रोहा मध्ये दोन दिवस दहीहंडी चा थरार व बक्षिसांची खैरात रोहा( शैलेश गावंड) या वर्षीच्या 2026 च्या गोकुळाष्टमीनिमित्त रोहा मध्ये दोन दिवस दहीहंडीचे आयोजन केले होते सर्वप्रथम चार सप्टेंबर रोजी रोहा तालुका शिवसेनेतर्फे ठेवलेल्या दहीहंडी स्पर्धेत 30 पुरुष गोविंदा पथकांसोबतच दहा महिला गोविंदा पथके सुद्धा सहभागी झाले होते पालकमंत्री भरत शेठ भोगावले व आमदार महेंद्र दळवी यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते आकाश अशोक धोत्रे व हर्ष पाटील यांचे संयुक्त विद्यमाने आयोजितलेल्या स्पर्धेत एक लाख एकवीस हजार चे पारितोषिक ठेवले होते यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर ,विकास शेठ गोगावले, अनिल नवगणे, सुमित काते, शिल्पा अशोक धोत्रे नवनिर्वाचित सदस्य संतोष पोटफोडे पूजा पोटफोडे अमित…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
शिवसेनेच्या दहीहंडीत खारी पथकाचा जल्लोष मागील वर्षीची हुकलेली संधी यंदा साधली; प्रथम क्रमांकासह १ लाख २१ हजारांचे बक्षीस रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी स्पर्धेत गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मागील वर्षी अवघ्या काही अंतराने हुकलेला विजय यंदा खेचून आणत लाटनेश्वर खारी गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. खारीच्या गोविंदांनी आठ थरांचा थरार उभा करत दहीहंडी फोडताच ‘खारी गावची पोरं लय हुशार!’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना युवा नेते आकाश भैया धोत्रे आणि महेंद्र दळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्ष पाटील यांच्या नियोजनातून या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात…
निरनिराळ्या तापाच्या साथी पसरल्या; ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभेत अध्यक्ष पी. बी. सरफळे यांचे आवाहन रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते रोहा शहरासह परिसरात सध्या निरनिराळ्या तापाच्या साथी पसरल्याने शेकडो नागरिक आजारी पडल्याचे चित्र आहे. त्यातच वातावरणातील सततच्या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. बाहेर पडणे आवश्यक असल्यास शक्यतो कोणाला तरी सोबत घेऊनच जावे, असे आवाहन रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे यांनी केले. रोहा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना सरफळे बोलत होते. ते म्हणाले की, सध्या कधी ऊन, कधी पाऊस तर कधी…
एकशेपसतीस वर्षांची परंपरा लाभलेला खोत परीवाराचा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात प्रतिनिधी /(राजीव नेवासेकर) मुरुड शहरासह तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये मुरुडच्या भंडारवाड्यात स्व.नारायण खोत यांच्या निवासस्थानी एकशेपसतीस वर्षांची परंपरा लाभलेला खोत परीवाराचा पारंपारिक श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक रस्त्यावरील भंडारवाडा येथील लक्ष्मण बाबाजी खोत ह्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाची सुरुवात 1891 पासून सुरू केली.त्यानंतर शांताराम लक्ष्मण खोत, नारायण शांताराम खोत यांच्या नंतर सुरेश नारायण खोत हा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव परंपरा राखीत साजरा करीत असून यंदा या उत्सवाला १३५ वर्षे पूर्ण झाली असून…
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला निवृत्त शिक्षकांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेचा स्तुत्य उपक्रम; १४ निवृत्त शिक्षकांचा घरी जाऊन गौरव रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या निवृत्त शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या वतीने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या विजय दिवकर व सचिव श्री. विजय वसंत दिवकर यांच्या कल्पक संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी निवृत्त शिक्षकांच्या घरी प्रत्यक्ष…
२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार उच्चशिक्षित, उपक्रमशील आणि सर्जनशील शिक्षिकेच्या कार्याची रायगड जिल्हा परिषदेने घेतली दखल रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) विद्यार्थीकेंद्रित व कृतीआधारित अध्यापन पद्धतीचा प्रभावी अवलंब करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व सर्जनशील विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या रायगड जिल्हा परिषद शाळा रोठ खुर्द येथील आदर्श शिक्षिका अमिता गजानन बामणे यांना रायगड जिल्हा परिषदेचा सन २०२६ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या तब्बल २० वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा हा गौरव मानला जात असून, रोहा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. अमिता बामणे या उच्चशिक्षित असून…
जेष्ठ नागरिकांना सह.पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी केले मार्गदर्शन . प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे तळा तालुका जेष्ठ नागरिक संघाची मासिक मिटींगचे आयोजन ३सप्टेंबर २६रोजी श्रीगणेश मंगल कार्यालय दुपारी३वा.भरविण्यातआली होती यावेळी प्रमुख पाहुणे संतोष दराडे सह.पोलीस निरीक्षक तळा पोलीस ठाणे होते व्यासपीठावरअध्यक्ष मंगेश देशमुख,उपाध्यक्ष किशोर पितळे सचिव महंमद परदेशी, सहसचिव रमेश कोलवणकर, खजिनदार दतात्रय कुंडे सल्लागार मारुती शिर्के गुरुजी उपस्थित होते.यावेळी संतोष दराडे यांनी जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि शासनाच्या जेष्ठ नागरिकांना सोयी सवलती सुविधा पण भरपूर आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यांनी संघटीत राहिले पाहिजे उदा.जेष्ठ नागरिकांना एसटी बस मधे महीला ५०%व ६५वरील पुरुष वर्गाला ५०%तिकीट ७५वरील नागरिकांना मोफत…
समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो : ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज शिक्षणासोबत धर्म, संस्कृतीचे संस्कारही आवश्यक; विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप प्रेरणादायी रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) “विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असताना त्यांना योग्य दिशा दाखविल्यास त्यांचे जीवन आदर्श बनते. शिक्षणासोबत धर्म व संस्कृतीचे शिक्षण देणेही तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो आणि समाजातील नागरिक शिकले तरच समाज सुदृढ बनतो,” असे प्रतिपादन ज्ञानभास्कर, कीर्तनरत्न ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी केले. पंचक्रोशी…
महावितरणचा भोंगळ कारभार ? वीजपुरवठा खंडित असतानाही विद्युत खांबावर काम करणारा कर्मचारी विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी, सर्वत्र संतापाची लाट. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर रोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यासह परिसरातील काही भागांचा मंगळवारी तांत्रिक कामासाठी विद्युत मंडळाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना महावितरणकडून देण्यात आली होती. मात्र वीजपुरवठा खंडित करून विद्युत खांबावर तांत्रिक काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याची गंभीर घटना रोहा शहरात घडली. या दुर्घटनेत संबंधित कर्मचारी खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रोहा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, प्रकृती गंभीर असल्याने अधिक पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथे हलविण्यात आल्याची समजते. या घटनेमुळे महावितरणच्या…
समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो : शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो : ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे प्रतिपादन. कोलाड (श्याम लोखंडे) विद्यार्थी घडले पाहीजेत. शिकले पाहीजे उच्च दर्जाचे चांगले शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दिशा दाखविल्यास शिक्षण चांगले होते.चांगले शिक्षण दिल्यास मुलांचे आदर्श जीवन बनते.शिक्षणाबरोबर धर्म, संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे. गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो. शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो असे ज्ञान भास्कर किर्तनरत्न ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी आपल्या आशीर्वाचनातून व्यक्त करत…

