमजीवी कर्मचाऱ्यांचाही सन्मान! रोशन चाफेकर यांची स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अनोखी स्नेहभेट
  • रोहा टाइम्सचा दिवाळी अंक पालक मंत्री भरत शेठ गोगावले यांचे हस्ते प्रकाशित
  • *मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वाशी हवेलीची जिल्ह्यात तृतीय क्रमांकाची झेप* २० लाखांचे पारितोषिक; ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावात जल्लोषाचे वातावरण!
  • गारगी व ग्रिमा काँम्प्युटर कृष्णाई झेरॉक्स सेंटर चे दणक्यात उद्घाटन
  • दिव्यांग मुलांच्या स्वावलंबनाला मिळणार नवी दिशा; ‘प्रगती’ कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन! आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन; दिव्यांग मुलांसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
  • ज्येष्ठांच्या सन्मानासोबतच त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस धोरण हवे! आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक तरतुदींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे – पी. बी. सरफळे रावसाहेब
  • रोह्यात भक्तिभावात वसुबारस उत्सव साजरा; गोमातेचे पूजन करून गोसेवकांचा सन्मान
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वाशी हवेलीची जिल्ह्यात तृतीय क्रमांकाची झेप* २० लाखांचे पारितोषिक; ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावात जल्लोषाचे वातावरण!
ताज्या बातम्या

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वाशी हवेलीची जिल्ह्यात तृतीय क्रमांकाची झेप* २० लाखांचे पारितोषिक; ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावात जल्लोषाचे वातावरण!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरNovember 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वाशी हवेलीची जिल्ह्यात तृतीय क्रमांकाची झेप*

२० लाखांचे पारितोषिक; ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावात जल्लोषाचे वातावरण!

तळा किशोर पितळे (प्रतिनिधी) 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत तळा तालुक्यातील वाशी हवेली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावत तब्बल २० लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. या दैदिप्यमान यशामुळे वाशी हवेली गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा, लोकसहभाग आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यामुळे वाशी हवेली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे विद्यमान ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत ऑपरेटर, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे योगदान लाभले. विशेषतः ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांनी प्रत्येक उपक्रमात दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग, सहकार्य आणि लोकसहभाग यामुळे या यशाला खऱ्या अर्थाने बळ मिळाले.
गावाच्या विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, ग्रामस्थांचे सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न यांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
या ऐतिहासिक यशाचा आनंद गावात पारंपरिक बिंदास खालू-बाजाच्या गजरात जल्लोषात साजरा करण्यात आला. यामुळे संपूर्ण गावात उत्साह, आनंद आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
२० लाखांचे पारितोषिक म्हणजे केवळ आर्थिक बक्षीस नसून वाशी हवेलीच्या एकजुटीचा, लोकसहभागाचा आणि सामूहिक विकासाच्या संकल्पाचा गौरव आहे. या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन होत असून, वाशी हवेली ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील इतरग्रामपंचायतीं समोर विकासाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मातृछाया मुद्रणालयाचे मालक नंदू रोडे यांना मातृ शोक.

November 8, 2026

दिवाळीच्या आनंदात श्रमजीवी कर्मचाऱ्यांचाही सन्मान! रोशन चाफेकर यांची स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अनोखी स्नेहभेट

November 8, 2026

रोहा टाइम्सचा दिवाळी अंक पालक मंत्री भरत शेठ गोगावले यांचे हस्ते प्रकाशित

November 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मातृछाया मुद्रणालयाचे मालक नंदू रोडे यांना मातृ शोक.

November 8, 2026

दिवाळीच्या आनंदात श्रमजीवी कर्मचाऱ्यांचाही सन्मान! रोशन चाफेकर यांची स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अनोखी स्नेहभेट

November 8, 2026

रोहा टाइम्सचा दिवाळी अंक पालक मंत्री भरत शेठ गोगावले यांचे हस्ते प्रकाशित

November 7, 2026

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वाशी हवेलीची जिल्ह्यात तृतीय क्रमांकाची झेप* २० लाखांचे पारितोषिक; ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गावात जल्लोषाचे वातावरण!

November 7, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us