रोहा टाइम्सचा दिवाळी अंक पालक मंत्री भरत शेठ गोगावले यांचे हस्ते प्रकाशित
विशेष प्रतिनिधी
दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साप्ताहिक रोहा टाईम्स च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रायगड चे पालक मंत्री आमदार भरत गोगावले यांचे हस्ते त्यांच्या निवासस्थानी पार पडला या वेळी रोहा टाईम्स चे संपादक कुणाल मनोज घोसाळकर
उप संपादक शैलेश गावंड म्हसळा चे माजी सभापती उपसंपादक रवींद्र लाड व अन्य मान्यवर उपस्थित होते
रोहा टाइम्स दिवाळी अंकाचे हे 19 वे वर्ष असून संस्थापक संपादक मनोज घोसाळकर यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र कुणाल घोसाळकर यांनी साप्ताहिक रोहा टाइम्सची धुरा हातात घेतली असून त्यांना रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाउंडेशनचे सचिव व उपसंपादक शैलेश गावंड तसेच ॲड रत्नाकर पाटील , रवींद्र लाड, श्याम लोखंडे, नंदू बामूगडे , किशोर जी पितळे व अन्य सहकाऱ्यांची साथ मिळत आहे कुणाल घोसाळकर याचा हा पहिलाच प्रयत्न असूनही अंक उत्तमरित्या तयार करण्यात आला असून या अंकामध्ये ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, नामवंत कलाकार नाना पाटेकर, सुरेल गायिका स्वर्गीय आशा भोसले, समाजसेवक अण्णा हजारे सिंधुताई सपकाळ, अजित दादा पवार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रतन टाटा , सचिन तेंडुलकर , रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवर श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांचे लेख व महत्त्वपूर्ण माहिती छापल्यामुळे हा अंक संग्राह्य स्वरूपाचा झाला आहे. स्वर्गीय मनोज घोसाळकर यांना यावर्षी श्रेष्ठ व्यक्तिमत्व या विषयावर काढण्यात आलेला हा दिवाळी अंक अर्पण करण्यात आला आहे .
रोहा टाइम्स पोर्टल आणि टीव्ही सेवन न्यूज चैनल ची धुरा सहकाऱ्यांच्या साथीने कुणाल उत्तम रित्या सांभाळत आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वडिलांनी लावलेला पत्रकारितेचा वसा असाच पुढे सुरू ठेवण्याचा त्याचा निर्धार आहे रोहा टाइम्स परिवारातर्फे सर्व जाहिरात दारांचे आभार आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.