Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेची वार्षिक सभा उत्साहात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध उपक्रमांसह बालवाडीच्या विस्ताराची मागणी रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा सौ. उषा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेला संस्थेच्या पदाधिकारी व सुमारे ५० महिला सभासदांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी सौ. निता हजारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सौ. राजश्री देसाई यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. अध्यक्षा सौ. उषा क्षीरसागर यांनी ऑडिट रिपोर्टचे वाचन केले. यावेळी सौ. नेहा कुळकर्णी व सौ. कविता दळवी यांच्या हस्ते शेअर्स डिव्हिडंडचे वाटप करण्यात आले. रोहा महिला उद्योग सहकारी संस्थेच्या…

Read More

‘‘श्वेतराज’मधून उमलली कवयित्री संध्या दिवकर यांची साहित्यिक प्रतिभा ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन; “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके वाचायला मिळोत” रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) शिक्षिका ते कवयित्री हा संध्या दिवकर यांचा प्रवास सुरेल आणि प्रेरणादायी आहे. *‘बोला पुढारी’*सारख्या मिश्कील कवितेतून त्यांची प्रतिभा दिसून येते. त्यांच्या कविता मार्मिक असून विडंबनात्मक लेखनही सुंदर आहे. “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके आम्हाला वाचायला मिळोत,” अशा शुभेच्छा ना. आदिती तटकरे यांनी दिल्या. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या वतीने कवयित्री संध्या विजय दिवकर यांच्या ‘श्वेतराज’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा झाला.…

Read More

न्हावे येथे ‘पंढरपूर पायी दिंडी’चा मनोहारी देखावा; भक्तिमय वातावरणात गणरायाची आराधना प्रतिनिधी / सत्यप्रसाद  आडाव चणेरा दि. २२ सप्टें. कोळी समाज अध्यक्ष न्हावे मनोहर डबीर यांच्या निवासस्थानी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘पंढरपूर पायी दिंडी’चा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. पारंपरिक वारकरी संस्कृती, विठ्ठल भक्ती आणि गणेशभक्ती यांचा सुंदर संगम या देखाव्यातून पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तीसमोर साकारलेल्या या देखाव्यात पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविण्यात आले असून, वारकरी, टाळ-मृदंग, दिंडीतील भक्तगण आणि विविध धार्मिक प्रसंगांच्या प्रतिकृतींमधून महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचे दर्शन घडते. देखाव्याची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची आरास आणि विविध रंगसंगतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंढरपूरच्या वारीची परंपरा आणि वारकऱ्यांची विठ्ठलावरील श्रद्धा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, तसेच…

Read More

हाशिवरे गावची कन्या तनया गावंड हिला पिस्तूल शूटिंग मध्ये सुवर्णपदक रोहा (शैलेश गावंड) ठाणे येथील VPM बी एन बांदोडकर कॉलेज ची एफ वाय बी एस सी ची विद्यार्थिनी कु तनया संदेश गावंड हिने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागीय पिस्तूल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आणि मुंबई विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अंतर्विभागीय स्पर्धेसाठी ठाणे विभागातून तिची निवड झाली आहे ठाणे येथे सेवा बजावत असलेले तिचे वडील ए पी आय संदेश रंगनाथ गावंड व तिचे प्रशिक्षक अक्षय साळुंखे यांचे मार्गदर्शन व अथक परिश्रम घेतल्या मुळे तिला हे यश प्राप्त झाले या बद्दल कॉलेज चे प्राचार्य सर्व प्राध्यापक यांनी तिचे अभिनंदन केले…

Read More

चाकरमानी गेले कामाला.चैन पडेना आम्हाला.. गावात झाला पुन्हा शुकशुकाट. प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे देवांचा आधिपती गणाधीराज बुद्धी ची देवता सुखकर्ता,दु:ख हर्ता गणरायाच्या आगमनाची लागलेली आस आणी मुल सुन नातवंडे येणार म्हणून आई वडील आजी आजोबा नी घर साफ स्वच्छ करून रंगरंगोटी करून किरकोळ सामान भरून ठेवलेली तयारी ची लगबग हे गणरायाच्या आगमाना बरोबर घर प्रफुल्लित होण्याचा आनंद म्हणजे स्वर्ग सुखा सारखे वाटते गणपती सणाचे आनंदी आनंद चे दिवस कसे जातात ते समजले नाही पुजा आरती नाश्ता,गोडा घोडाचे नैवेद्य जागरण भजन जिकडे तिकडे आंनदोत्सव वातावरणात दिसून येत होताअशा धार्मिक कार्यक्रम मुलं नातवंडे यांच्या गडबड गोंधळ दंगा मस्ती घराला आलेले घरपणआणीगौरी -…

Read More

खांब देवकान्हे विभागातील पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे व जेष्ठा गौरींचे मोठया उत्साहात विसर्जन. गौरी-गणपतींना भावपूर्ण निरोप! कोलाड (श्याम लोखंडे) गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला मोठ्या जयघोषात पाच दिवसांच्या बाप्पाला खांब देवकान्हे परिसरातील भक्तगणांनी भक्तीभावाने शनिवारी उशिरापर्यंत निरोप दिला. सोमवारी 14 सप्टेंबर रोजी देवबाप्पांचे मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले सलग सात दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर खांब देवकान्हे विभागातील खांब,पुगाव, वैजेनाथ, घेरासुर,मुठवली, शिरवली,गोवे, शिरवली, नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे,बाहे, देवकान्हे, येथील गणेश भक्त ग्रामस्थांनी मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी आपल्या लडक्या गणरायाला आणि त्यासोबत गौरींनाही सायंकाळी उशिरापर्यंत भावपूर्ण निरोप दिला. बाप्पांचे आगमन झाल्यापासून मात्र पावसाची…

Read More

लायट्या मारुतीच्या साक्षीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्र सेवेला सलाम व उजळला आशिर्वादाचा दिवा!. प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने तळा शहरातील नमो उद्यानातील लायट्या मारुती मंदिरात महाआरतीचे आयोजन व दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचवीसवर्षेसेवेला‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष कार्यक्रम भक्तिमय व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. तसेच घरोघरी दीप प्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रसेवे प्रती नमन करण्यातआले.तसेचत्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत विकसित भारताच्या संकल्पासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तळा परिसरातील व तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे…

Read More

रोडे कुटुंबियांचा १५०/२०० वर्षांपासून एक घर (कुटुंब)एक गणपती. कौटुंबिक जिव्हाळा एकात्मतेचे घडते दर्शन समाजापुढे वेगळा आदर्श. प्रतिनिधी / तळा  किशोर पितळे तळा शहरातील रोडे कुटुंब हे खानदानी मोठे असुन जवळपास १५०/२०० वर्षापासून एक घर एक गणपती संकल्पना अजूनही आधुनिक काळात संस्कृती जपली आहे भाद्रपदातील श्री गणेशोत्सव म्हणजे अबाला पासून वद्धांपर्यत एक पर्वणीच ठरते.गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा केला जातो रोडे कुटुंबातील ९३वर्षीय जेष्ठ राजाभाऊयांनी सांगितले कि पणज़ोबा आजोबा,वडील,आणी माझी पाचवी, सहावी पिढी असून जवळपास ५०/ ६० जणांचे कुटुंब एकत्र येऊन साजरा करीत आहेत.सुख दु:खात येत असतात जरी काही कुटुंब नोकरी घंद्या निमित्ताने बाहेरगावी किंवा शहरा ठिकाणी गेली असली तरी गौरी…

Read More

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप रायगड प्रतिनिधी  दि. १७ सप्टेंबर २०२६ ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध शासकीय लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन आज रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से.), कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद रायगड वैकुंठद पाटील, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), रायगड प्रियदर्शनी मोरे तसेच पंचायत समिती आदिवासी गण सदस्य श्रीमती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि लाभाच्या योजनांची…

Read More

कवयित्री संध्या दिवकर यांच्या ‘श्वेतराज’चा रविवारी प्रकाशन सोहळा साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; ज्येष्ठ नागरिक सभागृहात रंगणार साहित्यिक सोहळा रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) कवयित्री तथा शिक्षिका सौ. संध्या विजय दिवकर यांच्या पहिल्या ‘श्वेतराज’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई वरदा सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड भूषण तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त श्री. एल. बी. पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, रोहा-अष्टमी…

Read More